जेव्हा तुम्ही केक खाता, तेव्हा फक्त मौज असते. आनंद असतो... टिकाऊ प्रेमाची खरी किल्ली, आयुष्यभर प्रणयभावना जपण्यातच असते...
संकीर्ण - श्रद्धांजली
द इकॉनॉमिस्ट
  • मानववंशशास्त्रज्ञ हेलेन फिशर
  • Sun , 20 October 2024
  • संकीर्ण श्रद्धाजली हेलेन फिशर Helen Fisher प्रेम Love

जगविख्यात मानववंशशास्त्रज्ञ हेलेन फिशर यांचं १७ ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकात २९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचा हा मराठी अनुवाद...

.................................................................................................................................................................

‘व्हॉट इज लव्ह? प्यार आखिर चिज क्या हैं? प्रेम ही भानगड नेमकी आहे तरी काय? कोणत्याही भाषेत विचारा. प्रश्न म्हटला तर साधा सरळ, पण भिडल्यानंतर प्रत्येकाच्या लेखी वेगळे उत्तर घेऊन येणारा. मुळात प्रेम ही एक भव्योत्तम मानवी भावना. एक अशी शक्ती वा ऊर्जा, जी जगाला व्यापून आहे. प्रेम हा एक हवाहवासा वेडाचारही. एक असा अग्नी, जो तुमच्या हृदयाला ऊबही देतो आणि तुमचे घर भस्मसातही करतो.

प्रेम हा तळाचा थांग न लागणारा समुद्र, प्रेम हे सर्वोच्च सुख, अनंत नि आंधळेदेखील. म्हणूनच प्रेमाचा प्रवाह कधीही एका लयीत झुळझुळ वाहत नाही, वाहिलेलाही नाही. म्हणूनही ज्याचे वचन उद्धृत करणे हेलेन फिशरना खासे आवडत असे, त्या एका अलास्कन सज्जनाच्या म्हणण्यानुसार, प्रेम ही ‘उकळती नि प्रस्फोटीत होऊ पाहणारी एक असा वेदना’ही आहे.

अर्थात, इतर कोणाहीप्रमाणेच (की सगळ्यांप्रमाणेच?) हेलेन फिशरबाईंच्या वाट्याला प्रेमाचे सुखही आले नि दुःखही. समाधानही आले नि वेदनाही. परंतु एक जीवशास्त्रीय मानववंशशास्त्र तज्ज्ञ या नात्याने विभिन्न भाववस्थांना तिथेच सोडून पुढच्या कामाला लागूया म्हणणाऱ्याही त्या नव्हत्या. नव्हे, त्यांचा तसा स्वभावही नव्हता. म्हणूनच, तब्बल २० वर्षं या बाईंनी जगभरातल्या विभिन्न संस्कृतीत नांदणाऱ्या माणसांच्या लैंगिक वर्तनाचा अभ्यास केला. त्यातून अखिल मानवी जातीची प्रजननाची तीव्रेच्छा सहजपणे पुढे आलीच.

पण, माणसे कशामुळे नाचतात - डोलतात, कशासाठी नि कशामुळे कविता करतात, अश्रू ढाळतात, विरहवेदना अनुभवतात, व्याकुळतात, मारले जातात मरतात ते सारे काही भलतेच होते. त्यातून जाणवले ते असे की- प्रणयोत्सुक प्रेम हे गूढरम्य होते. भयावह होते, जेव्हा ते चुकीच्या मार्गाने चालले होते. पण जेव्हा ते योग्य मार्गाने मार्गक्रमण करत होते, तेव्हा ते लोभसही होते. ते असे असे का होते, याला खरे तर काही कारण दिसत नव्हते. परंतु मेंदू विज्ञानाच्या जाणकार म्हणून एक दिवस हेलेन फिशर यांच्या हे डोक्यात आले की, वरवर आपल्याला काही कारण दिसत नसले, तरीही कारणांना जन्म देणारे घटक मानव जातीत अत्यंत बळकटपणे गुंफलेले आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रेमवीरांवर वैज्ञानिक प्रयोग

