इस्त्रायलने सुरू केलेल्या सध्याच्या युद्धाचे स्वरूप नरसंहाराचे आहे. त्याला मुख्यतः साम्राज्यवादी देश जबाबदार आहेत...
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sun , 13 October 2024
  • पडघम विदेशनामा इस्त्रायल Israel पॅलेस्टाइन Palestine गाझा पट्टी Gaza Strip लेबनान Lebanon

अमेरिकन साम्राज्यवादी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने इस्राईलने सुरुवातीला गाझा पट्टीत केलेल्या नरसंहाराचीच पुढची पायरी आता लेबनानमध्ये घडत आहे. गाझा पट्टीमध्ये इस्राईलला हमास या दहशतवादी संघटनेचा समूळ नायनाट करायचा होता, तर आता त्यांना लेबनॉनमधील हीजबुल्लाचा समूळ नायनाट करावयाचा आहे. नुकताच त्यांनी यमनवर हल्ला केला असून, आता त्यांना तेथील हूती विद्रोह्यांचा बंदोबस्त करायचा आहे, असे दिसते. त्यासाठी ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

गाझा पट्टीवरील इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत ४०,९००हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने म्हटले आहे की, मारल्या गेलेल्यांमध्ये बहुसंख्य महिला आणि लहान मुले आहेत. गाझा पट्टीत शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटलस्, धार्मिक स्थळे व इतर इमारतीवर हजारो बॉम्बवर्षाव, अण्वस्त्रे व क्षेपणास्त्राचा मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यांच्या समर्थनार्थ त्यांनी ‘या सर्व ठिकाणी हमासचे आतंकवादी दडलेले आहेत. तेथे त्यांनी त्यांचे शस्त्रास्त्रे दडवून ठेवली आहेत’ म्हणून आम्ही या इमारतींवर बॉम्बवर्षाव व क्षेपणास्त्रांचा मारा करत आहोत, असे समर्थन केले आहे.

आता लेबॉननमध्ये हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने सावधगिरीची सुरक्षितता म्हणून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत असलेले पेजर, वॉकी-टॉकी इत्यादी साधनांमध्ये इस्त्रायलने स्फोट घडवून आणले आहेत. हे पेजर, वॉकी टॉकी, सोलर पॅनेल, रेडिओ अथवा इतरही संपर्काची व माहिती मिळवण्याची साधने फक्त हिजबुल्लाचेच लोक वापरत होते असे नव्हे, तर इतरही सर्वसामान्य लोक त्याचा वापर करत होते. त्याचे स्फोट केल्याने ३२ लोक ठार झाले, तर ३००० जखमी झाले असून, त्यापैकी २०० जण गंभीर आहेत. हे स्फोट बाजारपेठेत तसेच लग्न यांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांत घडवून आणले गेले. त्यात केवळ हिजबुल्लाचेच लोक नाही, तर सर्वसामान्य लोक, दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सेस, महिला कर्मचारी ठार झाल्या आहेत. त्यामुळे लेबॉननमधील सर्वसामान्य लोकांत दहशत पसरली असून ते आपापल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमधील बॅटऱ्या काढून ठेवत आहेत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

नुकतेच इस्रायलने हिजबुल्ला संघटनेचे प्रमुख सैय्यद हसन नसरल्लाह यांना खंदकाच्या बॉम्बचा स्फोट घडवून आणून ठार केले आहे. इस्त्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, त्यांनी हिजबुल्लाच्या सर्व वरिष्ठ कमांडरांना ठार केले आहे. इस्रायलने नसराल्लाहचे ठिकाण (लोकेशन) ओळखल्यानंतर, हवाई दलाच्या F-15 युद्धविमानांनी हे बंकर नष्ट करण्यासाठी ८० शक्तीशाली बॉम्ब टाकले. या बॉम्बने दक्षिणी बेरूत आणि दहिया येथील भूमिगत तळघरांना लक्ष्य केले. तेथे नसरूल्लाह त्यांच्या वरिष्ठ कमांडरांशी चर्चा करत होते. त्यापूर्वी काही महिन्यापूर्वी इराणची राजधानी तेहरानमध्ये हिजबुल्लाहचा वरिष्ठ लष्करी कमांडर फुआद शुक्र यांची बेरूतमध्ये आणि हमासचा राजकीय नेता इस्माइल हानिया यांच्या राहत्या ठिकाणी अण्वस्त्रांचा मारा करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

