म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही
ग्रंथनामा - झलक
जनार्दन वाघमारे
  • ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश : प्रारंभापासून २०२२पर्यंतचा कालखंड’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 20 October 2024
  • ग्रंथनामा झलक फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश Phoole-Ambedkari Vangmayakosh

‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश : प्रारंभापासून २०२२पर्यंतचा कालखंड’ या डॉ. महेंद्र भवरे यांनी संपादित केलेल्या कोशाने मराठी साहित्यात महत्त्वाची आणि मोलाची भर घातली आहे. नुकत्याच डायमंड पब्लिकेशन, पुणेतर्फे प्रकाशित झालेल्या या कोशाला ज्येष्ठ अभ्यासक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

 .................................................................................................................................................................

मराठीतील कोशवाङ्मयात डॉ. महेंद्र भवरे यांनी संपादित केलेल्या ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ या कोशाने महत्त्वाची भर घातली आहे. त्यामध्ये जवळपास साडेपाचशे साहित्यिकांची माहिती देण्यात आली आहे. जवळपास एक दीड हजार पृष्ठांमध्ये फुले-आंबेडकरी साहित्यिकांची दुर्मीळ माहिती त्यात देण्यात आली आहे. संपादक डॉ. महेंद्र भवरे व संपादक मंडळावरील त्यांच्या सहकार्‍यांनी हा वाङ्मयकोश तयार करण्यासाठी महाप्रयास केलेला आहे. प्रा. महेंद्र भवरे यांनी या वाङ्मयकोशामागची भूमिकाही स्पष्ट केलेली आहे.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले वाङ्मय हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. ते बहुजनांचे साहित्य आहे. त्यापूर्वीचे मराठी साहित्य हे मुख्यतः अभिजनांचे साहित्य होते. मराठी सारस्वतांमध्ये या सहित्याचे दालन अतिशय महत्त्वाचे आहे यात शंका नाही. म. फुले-आंबेडकरी वाङ्मय हे परिवर्तनवादी वाङ्मय आहे. बाबूराव बागूल या दलित लेखकाने दलित साहित्याचे वर्णन ‘क्रांतिविज्ञान’ या शब्दात केले होते. त्या वाङ्मयात समाजक्रांतीच्या प्रेरणा आहेत याचा वाचकांना प्रत्यय येतो.

म. फुले हे मराठी साहित्यातले ‘वॉल्टेर’ होते यात शंका नाही. ते स्वतः एक सिद्धहस्त लेखक, कवी, शाहीर आणि नाटककार होते. विद्रोह आणि विवेकाचा वाङ्मयीन आविष्कार त्यांच्या लेखनात झालेला आढळतो. चातुर्वर्ण्यावर त्यांनी हल्लाबोल केला. रूढी-परंपरा आणि कर्मकांडांवर त्यांनी कठोर प्रहार केले. खरे तर ते मूर्तिभंजक होते. शूद्रातिशूद्रांच्या उन्नतीसाठी त्यांनी सर्वस्व वाहिले. ते क्रांतिकारक समाजसुधारक होते. समाजात त्यांना आमूलाग्र बदल हवा होता. त्यासाठी त्यांनी १८७३ साली ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ त्यांनी लोकांना समजावून सांगितला. अविद्येमुळेच बहुजनांची मती, नीती, गती व वित्त गेल्याचे त्यांनी कंठरवाने सांगितले. शिक्षणाशिवाय हे सर्व अनर्थ संपणार नाहीत म्हणून त्यांनी शिक्षणप्रसाराचे काम हाती घेतले. सावित्रीबाईंनी त्यांना समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर साथ दिली. त्या कवयित्रीही होत्या. म. फुले यांनी निर्माण केलेले वाङ्मय आणि त्यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेले सत्यशोधकी वाङ्मयात बहुजनांचे सांस्कृतिक संचित आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खरे तर सत्यशोधकी साहित्याची दखल मराठी समीक्षकांनी घेतली नाही. अनुल्लेखाने त्याला मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण हे साहित्य अतिशय ज्वालाग्राही साहित्य आहे. म. फुल्यांच्या प्रेरणेतून समाजाच्या खालच्या थरातून लेखक पुढे आले. त्यात नकार, निषेध व विद्रोह भरपूर प्रमाणात आहे. सत्यशोधकी वाङ्मयकोश तयार करण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे. खरे तर सत्यशोधकी साहित्यात पुढच्या ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी साहित्य चळवळींची बीजे आहेत.

गोपाळबाबा वलंगकर यांचा मी येथे आवर्जून उल्लेख करू इच्छितो. म. फुल्यांपासून त्यांनी प्रेरणा घेतल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार व वलंगकर हे मित्र होते. वलंगकरांनी ‘अनार्य दोष परिहारक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली होती. अस्पृश्यता निर्मूलनावर या संस्थेचा भर होता. या संस्थेने, ‘सामाजिक सुधारणा केल्याशिवय तुम्हाला राजकीय सुधारणा करण्याचा काय अधिकार आहे?’ असा एक लेखी प्रश्न काँग्रेसला उद्देशून विचारला होता. गोपाळबाबा वलंगकरांनी ‘विटाळ विध्वंसन’ (१८८९) हे पुस्तक लिहिले होते. त्यामागे म. फुल्यांच्या प्रेरणा होत्या.