अर्थातच कारणांच्या मुळांशी जाण्यासाठी फिशर बाईंनी आपल्या दोन सहकारी संशोधकांच्या मदतीने १७ विद्यार्थी निवडले. हे सगळे ताजेताजे प्रेमात पडलेले मजनू, फरहाद किंवा रोमिओ होते. फिशर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या १७ प्रेमवीरांच्या मेंदूचा उभा आडवा छेद टिपला. म्हणजेच मेंदूचे स्कॅनिंग केले. फिशरनी या सतरांची निवड करण्याआधी पहिला प्रश्न विचारला. रोज कितीदा वा कितीवेळा हे प्रेमकैदी आपल्या लाडक्या प्रियेची आठवण काढतात? अपेक्षित म्हणता येईल असे उत्तर आले, सारा दिवस, सारी रात्र वा दिवस नाही रात्र नाही. सदानकदा प्रश्न पुढचा. मग या प्रियेसाठी तुम्ही जीवही द्याल का? प्रत्येकाकडून एका सुरात उत्तर आले- ‘हो!!’ जणू प्रत्येकाच्या प्रियतमेने त्यांच्याकडून ही अग्निपरीक्षा पार करण्याचे वचनच घेतले होते. याचा सगळ्याचा थोडक्यात अर्थ असा होता की, हे सारे प्रेमवीर संशोधनासाठी एकदम सहीसही विषयवस्तू ठरले होते.

जसे हे प्रयोगासाठी निवडलेले प्रेमवीर तपासणीसाठी एमआरआय मशीनमध्ये सरकवले गेले, तसे फिशरबाईंनी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रेमप्रकरणाचे फोटो दाखवले. यासोबत काही परिचित चेहरेही समोर धरले. जेव्हा प्रियतमांचे फोटो दाखवले, तेव्हा मेंदूतला ‘व्हेंट्रल टॅगमेंटल एरिया’ म्हणजेच मेंदूचा खालच्या अंगाला असलेला मध्यप्रदेश उजळून निघाला. याच मध्य भागात डोपामाइन संप्रेरकाची निर्मिती होत असते. हा भाग बोधन प्रक्रियेच्या केंद्रस्थानापासून बराच खालच्या स्तराला असतो. अशा वेळी घडते असे की, विशिष्ट अशा पेशी कार्यन्वित होतात, म्हणजे एखादा बेहद्द आवडीचा पदार्थ पोटात गेला किंवा अंमली पदार्थ शरीरात गेला की, या विशिष्ट पेशी ताडकन उद्दिपित होतात, तसेच याही वेळी घडले.

फिशरबाईंनी दुसरा अधिक कठोर वा क्रूर भासेल असा प्रयोग प्रेयसीने टाकून दिलेल्या १५ प्रियकारांवर केला. त्यांनी या 'प्यार में धोका खाए हुए प्रेमवीरांचे मेंदू स्कॅनरखाली ठेवले. त्यांना त्यांच्या सोडून गेलेल्या प्रेयसींचे फोटो दाखवले आणि काय चमत्कार या सगळ्या १५ प्रेमवीरांच्या मेंदूचा मध्यप्रदेश पूर्वीच्या प्रयोगापेक्षा अधिक तेजाने उजळला. आपल्या प्रेयसीला कसेही करून परत मिळवायचे आहे, अशी तीव्रता त्या उजळण्यामागे फिशरबाईंना जाणवली.

या सगळ्या प्रयोगांत प्रेमवीरांच्या वाट्याला आलेल्या वेदना नक्कीच असह्य होत्या. पण हे सगळे घडवून आणले होते कशासाठी? आणि का म्हणून हा प्रयोग फिशरबाईंसाठी खासमखास होता? एखाद्या गजबज असलेल्या रात्रीच्या पार्टीमध्ये सामील झालेला प्रत्येक जण एकाच पार्श्वभूमीचा आणि साधारणपणे एकसारखीच बौद्धिक क्षमता असलेला असताना, त्यातल्या एखाद्याचेच मन कोणाला बाहुपाशात घेण्यासाठी आतुरते, किंवा एखादी निळ्या डोळ्यांची रुपगर्विता पाहून एखाद्याच्या पोटात फुलपाखरे का उडू लागतात?

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, का एखाद्याबद्दलची प्रेमभावना नादिष्ट रूप घेते, जणू कोणीतरी तुमच्या मनात कायमस्वरूपी तंबू ठोकून बसले असावे. फिशरबाईंच्या मते, रोमॅण्टिक लव्ह अर्थात प्रणयी प्रेम ही मूलभूत प्रेरकशक्ती आहे, ती या मागे कारणीभूत आहे. हे प्रणयी प्रेम माणसाच्या मेंदूत गुंफलेले आहे. कारण, ती व्यक्ती सुयोग्य असो वा अयोग्य, आदर्श जोडीदार किंवा जोडीदारीण शोधण्यासाठी माणसाला एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. आणि एकदा का या भावनेला धग मिळाली की, ते व्यसन होऊन बसते. हेच व्यसन या पृथ्वीवरची सगळ्यात ताकदवान गोष्ट असते. असा हा सगळा प्रेमाचा प्रेमळ मामला आहे.