नुकतेच इस्त्रायली सैन्याने लेबनॉनच्या लोकांना हिजबुल्लाहने शस्त्रे ठेवलेली घरे आणि इतर इमारती त्वरित रिकाम्या करण्यास सांगितले. तेथील लोकांनी तेथून निघून जावे, असे मेसेजेस त्यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी लेबॉननच्या अनेक शहरावर तुफान बॉम्बहल्ला चालू केला आहे. त्यातही अनेक लोक ठार झाले आहेत.

हा नरसंहार कधी थांबणार?

इस्त्रायलीच्या मते हमास आणि हिजबुल्ला यांचा समूळ नायनाट करणे, हे उद्दिष्ट जोपर्यंत सफल होत नाही, तोपर्यंत हा नरसंहार सुरूच राहील.

खरे म्हणजे सुरुवातीला हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर केलेल्या हल्ल्यात जे इस्राईली लोक ओलीस ठेवले होते, त्या सर्वांची सुटका करा, म्हणजे आम्ही हे हल्ले थांबवतो, असे म्हटले असते, तर ते ओलीस आतापर्यंत कदाचित सुटलेही असते. त्याच्यातले काही सोडवलेही गेले आहेत. इस्राईलच्या या प्रचंड नरसंहारामुळे त्यातील काही ओलीस मारलेही गेले आहेत. तेव्हा गाझा पट्टीतील व लेबॉननमधील जमीन खाली करून तेथे इस्राईलच्या यहुदी लोकांचा विस्तार करणे, तो भूभाग ताब्यात घेणे आणि आपले इस्राईल राष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र वाढवणे, हा इस्राईलचा उद्देश आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

मानव विकासाच्या सुरुवातीच्या गुलामी, सरंजामी व भांडवली टप्प्यामध्ये युद्ध हे सुरुवातीपासूनच आपली संपत्ती वाढवण्यासाठी, आपल्या राज्याचे-साम्राज्याचे भौगोलिक क्षेत्र वाढवण्यासाठी युद्धे होत असत. वेगवेगळ्या वंशाच्या टोळ्या, दुसऱ्या वंशाची साधनसंपत्ती, गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या, धनधान्य लुटून नेत. शत्रुपक्षाच्या भौगोलिक क्षेत्रावर कब्जा करून, तेथील स्त्री-पुरुषांना गुलाम, युद्धकैदी बनवत व अनेकांना ठारही करत.

सरंजामी काळात आपली संपत्ती वाढवण्यासाठी शेजारच्या राज्यावर आक्रमण करणे, तेथे लूटमार करून आपल्या राज्यात संपत्ती आणणे आणि शक्य झाल्यास आपल्या राज्याचे भौगोलिक क्षेत्र त्या राज्याच्या सीमांपर्यंत वाढवणे, हा युद्धांचा उद्देश होता. या युद्धामध्ये तलवारी, भाले, जंबिया, तीर-कमठा अशा शस्त्रास्रांचा वापर होई. तर बचावासाठी ढाली, शिरस्राण, कवच अशी साधने वापरली जात. आपला बचाव करून दुसऱ्यावर हल्ला करून त्याला गारद करणे, असा सर्वसाधारण प्रकार होता.