शिवराम जानबा कांबळे यांचाही या संदर्भात मी उल्लेख करू इच्छितो. त्यांनी ‘श्री शंकर प्रासादिक हितचिंतक समाज’ या नावाची संस्था स्थापन केली होती. त्यांनी ‘सोमवंशीय मित्र’ या नावाचे एक नियतकालिकही १९०८ मध्ये सुरू केले होते. ‘मुरळी’ या प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या समाजसुधारणेच्या कामाबद्दल सयाजीराव महाराज गायकवाडांनी १९०८मध्ये बडोदा दरबारात यथोचित सन्मान केला होता. वलंगकर व शिवराम जानबा कांबळे यांच्याकडे ‘माईल स्टोन’ म्हणून पाहिले पाहिजे.

दलित चळवळीमागे महात्मा फुल्यांच्या प्रेरणा होत्या, तशा त्या ग्रामीण व स्त्री चळवळीमागेही होत्या. ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे महात्मा फुल्यांच्या प्रेरणेतून लिहिलेले पुस्तक होते. पंडिता रमाबाई यांच्या नावाचाही या संदर्भात उल्लेख केला पाहिजे. महात्मा फुल्यांनी स्त्रीला पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानले होते.

स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक फार मोठे सत्यशोधक होते. महात्मा फुल्यांना त्यांनी गुरू मानले होते. ‘शूद्र कोण होते?’ हा ग्रंथ त्यांनी म. फुल्यांना अर्पण केलेला आहे. त्यांनी १९२४मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभेची’ स्थापना केली. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हा घोषमंत्र त्यांनी या संस्थेला दिला. या घोषमंत्राने दलित चळवळीला ऊर्जा पुरवली. बाबासाहेब हे क्रांतिशोधक होते.

.................................................................................................................................................................

व्यवस्थेला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे करून प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य दलित लेखकांच्या पहिल्या पिढीनेच दाखवले. ‘दलित पँथर’सारखी आक्रमक संघटना एकोणीसशे सत्तरच्या दशकारंभीच स्थापन करण्यात आली. दलित पँथर हे ‘ब्लॅक पँथर’पासून सुचलेले नाव आहे. पहिल्या पिढीतील दलित लेखक हे बहुधा पँथर होते. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी आकाशच पेटविले. दलित पँथरच्या चळवळीमुळे दलित साहित्याची चळवळ वाढीस लागली. या चळवळीमुळे अनेक लेखक पुढे आले. बाबुराव बागूल, दया पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अरूण कांबळे, अर्जुन डांगळे, केशव मेश्राम, वामन होवाळ, यशवंत मनोहर, योगीराज वाघमारे, उर्मिला पवार, त्र्यंबक सपकाळे, वामन निंबाळकर, प्र. ई. सोनकांबळे, लक्ष्मण माने, दत्ता भगत, लक्ष्मण गायकवाड असे अनेक लेखक पुढे आले. त्यांनी एक काफिलाच निर्माण केला.

.................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ललित वाङ्मय निर्माण केले नाही. ते कवी, कथाकार, कादंबरीकार किंवा नाटककार नव्हते. मात्र त्यांनी विपुल प्रमाणात वैचारिक साहित्य निर्माण केले आहे. समाज परिवर्तनाची ताकद त्यांच्या वैचारिक साहित्यामध्ये आहे. त्यांचे सर्व तत्त्वचिंतन व समाजचिंतन त्यात आहे. ते एक फार मोठे तत्त्वज्ञ होते. त्यांचे तत्त्वज्ञान हे केवळ विचारविश्वात विहार करणारे तत्त्वज्ञान नव्हते. ते अवतीभवतीचे जग बदलणारे तत्त्वज्ञान होते.

“The philosophers have Only interpreted the world in various ways, the point, however, is to Change it”, असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. तत्त्वचिंतनातून परिवर्तन कसे होईल हा मार्क्सच्या समोरचा प्रश्न होता. तोच प्रश्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरदेखील होता. या दोघांनीही आपल्या विचारसामर्थ्यावर परिवर्तन घडवून आणले. ‘Knowledge is power’ याचा प्रत्यय श्रेष्ठ दर्जाचे वैचारिक वाङ्मय वाचल्यानंतर येतो. वैचारिक लेखन हे ज्ञानसत्ता प्रस्थापित करत असते.