.................................................................................................................................................................

फिशरबाईंना प्रेमाचा गुंता सोडवू पाहणाऱ्या सर्व तत्त्वज्ञ आणि कवीमंडळींबद्दल आत्मीय सहानुभूती होती बरं का.) फिशरबाईंनी या विषयावरच्या संशोधनादरम्यान माणसामध्ये ढोबळमानाने चार प्रकारातल्या व्यक्तिमत्वे आढळतात, असे नोंदले. त्यातले पहिले- एक्सप्लोरर्स, दुसरे- बिल्डर्स, तिसरे- डायरेक्टर्स आणि चौथे- निगोशिएटर्स. म्हणजे, नवा नवा शोध घेणारे भुंगे. नात्यांची बांधणी करणारे बांधकामकर्ते. नात्यांना दिशा देणारे दिशादर्शक आणि नात्यांमध्ये वाटाघाटी करणारे वाटाघाटे. याला त्यांनी नावे दिले ‘फिशर टेंपरामेंट इन्वेन्ट्री’ (FTI) एक्सप्लोरर प्रकारातल्या माणसांमध्ये मेंदूतल्या अधिवृत्त ग्रंथींमध्ये निर्माण होणाऱ्या डोपामाइन संप्रेरकाची (हार्मोन्स) पातळी उंचावलेली असते. यामुळे ते अधिक सृजनशील (काहींच्या दृष्टीने उचापती) आणि प्रेरणादीय असतात.

.................................................................................................................................................................

प्रेमाची मेंदूशास्त्रीय उकल

अर्थात, एवढे सगळे हाती लागूनही एक गूढ मात्र काही उकलत नाही. ते म्हणजे, का म्हणून ‘एक्स’ व्यक्ती ‘वाय’ व्यक्तीकडेच आकृष्ट होते, ‘झेड’कडे का होत नाही? आणि इथेच फिशरबाई आपल्याला अधिक खोलात शिरण्याचे आवाहन करतात. २००५मध्ये या फिशरबाईंची ‘मॅच डॉटकॉम’ या ऑनलाइन जोड्या जुळवणाऱ्या कंपनीच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारपदी नेमणूक झाली, तीच मुख्यतः वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी फिशरबाईंच्या मते, हा मुद्दा मुख्यतः व्यक्तिमत्त्वाशी आणि त्या व्यक्तीमधल्या मेंदूतल्या रासायनिक प्रक्रियांशी जोडलेला असतो. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोप्रमाणे (फिशरबाईंना प्रेमाचा गुंता सोडवू पाहणाऱ्या सर्व तत्त्वज्ञ आणि कवीमंडळींबद्दल आत्मीय सहानुभूती होती बरं का.) फिशरबाईंनी या विषयावरच्या संशोधनादरम्यान माणसामध्ये ढोबळमानाने चार प्रकारातल्या व्यक्तिमत्वे आढळतात, असे नोंदले.

त्यातले पहिले- एक्सप्लोरर्स, दुसरे- बिल्डर्स, तिसरे- डायरेक्टर्स आणि चौथे- निगोशिएटर्स. म्हणजे, नवा नवा शोध घेणारे भुंगे. नात्यांची बांधणी करणारे बांधकामकर्ते. नात्यांना दिशा देणारे दिशादर्शक आणि नात्यांमध्ये वाटाघाटी करणारे वाटाघाटे. याला त्यांनी नावे दिले ‘फिशर टेंपरामेंट इन्वेन्ट्री’ (FTI) एक्सप्लोरर प्रकारातल्या माणसांमध्ये मेंदूतल्या अधिवृत्त ग्रंथींमध्ये निर्माण होणाऱ्या डोपामाइन संप्रेरकाची (हार्मोन्स) पातळी उंचावलेली असते. यामुळे ते अधिक सृजनशील (काहींच्या दृष्टीने उचापती) आणि प्रेरणादीय असतात.

बिल्डर्स प्रकारातल्या व्यक्तींमध्ये सिरोटोनिन नावाच्या संप्रेरकाची पातळी उंचावलेली असते. ते नियमबद्ध असतात, आणि सदासतर्कही. डायरेक्टर्स प्रकारातल्या व्यक्ती उच्च पातळीवरचे टेस्टोस्टेरॉन असलेल्या, तर्कशुद्ध स्पर्धात्मक, कठोर स्वभावाच्या आणि मिलनोत्सुक असतात. तर निगोशिएटर्स प्रकारचे व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती परस्परसहमतीला मान देणाऱ्या, जडणघडणीत वाटा उचलणाऱ्या असतात.