अशा युद्धांचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संबंध राहत नव्हता. भारतावर गुर्जर, हुण, कुशान अशा अनेक टोळ्यांनी व मोगलांनी विविध बाजूंनी हल्ले केले. पण तेही त्यांची सैन्य दले व आपल्या संस्थानातील वेगवेगळ्या ठिकाणची सैन्य दले यांच्यातीलच युद्ध होते. सर्वसामान्य जनतेशी त्याचा संबंध नव्हता.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

इस्त्राईल-पॅलेस्टाईनसारख्या धुमसत्या ‘संघर्षभूमी’ जगातील मोठ्या राष्ट्रांच्या ‘प्रयोगशाळा’ असतात! - जीवन तळेगावकर
आपल्या मस्तीत जगणारा हा देश, पॅलेस्टाईनवर अत्याचार करतो, नेहमीच त्यांची जमीन बळकावतो, हे जरी सत्य असले तरी, ती त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे, संघर्षाचा विपाक आहे आणि जगण्याचा अविभाज्य भाग. हा इरेला पेटलेला संघर्ष कधी कधी उग्र रूप धारण करतो आणि हे दुरून पाहणारे आणि मदत करणारे मोठे देश आहेत. त्यांच्या दृष्टीने ही ‘संघर्षभूमी’ त्यांच्या ताकदीची फक्त ‘लिटमस टेस्ट’ असते...

.................................................................................................................................................................

म्हणूनच असे म्हटले जाते की, दिल्लीवर कोणाचे राज्य आहे, याचा भारतातील बहुसंख्य शेतकरी व इतर कष्टकरी वर्गाचा काही संबंध नव्हता. ते आपले शेतीतील व आपल्या स्वयंपूर्ण ग्रामरचनेतील जी काही कामे त्यांच्या वाट्याला आली असतील, ती बिनबोभाट करण्यामध्ये मश्गूल राहत होते. आपल्यावर कोण राज्य करतो, याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नव्हते. सर्वसामान्य जनता अशा लढायांपासून दूरच राहत होती.

सरंजामशाहीच्या शेवटच्या व भांडवली व्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळात दारूगोळ्याचा शोध लागल्यानंतर या शस्त्रास्त्रांची जागा बंदुका, तोफा, रणगाडे व नंतर विमान व विमानातून बॉम्बवर्षाव यांचा वापर सुरू झाला. त्यातून मानवाच्या जीवित व मालमत्तेच्या हानीचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूप वाढले.

पहिल्या जागतिक युद्धात मोठ्या प्रमाणात खंदकाद्वारे स्वतःचे संरक्षण करणे, बंदुका-तोफा यांच्या साहाय्याने शत्रू पक्षावर आक्रमण करणे व त्यांचा प्रदेश ताब्यात घेणे, असे प्रकार वाढले. समुद्रमार्गाचासुद्धा भांडवली विकासक्रमात लढाऊ जहाजे तयार करून, त्यावर तोफा बसवून त्याचा वापर करण्यास सुरुवात झाली. जहाजावरच विमानतळ बनवून त्याच्या साहाय्याने शत्रू प्रदेशावर हल्ले करणे सुरू झाले. लढावू लष्करी विमानात वरचेवर आकाशातच इंधन भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर मानवाच्या जीवितांचे व मालमत्तेच्या हानीचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने वाढले.

भांडवलशाहीने जेव्हा साम्राज्यशाहीचे स्वरूप घेतले, तेव्हा तर या मानवाच्या जीवितांचे व मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या शस्त्रास्त्रांत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवनवीन शस्त्रांचा शोध लागत गेला. जुन्याच शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अणुबॉम्बचा अमेरिकेने सर्वप्रथम शोध लावून त्याचा वापर सर्वप्रथम जपानमधील हिरोशिमा व नागासाकीसारख्या नागरी वस्तीवर मारा केला. त्यात हजारो स्त्री-पुरुष, मुले, म्हातारे लोक ठार झाले. त्यातून पुढे चालून विकलांग व विविध रोगराईने जर्जर झालेल्या पिढ्या निर्माण झाल्या. मालमत्तेचीही प्रचंड हानी झाली.