खरे तर परिवर्तनासाठी वैचारिक साहित्याचीच गरज असते हे ओळखूनच बाबासाहेबांनी त्याची निर्मिती केली. पण बाबासाहेबांना ललित साहित्याचीही आवड होती. ललित वाङ्मय व ललित कला ह्या दोहोंमध्येही त्यांना रस होता. जीवनाच्या सर्जनासाठी त्यांची आवश्यकता आहे, हे त्यांना पटले होते. त्यांना संवेदनशील मन लाभले होते. लहानपणापासूनच ते कलासक्त होते. त्यांना वाङ्मयाची मनापासून आवड होती. विद्यार्थी असताना शेक्सपियरचे काव्य त्यांनी वाचले होते. शेक्सपियरच्या ‘किंग लियर’ या नाटकावरून ‘शहाणी मुलगी’ या नावाचे प्रहसन त्यांनी १९१२मध्ये लिहिले होते.

‘Light of Asia’ हे एडविन अर्नाल्डचे बुद्धांवरचे काव्य त्यांनी वाचले होते. १९५४मध्ये त्यांनी गौतम बुद्धांचे चित्र रेखाटले होते. त्याला त्यांनी ‘Lord Buddha - The Light of the World’ हे नाव दिले होते. ‘Light of Asia’ या नावावरूनच त्यांना ते सुचले असावे असा माझा तर्क आहे. अर्जुन केळुसकरांच्या ‘भगवान बुद्धांचे चरित्र’ या पुस्तकाने तर त्यांच्या मनाचा ठाव घेतला होता. केळुसकर हे सत्यशोधक होते. ‘लाईफ ऑफ टॉलस्टॉय’, ‘ला मिझराबेल्स्’ (व्हिक्टर ह्यूगो) आणि थॉमस हाडींची ‘फार फ्रॉम दीमॅडिंग क्राऊड’ ही कादंबरी, या पुस्तकांनी तर त्यांना रडवले होते. साहित्य हे समाज घडवते यावर त्यांची नितांत श्रद्धा होती.

बाबासाहेबांनी संतकाव्य एकाग्र चित्ताने वाचले होते. विशेषतः संत तुकारामांच्या अभंगांचा त्यांच्या मनावर परिणाम होता. कबीरांना तर त्यांनी गुरू मानले होते. मुल्कराज आनंद यांची ‘अनटचेबल’ ही कादंबरी त्यांनी वाचली होती. एकदा विदर्भ साहित्य संघासमोर भाषण करत असताना डॉ. आंबेडकर साहित्यिकांना उद्देशून म्हणाले होते, ‘‘मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचे आहे की, उदात्त जीवनमूल्ये व सांस्कृतिक मूल्ये यांचा आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कार करा. आपले लक्ष्य आकुंचित, मर्यादेत ठेवू नका. ते विशाल बनवा. आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका. तिचा विस्तार होऊ द्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरती बंदिस्त करू नका. तिचे तेज खेड्यापाड्यांतील अंधार दूर होईल असे प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांचे, दलितांचे फार मोठे जग आहे, हे विसरू नका.’’ दलित साहित्यामागे बाबासाहेबांचे विचार व प्रेरणा उभ्या आहेत.

१५ ऑगस्ट, १९५० रोजी अ‍ॅड. भंडारे आणि अ‍ॅड. बी. सी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे ‘दलित साहित्य संघ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेच्या वतीने दलित साहित्य संमेलन होणार होते. बाबासाहेबांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार होते. पण त्यांच्या निधनामुळे ते पुढे ढकलण्यात आले. २ मार्च १९५८ रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. हे पहिले दलित साहित्य संमेलन होते. तेव्हापासून ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला. दलित साहित्य संघाला बाबासाहेबांच्या शुभेच्छा लाभणार होत्या.

प्राचार्य म. भि. चिटणीस यांनी ‘युगयात्रा’ नावाचे नाटक लिहिले होते. त्याचा पहिला प्रयोग १४ एप्रिल, १९५५ रोजी बोधी मंडळाच्या वतीने औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयात झाला होता. मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बसवले होते. बाबासाहेबांची उपस्थिती त्याला लाभली होती. कलावंतांसोबत त्यांचा फोटोही काढण्यात आला होता. २० नोव्हेंबर १९५५ रोजी ‘युगयात्रा’ या नाटकाचा दुसरा प्रयोग खास बाबासाहेबांसाठी झाला. तो बाबासाहेबांना खूप आवडला होता. त्याच वेळी त्यांनी ‘दीक्षाभूमीवर या नाटकाचा प्रयोग करा’ असे भालचंद्र वराळे यांना सांगितले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी सपत्निक नागपूर येथे दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसहित बुद्धधर्माची दीक्षा घेतली. प्राचार्य म. भि. चिटणिसांनीही त्याच वेळी बौद्धधर्म स्वीकारला. आणि त्याच दिवशी रात्री दीक्षाभूमीवर म. भि. चिटणीसांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रयोग झाला. त्यास बाबासाहेब सपत्निक उपस्थित होते. ‘युगयात्रा’ हे एका अर्थाने महानाट्य ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष होते. ‘Buddha and His Dhamma’ हे बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांचे ‘Magnum Opus’ आहे. अतिशय प्रासादिक अशा इंग्रजी भाषेत त्यांनी ते लिहिले आहे. ती एक महान साहित्यकृती आहे असे मला वाटते.

