अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे
पडघम - राज्यकारण
रवि आमले
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 16 November 2024
  • पडघम राज्यकारण राज ठाकरे Raj Thackeray शरद पवार Sharad Pawar विधानसभा निवडणूक २०२४ Vidhansabha Election व्हॉट्सअबाऊटरी Whataboutery

राज ठाकरे यांना पाहिले की, हमखास महर्षि व्यासांची आठवण येते. तसे या दोघांमध्ये काहीही साम्य नाही. व्यासांनी ‘महाभारता’त एके ठिकाणी मोठी खंत व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात - ‘ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चित् श्रीणोति मे’. म्हणजे मी दोन्ही हात वर करून ओरडतोय, पण कोणी माझे ऐकतच नाही. राज ठाकरे यांचेही असेच झालेले आहे.

ते हल्लीच्या ‘राजकीय संस्कृती’वर सातत्याने टीका करत असतात. परवा त्यांनी एक सवाल केला - ‘राजकारण्यांनाच ‘कॅरेक्टर’ उरले नाही, तर शहरांना कोठून येणार?’ येथे ते राजकीय नेत्यांचे चारित्र्य, सुसंस्कृतता, सभ्यता यांबाबत बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी ‘राजकीय मंचावर मुलींना नाचवणे याला ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’ म्हणतात का?’, असा सवाल केला होता. मागे एकदा ते मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करताना म्हणाले होते, ‘महाराष्ट्राचा खेळ झाला आहे, सर्कस झाली आहे. महाराष्ट्राची ‘राजकीय भाषा’ खालच्या थराला गेली आहे.’ हा राज ठाकरे यांचा वैताग आहे.

राज ठाकरे यांचे राजकारण, त्यांच्या बदलत्या भूमिका, त्यासाठी केलेली वैचारिक कसरत, हे सारे बाजूला ठेवून पाहिले, तर त्यांचा हा वैताग योग्यच दिसतो. त्या मागे नैतिक बळ असते, तर तो वांझ ठरला नसता. तरीही त्यांनी मांडलेले मुद्दे दुर्लक्षिता येणार नाहीत. खरे तर, दुर्लक्षिण्याचा कितीही प्रयत्न केला, कितीही कानाडोळा केला, तरीही ‘उघडा डोळे बघा नीट’ म्हणणाऱ्या त्या तमाम वृत्तवाहिन्या आपल्याला हे विसरू देणार नाहीत की, महाराष्ट्राची ‘सर्कस’ झाली आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्या भाषेत सांगायचे, तर महाराष्ट्राचा ‘सट्टक’ म्हणजे ‘तमाशा’ झालेला आहे. खरे तर येथे ‘तमाशा’ हा शब्द वापरणे, हा त्या लोककलेचा घोर अपमान ठरेल. त्यापेक्षा ‘नौटंकी’ हाच शब्द योग्य ठरेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आता हे कोणी केले, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यास सारेच पक्ष कारणीभूत आहेत. काहींचा वाटा खारीचा असेल, काहींचे योगदान आभाळाएवढे असेल, पण पाप साऱ्यांचेच आहे. भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे.

हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. नेता एका स्त्रीनेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो, लोक चेकाळून खिंकाळतात.

महाराष्ट्रातील अनेक सुसंस्कृत नागरिकांना आज हा प्रश्न भेडसावतोय की, हे असे चेकाळून खिंकाळणारे लोक असतात तरी कोण? ते येतात तरी कुठून? त्यांना समजत नाही का, की हे सारे घाणेरडे आहे? उत्तर सोपे आहे, नाही समजत.

मुळात आपल्या नेत्याने केलेली शिवीगाळ, केलेली असभ्यता, त्यातून घडवलेले स्वतःच्या संस्कृतीचे प्रदर्शन हे सारे वाईट आहे, हेच त्यांना मान्य नसते. तसे सांगावयास गेल्यास, संघीय वर्तुळाचा आवडता ‘क्रिया-प्रतिक्रियावाद’ ते यास लावतात. म्हणजे सध्या भाजपमध्ये असलेले नारायण राणे व त्यांचे अद्याप भाजपमध्ये असलेले एक व भाजप सोडून गेलेले एक, असे दोन्ही पुत्र यांच्या ‘भाषिक संस्कृती’वर कोणी टीका केली की, त्यांचे समर्थक ताबडतोब बाईटबहाद्दर संजय राऊत यांच्याकडे बोट दाखवतात. रोखठोक भाषा म्हणजे तुच्छतासंपृक्त शेरेबाजी व गालिप्रदान या व्याख्येचे जनक असलेले संजय राऊत बोलतात, ते तुम्हाला चालते काय, असा त्यांचा सवाल असतो.