पण एक लक्षात असू दिले पाहिजे, कोणाही व्यक्तीमध्ये असे सगळे गुण एकवटलेले नसतात. किंवा या गुणांपैकी एकही गुण नाही, अशीही व्यक्ती जगात नसते. प्रत्येकामध्ये यातले कमी अधिक प्रमाणात गुणमिश्रण झालेले असते. प्रत्येक मिश्रण एकापासून अगदी तरल पातळीवर भिन्नही असते. म्हणून जगात दोन व्यक्ती अगदी दोन जुळ्या बहिणी वा भाऊ सुद्धा स्वभाववैशिष्ट्यांनी एकसारखे नसतात.

या प्रकारांना फिशरबाईच्या व्यक्तिमत्वाशी ताडून पाहायचे, तर त्या स्वतः कामाच्या ठिकाणी उच्च पातळीवरचे डोपामाइन असलेल्या अर्थात सृजनशील स्त्री होत्या. एका पातळीवर मिलनोत्सुक, संस्थेतल्या इतरांची काळजी वाहणाऱ्या, मात्र गणितात कच्च्या आणि टेस्टोस्टेरॉनच्या तर्कानुसार थोड्याशा अस्वस्थ नि विखुरलेल्या मनःस्थितीतल्याही होत्या.

.................................................................................................................................................................

धर्म, जात, राजकारण व इतर अनेक कारणांनी दुभंगलेल्या आपल्या समाजात ‘प्रेमाला समजून घ्यायची व प्रेमाने वागायची’ नितांत गरज आहे! - डॉ. वृषाली रामदास राऊत
कोणत्याही व्यक्तीत ‘स्व’ हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक व आध्यात्मिक असतो. त्यामुळे प्रेमात पडताना केवळ शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजलं तर फक्त जोडप्यातील ‘नर व मादी’ सुखावतात, मात्र इतर गोष्टींची अनुकूलता नसल्याने त्यांच्या प्रेमाचा प्रवास एकतर खडतर असतो किंवा मध्येच थांबतो. रोलो मे या अस्तित्वाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकाच्या मतानुसार लैंगिक सबंध हे संपूर्ण प्रेम नाही...

.................................................................................................................................................................

यथावकाश मानवी प्रेमामागची मेंदूंतर्गत गुंफण उलगडणारी फिशर बाईंनी शोधलेली ही पद्धती प्रेमीयुगुलांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली. फिशरबाईंनी शोधलेली ही पद्धती शाळा, ऑफिसेस, सल्ला केंद्रे किंवा जिथे माणसांना एकमेकांशी जुळवून घेणे भाग पडत असते, तिथे मानवी नातेसंबंधांतली गुंतागुंत सोडवण्यासही उपयुक्त ठरावी. नव्हे, जगातल्या ४० देशांनी ही निदान पद्धती अवलंबलीदेखील.

फिशरबाईंची पुस्तके आणि टेड टॉक्सने या विषयाचे गांभीर्य हजारो-लाखो लोकांपर्यंत सर्वदूर पोहोचवण्यास फिशरबाईंना मोलाची मदतच केली. पण या सगळ्यात प्रणयी प्रेम मात्र ‘पतली गली से’ निसटून जात होते. फिशरबाईंच्या 'एफटीआय' निदान पद्धतीला ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट’ प्रकारातल्या प्रेमामागची उलथापालथ उलगडण्यास अद्याप यश आलेले नव्हते. इतकेच कशाला, वेगवेगळ्या वयोगटातल्या त्यातही वयाच्या पन्नाशीत असलेल्या आणि किमान २१ वर्षाहून अधिक काळ लग्नबंधनात असलेल्यांच्या जोडीदारावरच्या निस्सिम प्रेमामागची भानगडही फिशरबाईच्या निदानपद्धतीच्या आवाक्यात आलेली नव्हती.

बरे, हे पन्नाशीचे लोक केवळ बढाया मारत नव्हते किंवा प्रेमाचे खोटेनाटे नाटकही रचत नव्हते. कारण, जेव्हा फिशरबाईंनी या पन्नाशीच्या प्रेमवीरांच्या मेदूंचा उभा आडवा छेद टिपला, तेव्हा डोपामाइनची निर्मिती करणारा त्यांच्या मेंदूचा मध्यप्रदेशीय भाग अर्थात ‘व्हेंट्रल टॅगमेंटल एरिआ’ दिनदिन दिवाळीसारखा उजळल्याचे सिद्ध झाले होते.