सत्यशोधकी आणि दलित साहित्याचे वैशिष्ट्य असे की, हे दोन्ही साहित्य चळवळीतून निर्माण झालेले साहित्य आहे. या चळवळींनी साहित्याला शक्ती दिली आणि साहित्याने चळवळींना सामर्थ्य दिले. म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने अनेक दलित व दलितेतर साहित्यिकांनी मराठी साहित्यात फार मोठी भर घातली आहे. अशा साहित्यिकांची माहिती ‘फुले- आंबेडकरी वाङ्मयकोशा’त मिळते. एक संदर्भ ग्रंथ म्हणून या वाङ्मयकोशाला निश्चितच महत्त्व प्राप्त होणार आहे.

अशा वाङ्मयकोशाबरोबर वाङ्मय इतिहासालादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुले-आंबेडकरी साहित्याचा इतिहासदेखील लिहिणे आवश्यक आहे. साहित्य इतिहास म्हणजे काय? साहित्य इतिहास म्हणजे एका अर्थाने साहित्यिकांची जीवन चरित्रे. त्यांची जीवन चरित्रे ही त्यांच्या साहित्यकृतीतून व्यक्त झालेली असतात. म्हणून त्या साहित्याकृतींविषयीही लिहिणे आवश्यक असते. एका बाजूने साहित्यिकांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र असते आणि दुसर्‍या बाजूने ते त्यांच्या काळाशी बांधले गेलेले असते.

.................................................................................................................................................................

निग्रो चळवळीला ‘ब्लॅक पँथर’ हे नाव देण्यात आले. ती अतिशय आक्रमक अशी चळवळ होती. निग्रो साहित्य देखील अतिशय आक्रमक होते. अमेरिकेतून परत आल्यानंतर डॉ. वानखडे यांनी मिलिंद महाविद्यालयात मराठी साहित्यावर एक चर्चा घडवून आणली. त्या चर्चेत प्राचार्य म. भि. चिटणीस, वा. ल. कुलकर्णी, मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, भालचंद्र फडके व स्वतः प्राचार्य डॉ. म. ना. वानखडे यांनी भाग घेतला. निग्रो साहित्य चळवळीचा प्रभाव डॉ. वानखडे यांच्यावर होताच. महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ सुरू करावी असे त्यांना वाटले. त्यांनी आयोजित केलेल्या साहित्य चर्चेचे फलित म्हणजे ‘अस्मिता’ ही पत्रिका. पुढे तिचे नाव बदलून ‘अस्मितादर्श’ हे नाव द्यावे लागले. प्रा. रा. ग. जाधव हे पहिले संपादक, त्यांनी मिलिंद महाविद्यालय सोडले आणि त्यांच्या ठिकाणी प्रा. गंगाधर पानतावणे आले. दलित साहित्याच्या चळवळीमध्ये ‘अस्मितादर्श’ चा सिंहाचा वाटा आहे. 

.................................................................................................................................................................

साहित्याच्या इतिहासात व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ अशा दोन्ही घटकांचा समावेश असतो. त्यांचे साहित्य हे समकालीन संस्कृती व समाजाचे अविभाज्य अंग असते. ते तिचे दर्पणच असते. एखादी साहित्यकृती लिहून तयार झाली की, ती तिच्या लेखकापासून स्वतंत्र होते. तिला स्वतंत्र अस्तित्व व अस्मिता लाभते. तिची नाळ तिच्या निर्मिकांशी असली तरी तिला स्वतःचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व लाभते. साहित्याचा इतिहास हा सामान्य इतिहासाचा व्यवच्छेदक भाग असतो. त्यावर तो अधिक प्रकाश टाकतो. त्याचे अंतरंग तो उलगडून दाखवितो.

प्रत्येक लेखक हा आपल्या काळाचा व संस्कृतीचा प्रतिनिधी असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व हे तो ज्या काळात जगतो त्याची निर्मिती असते, प्रतिभाशाली लेखक हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचे रोपण आपल्या काळावर करीत असतो. साहित्याचा इतिहास हा खरेतर त्याच्या संस्कृतीच्या उत्क्रांतीचा इतिहास असतो, म्हणून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते.

फुले-आंबेडकरी साहित्याच्या लेखकांनी साहित्य-संस्कृतीला जे योगदान दिले आहे ते समजून घेण्यासाठी डॉ. महेंद्र भवरे रचित वाङ्मयकोश अतिशय उपयुक्त ठरणार आहे. १९५६नंतर उदयास आलेल्या दलित साहित्याचे सिंहावलोकन त्यात आहे. सहा-सात दशकांपासून महाराष्ट्रात या साहित्याची चर्चा चालू आहे. म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांनाही मानवमुक्तीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांना आपले सगळे जीवन युद्धक्षेत्रावरच घालवावे लागले. डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे- ‘‘Ours is a battle... for the reclamation of the human personality.”