...........................................................................................................................................

राज ठाकरे म्हणतात, सगळ्या राजकारणाचा विचका झाला आहे. मोदीही तेच म्हणतात. शरद पवारही तेच म्हणतात. उद्धव ठाकरेही तेच म्हणतात. सगळ्यांचेच या बाबत एकमत आहे. सगळे सत्ताकारण, समाजकारण, संस्कृतीकारण हे - अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर - ‘फोकनाडांची फालमफोक’ बनलेले आहे. मग यातील प्रामाणिक कोण? कोणाला खरोखरच समाजाची चिंता आहे? कोणाला खरोखरच राजकारणीतील सभ्यता पुन्हा हवी आहे?

...........................................................................................................................................

ही ‘व्हॉट्सअबाऊटरी’ झाली. वस्तुतः येथे जेवढे राणे चूक, तेवढेच राऊतही चूक. पण ‘व्हॉट्सअबाऊटरी’त असे नसते. तेथे नेहमीच ‘तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म’ असे विचारत आपली कृती योग्य ठरवली जाते. ‘व्हॉट्सअबाऊटरी’चा पायाच हा असतो की, दुसऱ्याने खाल्ले, तर ‘शेण’ आणि आपण खाल्ली, तर मात्र ती ‘श्रावणी’!

मुळात दोघेही खात असतात ते शेणच. ब्रँड तेवढा ‘श्रावणी’ नावाचा असतो, हेच हे लोक विसरलेले असतात. यातून झाले असे की, सगळेच मिळून ही ‘श्रावणी’ खाऊ लागलेले आहेत. यातून स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून पाहण्याचे एक निर्लज्ज निर्ढावलेपण आलेले आहे.

मध्यंतरी शिवसेनेचा एक नेता भाजपच्या स्त्री उमेदवारास उद्देशून ‘इम्पोर्टेड माल’ असे म्हणाला. त्या बाहेरच्या मतदारसंघातून आल्या म्हणून असे म्हणालो, हा त्याचा त्यावरचा खुलासा. तो पटणे शक्य नाही. भाषेचा स्तर खालचाच होता त्यांचा. त्यावर टीका झाली ती योग्यच. पण जेव्हा त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करतात, तेव्हा त्यातून त्यांच्या निर्ढावलेपणाची पातळीच दिसत असते.

मोदी यांच्या विचार-आंधळ्या अनुयायांना याचे विस्मरण झाले असेल, पण ‘दीदी ओ दीदी’ हे टपोरीउद्‌गार, ‘जर्सी गाय’, ‘ऐंशी कोटींची गर्लफ्रेंड’ हे अपशब्द ही सारी ‘मोदीवचने’च आहेत. महिलांबाबत असे बोलणारी, बलात्काराचे-महिला शोषणाचे आरोप असलेल्या लोकांना पाठीशी घालणारी व्यक्ती, जेव्हा महिला सन्मानाच्या गोष्टी करते, तेव्हा ती निव्वळ राजकीय टीका ठरते.

‘राजकीय संस्कृती’चा स्तर उंचावावा, या हेतूने ती टीका केलेली आहे, असे काही त्यातून दिसत नाही. मोदी हे देशाचे नेते. तेव्हा त्यांचे उदाहरण येथे दिले. अशी छोट्या-मोठ्या नेत्यांची अनेक उदाहरणे देता येतील. त्या सगळ्यातून एकच दिसेल, तो म्हणजे राजकीय संस्कृतीचा अधःपात, पण तो असाच झालेला नाही. त्याचा फुटवा येथील सामाजिक वातावरणातून झालेला आहे. आणि या वातावरणाची निर्मिती ही एक सुनिश्चित अशी योजना आहे.