जपानने सर्वप्रथम हल्ला केला होता, तो अमेरिकेच्या पर्ल हार्बर या सैनिकी अड्ड्यावर. अमेरिकेच्या नागरी वस्तीवर नव्हे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. पण साम्राज्यवादाचा अर्क असलेल्या अमेरिकेने जगात सर्वप्रथम हिरोशिमा व नागासाकी यांसारख्या मोठ्या वस्तीच्या शहरावर अणुबॉम्ब टाकून सर्वात प्रथम नरसंहाराची सुरुवात केली.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर प्रश्नचिन्हात केलंय. तू उत्तर कधी देशील? - महमूद दारविश
महमूद दारविश हा पॅलेस्टाइनमधील प्रसिद्ध कवी. तो पॅलेस्टाइनमधील सर्वसाधारण जनतेची दु:खं, यातना आपल्या कविता आणि गद्यलेखनातून अभिव्यक्त करत होता. परिणामी त्याला तुरुंगवास, दडपशाही यांना तोंड द्यावे लागले आणि अनेक वर्षे बैरुत आणि पॅरिस येथे निर्वासित अवस्थेत काढावी लागली. त्याच्या ‘Journal of An Ordinary Grief’ या पुस्तकातील काही अंश...

.................................................................................................................................................................

पुढे चालून वातावरणातील प्राणवायू शोषून घेणाऱ्या, म्हणजे त्या परिसरातील लोक व इतर जिवंत प्राणी, प्राणवायूअभावी मरतील व त्या भागातील वनस्पती नष्ट होतील, अशा बॉम्बचाही त्यांनी शोध लावला आणि व्हिएतनामसारख्या अनेक देशांविरोधात त्याचा वापर केला.

पूर्वी ज्या त्या राज्याच्या सीमेवर आणि ज्या त्या राज्याच्या सैन्यदलाबरोबर होणाऱ्या लढाया, साम्राज्यवाद्यांनी आता त्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या नरसंहारापर्यंत नेऊन पोहोचवल्या आहेत. आताचे इस्त्रायलचे गाझा पट्टीतील व लेबॉननवरील हल्ले याच प्रकारात मोडतात.

सुरुवातीच्या काळात प्रत्येक देश, आपल्या देशाच्या सीमेभोवती, देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपापली सैन्यदले तैनात ठेवत. दुसऱ्या देशाला आक्रमण करायचे असल्यास प्रथम या सैन्यदलाशी मुकाबला करावा लागत असे. म्हणजे आमने-सामने दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांची आपापसात लढाई व्हायची. त्यातून जो पक्ष युद्धाची साधनसामग्री, शस्त्रास्त्रे इत्यादींच्या बाबतीत प्रबळ असेल, तो दुर्बळ पक्षावर मात करायचा. त्यातून विजय-पराजय ठरायचा, तह वगैरे व्हायचे. त्यात विजयी पक्षाकडून पराभूत पक्षाकडे सोने-नाणे, जड-जवाहिरे, घोडे व इतर पशुधन इत्यादीची मागणी करण्यात येत होती. जर असा तह पराभूत पक्षाने मान्य केला नाही, तर विजयी पक्ष त्या राज्यात घुसून तेथील मोठमोठे व्यापारी, सावकार, जमीनदार यांच्या महालात, हवेल्यात घुसून लुटालूट करत. यामुळे त्या राज्यात, परिसरात हाहाकार व गोंधळ माजत असे.

मंगोलियाचा तैमूरमुरलंग जेव्हा जगाच्या स्वारीवर निघाला, तेव्हा त्याने ठिकठिकाणी अशा प्रकारचे हत्याकांड व लुटालूट केलेली आहे. दिल्ली शहराचेही हाल केले होते. ज्या साधनसंपत्तीची लूटालूट होई, त्याला त्या सरंजामी काळात भांडवलाचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते. या संपत्तीचा उपयोग जेता पक्ष मोठमोठ्या इमारती बांधणे, आपल्या राहण्यासाठी महाल-हवेल्या बांधणे, त्यात कलाकुसर निर्माण करणे, मोठ-मोठे किल्ले बांधणे, अशा अनुत्पादक कामात करत असे. परंतु भांडवलशाही अर्थव्यवस्थेपर्यंत समाजाने प्रगती केली, तेव्हा याच संपत्तीचा उपयोग ‘भांडवल’ म्हणून केला जाऊ लागला.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

याचाच अर्थ असा की, या संपत्तीतून नवनिर्मिती व्हायला लागली. या संपत्तीत तिला मिळणाऱ्या व्याजादी प्रकारामुळे पूर्वी अनुत्पादक असलेल्या संपत्तीत वाढ व्हायला लागली. त्यासाठी बँकांची निर्मिती झाली. बँकांमार्फत भांडवलदार, कारखानदार त्या संपत्तीचा उपयोग उत्पादनासाठी करायला लागले. अशा प्रकारे संपत्तीने भांडवली पद्धतीने गुंतवणुकीकडे वाटचाल करायला सुरुवात केली.