त्यांचा हा महासंगर दलित साहित्याचा अक्षय प्रेरणा स्त्रोत बनला. त्यांच्या जीवन कार्यावर आजपर्यंत विपुल लेखन झाले. एकही दलित कवी असा नसेल की ज्याने बाबासाहेबांवर किमान एकतरी कविता केलेली नसेल. ‘‘उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे’’, वामन कर्डकांच्या या एका ओळीत बाबासाहेबांच्या कार्याची महानता सांगता येईल.

महाराष्ट्रात परिवर्तनवादी साहित्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म. फुल्यांनी केली. डॉ. आंबेडकरांनी विसाव्या शतकात वैचारिक साहित्याचा गौरीशंकर उभा केला. म. फुले हे एकोणिसाव्या शतकातले क्रांतिकारक तर डॉ. आंबेडकर हे विसाव्या शतकातले क्रांतिनायक. बाबासाहेबांच्या हयातीतच दलित साहित्य चळवळीचा आरंभ झाला. डॉ. भवरे यांनी आंबेडकरांच्या कार्याला ‘मिशन वर्क’ म्हटले आहे.

आंबेडकरवादी साहित्य हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे. त्यांचा लढा हा चांगले नाव धारण करण्यापासूनच सुरू होतो. नावातून अस्मिता प्रतिबिंबित झाली पाहिजे.

तळागाळातील समाजाच्या सामाजिक जाणिवा जसजशा जागृत होतात आणि पुढे प्रखर होतात तसतसे त्यांना आपल्या नावात बदल करण्याची आवश्यकता भासते. या बाबतीत अमेरिकन निग्रो आणि भारतीय दलित यांच्यात बरेच साम्य आढळते. स्वाभिमान दर्शविणार्‍या नावाचा शोध घ्यावा लागतो आणि त्यासाठी संघर्षही करावा लागतो. तोंडावरचे डाग पुसणे अतिशय अवघड असते.

अमेरिकन निग्रोंना सुरुवातीच्या काळात गोरे लोक ‘कलर्ड’ (coloured) म्हणत असत. नंतर ‘निग्रो’ हे नाव त्यांना देण्यात आले. पण त्या नावाचे गोर्‍यांनी विकृतीकरण केले. ‘निग्गर’ हे नाव ते त्यांच्यासाठी वापरू लागले. ‘निग्गर’ या नावाला हीनत्व चिटकवले होते. त्यांचा उपमर्द करण्यासाठीच गोरे लोक त्यांना ‘निग्रो’ ऐवजी ‘निग्गर’ म्हणू लागले. निग्रोंनी त्याचा विरोध केला. Negro हे नाव लिहीत असताना ते त्यांना कमीपणा आणण्यासाठी negro असे लिहीत असत.

खरे तर ‘n’ हे अक्षर ‘N’ असे कॅपिटल लेटरमध्ये लिहिणे आवश्यक होते. पण गोरे ‘n’ हे लहान अक्षर मुद्दाम वापरू लागले. कॅपिटल ‘N’ साठी निग्रोंना संघर्ष करावा लागला. गोर्‍यांचे त्यांनी छापखाने जाळले. ‘निग्रों’ हे नाव १९३०-३५ पर्यंत प्रचलित होते. पुढे त्यांनी स्वतःला ‘Black’ (काळे) म्हणायला सुरुवात केली. आपल्या काळ्या रंगाचा त्यांना अभिमान वाटू लागला होता. ‘Black is beautiful’ ही चळवळ त्यांनी सुरू केली. दुसर्‍या महायुद्धानंतर ते स्वतःला ‘Afro-American’ म्हणू लागले.

.................................................................................................................................................................

माणसाची व त्याच्या समाजाची ओळख ही त्याच्या नावापासूनच होत असते. म्हणून ती बदलणे आवश्यक होते. स्वतः आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी निरनिराळी नावे वापरावयाचा प्रयत्न केला आहे. अस्पृश्य, निराश्रित, बहिष्कृत, प्रोटेस्टंट हिंदू आदि नावे त्यांनी वापरली आहेत. शेवटी ‘दलित’ हे नाव स्थिर झाले. आज ते आंबेडकरी समाज या नावाने ओळखले जातात. दक्षिणेत ‘आदि हिंदू’ हे नाव प्रचलित होते. अस्पृश्यांसाठी कोणते नाव वापरावे हा सवर्णांपुढेही प्रश्न होता. अस्पृश्यांना ‘अस्पृश्य’ म्हणण्याऐवजी ‘पूर्वास्पृश्य’ म्हणावे असे सावरकरांचे मत होते. ते स्वतः हेच नाव वापरत होते. म. गांधींनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ हे नाव दिले. १९३३ साली त्यांनी ‘हरिजन’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी ‘हरिजन’ हे नाव प्रचलित केले. पण दलितांना हे नाव मान्य झाले नाही. दलितांनी निर्माण केलेल्या साहित्याला कोणते नाव द्यावे याच्यावरही बराच खल झालेला आहे. बौद्ध साहित्य, दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य अशा निरनिराळ्या नावांवर खूप चर्चा झालेली आहे.