...........................................................................................................................................

राजकारण हा जेव्हा ‘पोटार्थी व्यवसाय’ होतो, तेव्हा पहिला बळी ‘साधनशुचिते’चा जातो. आता तर राजकीय पक्षांचे ‘टोळीकरण’ झाले आहे. परिणामी व्यवसायातील गळेकापू स्पर्धेने ‘टोळीयुद्धा’चे स्वरूप घेतलेले आहे. महाराष्ट्रात आज जे सुरू आहे, ते राजकीय टोळीयुद्ध आहे. भाषिक हिंस्त्रता हे त्यातील एक शस्त्र आहे. या टोळीयुद्धाचे, हिंसेचे ‘सामान्यीकरण’ - नॉर्मलायझेशन - करण्यात आलेले आहे. हे सामान्यीकरण आपणांस पाहावयास मिळते घाणेरड्या वक्तव्यांवर खिदळणाऱ्या लोकांतून, समाजमाध्यमांतील जल्पकांतून - ट्रोल्समधून. जल्पकांच्या झुंडीच्या झुंडी येथे तयार झालेल्या आहेत.

...........................................................................................................................................

पूर्वी राजकीय विरोधकांवर तुटून पडणे, असभ्य टीका करणे नव्हते काय? निश्चितच होते. परवा त्या ‘इम्पोर्टेड माल’ या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले - ‘आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी त्याचे थोबाड फोडले असते.’ यास शिंदे यांनी केलेला विनोद म्हणता येईल किंवा त्यांना झालेले विस्मरण.

महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात ‘शिवराळांचा शिमगा’ आणण्याचे महत्कार्य केले, ते त्या तथाकथित ‘ठाकरी भाषे’ने. तत्पूर्वी राज्यात आचार्य अत्रे यांच्यासारखे पत्रपंडित होते. ‘मराठा’ हे त्यांचे पत्र. त्यातून ते विरोधकांना ‘झोडून’ काढत आणि ते सारे महाराष्ट्र मिटक्या मारत वाचे.

त्यांच्या पत्रकारितेचा हा एक नमुना - ती १९६७ची निवडणूक होती. स. का. पाटील विरुद्ध जॉर्ज फर्नांडिस अशी. त्या वेळी आचार्यांनी ‘मराठा’त एक व्यंगचित्र छापले होते. त्यात असे दाखवले होते की, शंकराचार्य म्हणतात, ‘गाय ही माझी माता आहे. तिला मारू नका’. आणि त्याच्या बाजूलाच ‘डुक्कर हा माझा बाप आहे’, असे स. का. पाटील म्हणताहेत असे दाखवले होते.

ही अशी पत्रकारिता टिळक-आगरकरांच्या काळातही होती. तेव्हाची सनातन्यांची, सुधारकांची, सत्यशोधकांची सर्वांचीच राजकीय पत्रकारिता अनेकदा अशा विखारी वळणावर जात असे. राजकीय नेत्यांतही असे काही फुटके ढोल असत, पण पूर्वीच्या आणि आजच्या काळात एक मोठा फरक आहे. तो आहे संतुलनाचा, सामान्यीकरणाचा.

...........................................................................................................................................

‘व्हॉट्सअबाऊटरी’चा पायाच हा असतो की, दुसऱ्याने खाल्ले, तर ‘शेण’ आणि आपण खाल्ली, तर मात्र ती ‘श्रावणी’! मुळात दोघेही खात असतात ते शेणच. ब्रँड तेवढा ‘श्रावणी’ नावाचा असतो, हेच हे लोक विसरलेले असतात. यातून झाले असे की, सगळेच मिळून ही ‘श्रावणी’ खाऊ लागलेले आहेत. यातून स्वतःचे झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून पाहण्याचे एक निर्लज्ज निर्ढावलेपण आलेले आहे. भाषेचा स्तर खालचाच होता त्यांचा. त्यावर टीका झाली ती योग्यच. पण जेव्हा त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करतात, तेव्हा त्यातून त्यांच्या निर्ढावलेपणाची पातळीच दिसत असते.