प्रेम प्रेमाला मिळाले...

हे खरेच की, प्रेम या ना त्या रुपात आश्चर्याचे धक्के देत राहते. खुद्द फिशरबाईंचे आयुष्यदेखील त्यास अपवाद नव्हते. १९६८मध्ये फिशरबाईंचे पहिले लग्न झाले, तेव्हा त्यांनी पदवीची परीक्षाही दिलेली नव्हती. ही त्यांची पहिली वहिली विवाहवेदी, जेमतेम चार महिने टिकली. त्यानंतर कितीतरी वेळा त्या भावबंधात अडकल्या, पण लग्नाच्या भानगडीत पडल्या नाहीत. मात्र पुन्हा एकदा त्या लग्नाच्या मोहात पडल्या, तेव्हा त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली होती.

१९९४पासून ज्या पुरुषाला त्या ओळखत होत्या, ज्याच्या प्रेमात त्या अडकल्या होत्या, त्याच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. तत्पूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये हे प्रेमी जोडपे मोन्टाना इथे राँचवर मौजमजा करण्यासाठी गेले, तेव्हा दोघांनाही हे जाणवले की, आपल्या मेंदूतले डोपामाइन उसळ्या मारतेय. पण जसे त्यांच्यातल्या डोपामाइनने उसळी मारली, तसे ते अल्पकाळातच थंडावलेही. पुढच्या वर्षी, एका रेस्टॉरंटमध्ये दोघांनी छानपैकी डिनर घेतले. मग बिलियर्ड खेळून झाल्यानंतर दोघांनी रात्र एकत्र घालवली. पण हे जरी अतीच होते की, काय असे वाटून फिशरबाईंचा जोडीदार चिंतेत (सिरोटोनिन उसळले!) पडला. मग ग्रैंड सेंट्रल स्टेशनवर दोघे एकमेकांपासून विलग झाले. त्या क्षणी फिशरबाई हमसून हमसून रडल्या. दोन महिन्यांनी पुन्हा दोघे एकत्र आले. प्रेम पुन्हा वस्तीला आले!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या प्रेमळ संघर्षानंतर फिशरबाई मोन्टाना पर्वताच्या पार्श्वभूमीवर विवाहबद्ध झाल्या. तेव्हा नवरी झालेल्या फिशरबाईंनी ‘इंडियन पेंटब्रश’ (कुंचल्यासम टोक असलेली उत्तर अमेरिकन फुले) फुलांचा गुच्छ हाती धरला होता, तर लग्न लावून देणाऱ्या गोऱ्या ख्रिस्ती भटजींनी बदामच्या राजाचा (किंग ऑफ हार्ट्स) वेश परिधान केला होता.

लोक नेहमी असे विचारतात, प्रेमाच्या विज्ञानाचे एवढे सगळे ज्ञान झालेल्या या फिशरबाईंना प्रेमाने तर नाही बिघडवले? प्रेमाची इंगळी तर नाही त्यांना डसली? त्यावर फिशरबाईंचे उत्तर होते जवळपास नाहीच! तुम्हाला चॉकलेट केकमध्ये कोणकोणते घटक पदार्थ असतात, हे नेमकेपणाने ठाऊक असते, पण जेव्हा तुम्ही तो केक खाता, तेव्हा फक्त मौज असते. आनंद असतो. टिकाऊ प्रेमाची खरी किल्ली, आयुष्यभर प्रणयभावना जपण्यातच असते.

त्याच अनुषंगाने न्यूयॉर्कमध्ये वेगवेगळी घरे करण्यात फिशरबाईंना उतारवयात बहरणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी नामी युक्ती गवसली होती. कारण, प्रत्येक वेळी विलग होताना, एमिली डिकिन्सन म्हणायची तसे, ‘ऑल वुई नीड ऑफ हेल...’ म्हणजे, छिन्नावस्थेत आपल्याला स्वतःचा असा नरक गरजेचा असतो. पण त्यानंतर येते घटिका मिलनाची. त्या मिलनात असते, हवीहवीशी झिंग आणि जादू! थोडक्यात, जादू हैं नशा हैं, मदहोशिया हैं...!

‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या ऑक्टोबर २०२४च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकात २९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://www.economist.com/obituary/2024/08/29/helen-fisher-found-out-the-science-behind-romance

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......