.................................................................................................................................................................

आफ्रिका हा त्यांचा मूळचा देश. त्यांची मायभूमी! ते आपल्या मातृभूमीला विसरू शकत नव्हते. म्हणून त्यांनी ‘American’  या नावाला ‘Afro’ (Africanचे संक्षिप्त रूप) या नावाची जोड दिली. नंतर काही वर्षांनी त्यांनी ‘Afro’ या संक्षिप्त नावाऐवजी ‘African’ हा पूर्ण शब्द वापरावयाला सुरुवात केली. ‘Afro’ हे अपूर्ण नाव कशासाठी ‘African-American’  हे नाव ते वापरू लागले. आपण ‘African’ही आहोत आणि ‘American’ही आहोत हे ते अभिमानाने सांगू लागले. नावात माणसाची केवळ ओळखच नसते तर त्यात त्याची अस्मिताही असते. याच काळात ते ‘We shall overcome’ हे गीत गाऊ लागले. काळ्या रंगामुळे निर्माण झालेल्या न्यूनगंडावर त्यांनी मात केली. काळ्या रंगाचे गौरवीकरण त्यांनी केले.

भारतीय दलितांच्या समोरही नावाचा प्रश्न सुरुवातीपासून होता. ते बहिष्कृत होते, अस्पृश्य होते. ते वेगवेगळ्या जातीत विभागले गेले होते. त्यांना घाणेरडे धंदे करणे भाग होते. महार, मांग, चांभार, ढोर या नावांनी ते ओळखले जात होते. वेगवेगळ्या प्रांतात ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात होते. अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत या जातिवाचक नावांचा उपयोग केला जात होता. ‘सवर्ण हिंदू’ या नावांची विकृती करून त्यांना संबोधित होते. पावलोपावली त्यांचा उपमर्द व तिरस्कार केला जात होता. अस्पृश्य वर्गीयांची वैयक्तिक नावेही हीन स्वरूपाचीच असायची. वैयक्तिक नाव तर अतिशय महत्त्वाचे असते. त्यांना चांगले कपडे वापरण्याचा अधिकार नव्हता. चांगले अन्न खाण्याची परवानगी त्यांना नव्हती. दागिने वापरण्याचा अधिकार नव्हता. अतिशय हीन दर्जाची वागणूक त्यांना देण्यात येत असे. स्वाभिमानाने त्यांना जगता येऊ नये अशीच सर्व व्यवस्था होती.

माणसाची व त्याच्या समाजाची ओळख ही त्याच्या नावापासूनच होत असते. म्हणून ती बदलणे आवश्यक होते. स्वतः आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी निरनिराळी नावे वापरावयाचा प्रयत्न केला आहे. अस्पृश्य, निराश्रित, बहिष्कृत, प्रोटेस्टंट हिंदू आदि नावे त्यांनी वापरली आहेत. शेवटी ‘दलित’ हे नाव स्थिर झाले. आज ते आंबेडकरी समाज या नावाने ओळखले जातात. दक्षिणेत ‘आदि हिंदू’ हे नाव प्रचलित होते.

अस्पृश्यांसाठी कोणते नाव वापरावे हा सवर्णांपुढेही प्रश्न होता. अस्पृश्यांना ‘अस्पृश्य’ म्हणण्याऐवजी ‘पूर्वास्पृश्य’ म्हणावे असे सावरकरांचे मत होते. ते स्वतः हेच नाव वापरत होते. म. गांधींनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ हे नाव दिले. १९३३ साली त्यांनी ‘हरिजन’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी ‘हरिजन’ हे नाव प्रचलित केले. पण दलितांना हे नाव मान्य झाले नाही.

दलितांनी निर्माण केलेल्या साहित्याला कोणते नाव द्यावे याच्यावरही बराच खल झालेला आहे. बौद्ध साहित्य, दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य अशा निरनिराळ्या नावांवर खूप चर्चा झालेली आहे. ‘दलित साहित्य’ हे नाव आंबेडकर असतानाच प्रचलित झाले होते. १५ ऑगस्ट, १९५० रोजी ‘दलित साहित्य संघ’ स्थापण्यात आला. या संघटनेतर्फे साहित्य संमेलन घेण्यास बराच उशीर झाला. त्याचे उद्घाटन बाबासाहेबांच्या शुभहस्तेच होणार होते; पण त्यांच्या दुःखद निधनामुळे ते होऊ शकले नाही. पुढे ते २ मार्च १९५८ रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या हस्ते झाले. पण दलित साहित्याची चळवळ खर्‍या अर्थाने सुरू व्हायला उशीर झाला.