...........................................................................................................................................

सहिष्णुता, सभ्यता, सुसंस्कृतता, समंजसपणा या मूल्यांना राजकीय पर्यावरणात तेव्हा मोल होते. राजकीय पर्यावरणात सभ्यासभ्यतेच्या तराजूत सभ्यतेचे पारडे नेहमीच जड राहिलेले होते. असभ्यांना डोक्यावर घेऊन मिरवले जात नसे. महाराष्ट्रातील मध्यमवर्गाकडून त्याची नेहमीच निर्भत्सना केली जात असे. गांधींसारख्या महात्म्यावर घाणेरडे विनोद करून खिदळणाऱ्यांचीही जाहीरपणे हे करण्याची हिंमत नसे. ते सारे ‘कुजबूज आघाड्यां’तूनच चालत असे.

ही अगदी काल-परवापर्यंतची गोष्ट. व्यासपीठावरून एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे मित्र असत. आणि त्या मैत्रीत आजच्यासारखा तोंडदेखलेपणा नसे. अनेक उदाहरणे आहेत याची. आज ते संपलेले आहे. राजकारण हा जेव्हा ‘पोटार्थी व्यवसाय’ होतो, तेव्हा पहिला बळी ‘साधनशुचिते’चा जातो. आता तर राजकीय पक्षांचे ‘टोळीकरण’ झाले आहे. परिणामी व्यवसायातील गळेकापू स्पर्धेने ‘टोळीयुद्धा’चे स्वरूप घेतलेले आहे.

महाराष्ट्रात आज जे सुरू आहे, ते राजकीय टोळीयुद्ध आहे. भाषिक हिंस्त्रता हे त्यातील एक शस्त्र आहे.

या टोळीयुद्धाचे, हिंसेचे ‘सामान्यीकरण’ - नॉर्मलायझेशन - करण्यात आलेले आहे. हे सामान्यीकरण आपणांस पाहावयास मिळते घाणेरड्या वक्तव्यांवर खिदळणाऱ्या लोकांतून, समाजमाध्यमांतील जल्पकांतून - ट्रोल्समधून. जल्पकांच्या झुंडीच्या झुंडी येथे तयार झालेल्या आहेत. या जल्पकझुंडींनी समाजाचे कोणतेही अंग ठेचून काढणे सोडलेले नाही.

कोण असतात हे जल्पक?

...........................................................................................................................................

राज ठाकरे हल्लीच्या ‘राजकीय संस्कृती’वर सातत्याने टीका करत असतात. परवा त्यांनी एक सवाल केला - ‘राजकारण्यांनाच ‘कॅरेक्टर’ उरले नाही, तर शहरांना कोठून येणार?’ येथे ते राजकीय नेत्यांचे चारित्र्य, सुसंस्कृतता, सभ्यता यांबाबत बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी ‘राजकीय मंचावर मुलींना नाचवणे याला ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’ म्हणतात का?’, असा सवाल केला होता. राज ठाकरे यांचे राजकारण, त्यांच्या बदलत्या भूमिका, त्यासाठी केलेली वैचारिक कसरत, हे सारे बाजूला ठेवून पाहिले, तर त्यांचा हा वैताग योग्यच दिसतो. त्या मागे नैतिक बळ असते, तर तो वांझ ठरला नसता.

...........................................................................................................................................

राजकीय पक्षांचे आयटी सेल नामक ‘हिटमेन’ सोडा, ते भाडोत्रीच असतात. मुद्दा आहे स्वतःच्या पैशाने डेटा विकत घेऊन राजकीय पक्षांसाठी भाषिक मारामाऱ्या करत फिरणाऱ्या लोकांचा. हे लोक आपल्यातीलच आहेत. ते निर्बुद्ध नाहीत, अडाणी नाहीत. ते बेरोजगारच असतात असे नाही. त्यांत नोकरीधंदेवाले आहेत. त्यांत उच्चशिक्षित आहेत. साधारणतः ‘ह्युमॅनिटीज’च्या, मानव्यशास्त्रांच्या शिक्षणापासून दूर राहिलेले लोक यांत अधिक संख्येने दिसतात. यांत सीए, अभियंते, वैद्यकीय व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील लोक अशांची संख्या मोठी आहे.