पुढे चालून ज्या त्या देशातील जल, जंगल, जमीन, मानवाचे श्रम इत्यादी बाबी त्याच देशात या भांडवलामार्फत गुंतवून त्यातून जास्तीत जास्त नफा कमवण्याकडे या भांडवलशाहीचा कल वाढला. पुढे तिच्या साम्राज्यशाही स्वरूपातून या प्रकाराला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. यातून आपणाला जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी या साम्राज्यशाहीने युद्धात नरसंहार करायला सुरुवात केली.

या नरसंहारातून संबंधित प्रबळ पक्षाला युद्धसाहित्याचा वापर करून त्याची ट्रायल जशी घेता येते, तसेच त्याचा उपयोग समाज विध्वंसासाठी करून या शस्त्रांच्या उत्पादनात गुंतवलेल्या भांडवलातून जास्तीत जास्त नफा या उत्पादकांना मिळवता येऊ लागला. म्हणून हे भांडवल समाजोपयोगी उत्पादनांत गुंतवण्याऐवजी, ते नष्ट करण्यात गुंतवल्यास जास्तीत जास्त नफा मिळतो, याचा साम्राज्यवादी देशांतील औद्योगिक घराण्यांनी अनुभव घेतला. म्हणून शस्त्रास्त्रांच्या उत्पादनाला साम्राज्यवादी देश जास्त महत्त्व देतात आणि तशीच गुंतवणूक त्यांच्यातील औद्योगिक घराणे करतात.

इस्त्रायलने सुरू केलेल्या सध्याचे युद्धाचे स्वरूप नरसंहाराचे आहे. त्यामुळे पूर्वीच्या जुन्या युद्धाचे स्वरूप, सैन्यासैन्यांमध्ये होणारी लढाई आता सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनापर्यंत, त्यांची घरेदारे नष्ट करण्यापर्यंत, त्यांचे दैनंदिन जीवन उद्ध्वस्त करण्यापर्यंत गेले आहे. त्याला मुख्यतः साम्राज्यवादी देश जबाबदार आहेत, हेच इस्राईलच्या रूपाने सिद्ध होत आहे.

.................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 04 November 2024

कॉम्रेड,
तुमच्याशी चक्क सहमत. तुमचा हा लेख वाचला आणि बाहेर जाऊन बघून आलो की सूर्य पश्चिमेस तर उगवला नाही. हा दिवस कधी उजाडेल असं वाटलं नव्हतं. इस्रायल है तो कुछभी मुमकिन है.
इस्रायल हा देश नसून दहशतवाद्यांचं एक टोळकं आहे. डेव्हिड बेन गुरियन हा १९४८ सालचा आद्य दहशतवादी होता. इर्गुन आणि हगाना या आतंकी टोळ्यांनी स्थानिक पालेस्तिनी निरपराध जनतेवर अनन्वित अत्याचार करून इस्रायलची राजवट भक्कम केली. ज्यास बुडावर लाथ मारून भूमध्यसमुद्रात बुडवावयास हवा होता त्या मोशे शरात च्या नावाने आज एक मोठा रस्ता आहे हर्झलीया ( तेल अवीव ) शहरात. हा असला कारभार. इस्रायल हा ज्यूंच्या हितासाठी अजिबात काम करीत नाही. तसा फक्त आव आणतो. प्रत्यक्षांत ज्यूंचं आणि बिगरज्यूंचंही जिणं हराम करून सोडणारी यंत्रणा आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......