दलित साहित्याच्या निर्मितीमध्ये औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेजचे पहिले प्राचार्य म. भि. चिटणीस यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकाने दलित साहित्याला प्रेरणा दिली. दलित साहित्य चळवळीत त्याने प्रेरकाचे काम केले. १९६०च्या दशकात चिटणिसांनी मिलिंद महाविद्यालयाचा वार्षिकांक दलित विद्यार्थ्यांना लिहिण्याच्या प्रेरणा देऊन काढला होता. ते मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलसचिव होते. त्यांच्यानंतर मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. म. ना वानखडे हे झाले. त्यांनी १९६४-६५ या वर्षाच्या आगेमागे अमेरिकेला जाऊन वॉल्ट व्हिटमनच्या काव्यावर पीएच.डी. ही पदवी मिळवली. त्या वेळी अमेरिकेत निग्रो साहित्याची चळवळ जोरात चालू होती. त्यांनी ती जवळून पाहिली होती. निग्रोची नागरी अधिकारांची चळवळ व साहित्याची चळवळ या दोन्ही चळवळी हातात हात घालून जोमाने चालत होत्या.

.................................................................................................................................................................

निग्रो हे अमेरिकेचे रूपक, तर दलित हे भारताचे रूपक. निग्रो हा रंगभेदाचा बळी आहे तर दलित हा जातिभेदाचा बळी आहे. दोघांच्याही साहित्यात नकार, निषेध व विद्रोह आहे. दोघांचेही साहित्य हे अस्मितेचे साहित्य आहे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे आणि ना. रा. शेंडे हे सुरुवातीच्या काळातील दलित साहित्यिक. एकोणीसशे साठ व सत्तरच्या दशकात दलित साहित्य चळवळीला वेग प्राप्त झाला. देश राजकीय दृष्टीने स्वतंत्र झाला, पण दलित समाज हा सामाजिक गुलामगिरीतच होता. भूक आणि दारिद्र्य त्यांच्या दारासमोरून हटायला तयार नव्हते. धर्मांतरामुळे दलितांमध्ये नवीन जाणिवा निर्माण झाल्या पण अगतिकता संपली नाही. एकीकडे आकांक्षा आणि दुसरीकडे अगतिकता यात दलित समाज अडकलेला होता.

.................................................................................................................................................................

निग्रो चळवळीला ‘ब्लॅक पँथर’ हे नाव देण्यात आले. ती अतिशय आक्रमक अशी चळवळ होती. निग्रो साहित्य देखील अतिशय आक्रमक होते. अमेरिकेतून परत आल्यानंतर डॉ. वानखडे यांनी मिलिंद महाविद्यालयात मराठी साहित्यावर एक चर्चा घडवून आणली. त्या चर्चेत प्राचार्य म. भि. चिटणीस, वा. ल. कुलकर्णी, मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, भालचंद्र फडके व स्वतः प्राचार्य डॉ. म. ना. वानखडे यांनी भाग घेतला. निग्रो साहित्य चळवळीचा प्रभाव डॉ. वानखडे यांच्यावर होताच. महाराष्ट्रात दलित साहित्य चळवळ सुरू करावी असे त्यांना वाटले. त्यांनी आयोजित केलेल्या साहित्य चर्चेचे फलित म्हणजे ‘अस्मिता’ ही पत्रिका. पुढे तिचे नाव बदलून ‘अस्मितादर्श’ हे नाव द्यावे लागले. प्रा. रा. ग. जाधव हे पहिले संपादक, त्यांनी मिलिंद महाविद्यालय सोडले आणि त्यांच्या ठिकाणी प्रा. गंगाधर पानतावणे आले.

दलित साहित्याच्या चळवळीमध्ये ‘अस्मितादर्श’ चा सिंहाचा वाटा आहे. १९६७ साली प्राचार्य डॉ. म. ना. वानखडे यांनी मिलिंद महाविद्यालयात ‘मिलिंद साहित्य परिषद’ स्थापन केली. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी अस्मितादर्श लेखक मेळावे सुरू केले. खरे तर ती दलित साहित्य संमेलनेच होती. दलित साहित्याला त्यांनी खूप प्रेरणा दिल्या. डॉ. म. ना. वानखडे हे माझे पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. त्यांच्या प्रेरणेनेच व मार्गदर्शनाखाली निग्रो साहित्यावर पीएच. डी. करावयाचे मी ठरविले होते. दलित साहित्य चळवळ ही मिलिंद कॉलेजच्या परिसरात जन्मली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

निग्रो साहित्य हे शोषितांचे साहित्य दलित साहित्य हे देखील शोषितांचे व बहिष्कृतांचे साहित्य आहे. निग्रो आणि दलित हे दोन्हीही अल्पसंख्याक, शोषित, पीडित व वंचित. नीग्रो हे मूळचे अफ्रिकन. दलित हे भारताचे भूमिपुत्र. निग्रोंना घेट्टोंमध्ये राहावे लागले. दलितांना गावकुसाबाहेर राहावे लागले. दोघांनाही आपली ‘पायरी’ सोडता येत नव्हती. काळे हे अमेरिकेतील ‘outcast’, तर दलित हे भारतातील ‘outcaste’. दोघेही निराश्रित व गुलाम. निग्रोंना चार शतके गुलामी भोगावी लागली. दलितांवर लादलेली गुलामी अनंत काळापासून होती. तिला शाश्वत स्वरूप प्राप्त झाले होते. दोघांनीही आपल्या साहित्यात विद्रोह पेटवला.