हा सारा ‘मॉलगामी मध्यमवर्ग’. जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणातून येथे जो नवमध्यमवर्ग उभा राहिलेला आहे, त्याची आर्थिक स्थिती बरी वा चांगली आहे; पण सांस्कृतिकदृष्ट्या तो ‘अरत्र ना परत्र’ असा झालेला आहे. तो लोंबकळणारा आहे. मुळे हरवलेला आहे. जागतिकीकरणाच्या बुलडोझरखाली होत असलेले ‘सांस्कृतिक सपाटीकरण’ तो पाहात आहे. तो भेदरलेला आहे. भय सपाटीकरणाचे आहे, ओळख हरवण्याचे आहे. आज जे आहे ते या जागतिकीकरणाच्या रेट्यात गमावले, तर जाणार नाही ना, याचे आहे.

अमेरिकेतील सरकार काही निर्णय घेते आणि इकडे सेवाक्षेत्रातील वा आयटीक्षेत्रातील अनेकांच्या नोकऱ्या जातात. हे घडताना तो पाहत आहे. दुसरीकडे याच समाजात असा एक वर्ग आहे की, ज्याच्या डोळ्यांदेखत आपल्यातलेच इतर कोणी वर जात आहेत आणि तो मात्र आहे तेथेच वा त्याहून खाली जात आहे. पिकले फळ ओंजळीत पडावे, तसा हा वर्ग जागतिकीकरणानंतर येथील धार्मिक राष्ट्रवाद्यांच्या ओंजळीत पडलेला आहे. त्याच्यासमोर शत्रू उभा करणे, हेच एकमेव काम करायचे होते. ते अवघड नव्हते. हे असे शत्रू उभे केले गेले. परधर्मातील, परजातीतील, परभाषिक, भिन्न प्रकारचा आहार करणाऱ्यांतील… नाना प्रकारचे शत्रू. त्यांचे भय दाखवून एक अत्यंत घाबरलेला, आणि म्हणून अधिकाधिक हिंस्त्र होत चाललेला समाज येथे निर्माण करण्यात आला आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या अशा घाबरट परंतु हिंस्त्र व्यक्ती मग आंतरजालातील अनामिकतेचा फायदा घेत कोणालाही धमक्या देतात, शिव्या देतात. लोकांचे चारित्र्यहनन करतात. तुम्ही काहीही लिहा, काहीही म्हणा, हे त्यास भलतेच फाटे फोडून तुमच्याविरोधात तेथे बरळणारच. हीच ती जल्पना. ती केवळ राजकीय क्षेत्रापुरतीच राहिलेली नाही.

राजकारण हे एरवीही सर्वव्यापी असते. सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही जल्पकांच्या झुंडींची कोल्हेकुई चाललेली आहे. एक अत्यंत हिंसक वातावरण त्यांनी निर्माण केलेले आहे. आणि या जल्पकांना - मग ते आंतरजालातील असोत वा समाजातील - जे हवे ते राजकीय नेते करत आहेत. शिवराळांचा शिमगा हा त्याचाच उत्सव आहे.

राज ठाकरे म्हणतात, सगळ्या राजकारणाचा विचका झाला आहे. मोदीही तेच म्हणतात. शरद पवारही तेच म्हणतात. उद्धव ठाकरेही तेच म्हणतात. सगळ्यांचेच या बाबत एकमत आहे. सगळे सत्ताकारण, समाजकारण, संस्कृतीकारण हे - अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर - ‘फोकनाडांची फालमफोक’ बनलेले आहे.

मग यातील प्रामाणिक कोण? कोणाला खरोखरच समाजाची चिंता आहे? कोणाला खरोखरच राजकारणीतील सभ्यता पुन्हा हवी आहे?

या सर्व विचक्याचा सर्वाधिक फायदा करून घेणारे राजकीय पक्ष आणि नेते कोण आहेत ते शोधा. खरे समाजद्रोही कोण, ते समजेल.

.................................................................................................................................................................

लेखक रवि आमले ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांची ‘रॉ - भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ आणि ‘परकीय हात’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

ravi.amale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......