निग्रो हे अमेरिकेचे रूपक, तर दलित हे भारताचे रूपक. निग्रो हा रंगभेदाचा बळी आहे तर दलित हा जातिभेदाचा बळी आहे. दोघांच्याही साहित्यात नकार, निषेध व विद्रोह आहे. दोघांचेही साहित्य हे अस्मितेचे साहित्य आहे. शंकरराव खरात, अण्णा भाऊ साठे आणि ना. रा. शेंडे हे सुरुवातीच्या काळातील दलित साहित्यिक.

एकोणीसशे साठ व सत्तरच्या दशकात दलित साहित्य चळवळीला वेग प्राप्त झाला. देश राजकीय दृष्टीने स्वतंत्र झाला, पण दलित समाज हा सामाजिक गुलामगिरीतच होता. भूक आणि दारिद्र्य त्यांच्या दारासमोरून हटायला तयार नव्हते. धर्मांतरामुळे दलितांमध्ये नवीन जाणिवा निर्माण झाल्या पण अगतिकता संपली नाही. एकीकडे आकांक्षा आणि दुसरीकडे अगतिकता यात दलित समाज अडकलेला होता.

ही कोंडी फोडायची कशी? ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही बाबासाहेबांनी दिलेली हाक अद्याप हवेत विरली नव्हती. शिक्षणाचा प्रसार होत होता. शिक्षणामुळे त्यांच्या दुःखाचा शब्दस्फोट होणे अटळ होते. शतकानुशतके मूक समाजाला शब्दांची ओळख झाली. त्या शब्दांनी त्याच्या दुःखाला व अगतिकतेला वाट करून दिली. हा शब्दस्फोट म्हणजेच, दलित साहित्य. ढगफुटीसारखाच हा प्रकार होता. विद्रोहाचा महापूर त्यातून वाहिला. दलित जाणिवांचा स्फोट म्हणजेच दलित कविता, कथा आणि आत्मकथने! साहित्य क्षेत्रात पूर्वी असे कधी घडले नव्हते. अशी घटना मराठी वाङ्मयाच्या इतिहासाला यापूर्वी माहीतच नव्हती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मराठी साहित्यात ‘क्रांतिपर्व’ सुरू झाले ते अशा प्रकारे. या क्रांतीचा जयघोष होता- ‘स्वातंत्र्य, समता व बंधुता!’ व्यवस्थेला नकार देण्याचे सामर्थ्य या साहित्याने दलित समाजाला दिले. या घटनेमुळे इतिहासदेखील भांबावून गेला.

व्यवस्थेला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे करून प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य दलित लेखकांच्या पहिल्या पिढीनेच दाखवले. ‘दलित पँथर’सारखी आक्रमक संघटना एकोणीसशे सत्तरच्या दशकारंभीच स्थापन करण्यात आली. दलित पँथर हे ‘ब्लॅक पँथर’पासून सुचलेले नाव आहे. पहिल्या पिढीतील दलित लेखक हे बहुधा पँथर होते. दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी आकाशच पेटविले. दलित पँथरच्या चळवळीमुळे दलित साहित्याची चळवळ वाढीस लागली. या चळवळीमुळे अनेक लेखक पुढे आले.

बाबुराव बागूल, दया पवार, राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, अरूण कांबळे, अर्जुन डांगळे, केशव मेश्राम, वामन होवाळ, यशवंत मनोहर, योगीराज वाघमारे, उर्मिला पवार, त्र्यंबक सपकाळे, वामन निंबाळकर, प्र. ई. सोनकांबळे, लक्ष्मण माने, दत्ता भगत, लक्ष्मण गायकवाड असे अनेक लेखक पुढे आले. त्यांनी एक काफिलाच निर्माण केला.

कविता, कथा आणि आत्मकथा यांनी मराठी साहित्यात दलित साहित्याचे एक नवीन दालन उभे केले. मराठी दलित साहित्याने इतर प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करणार्‍या दलित लेखकांना प्रेरणा दिल्या. १९९० हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या काळात भारतातील सर्व प्रांतात दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. साहित्याच्या माध्यमातून भारतातील सर्वच प्रांतातील दलितांना आपल्या अस्मितेचा शोध घ्यायला सुरुवात केली.

दलित साहित्याच्या अभ्यासकांना या सर्व घटनांची माहिती असली पाहिजे. म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही. डॉ. महेंद्र भवरे आणि त्यांच्या संपादक मंडळाचे मी मनापासून अभिनंदन करतो.

‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश : प्रारंभापासून २०२२पर्यंतचा कालखंड’ - संपादक डॉ. महेंद्र मारोतराव भवरे

डायमंड पब्लिकेशन, पुणे | मूल्य - ५००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......