मी एक अद्भुत सृष्टी निर्माण केली आहे, पण यातील अनेक अद्भुत गोष्टी आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशात खरोखर अस्तित्वात आहेत…
ग्रंथनामा - झलक
प्रगती पाटील
  • ‘त्रिकोणी साहस’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 29 September 2024
  • ग्रंथनामा झलक त्रिकोणी साहस TRIKONI SAHAS प्रगती पाटील Pragati Patil

‘त्रिकोणी साहस’ ही प्रगती पाटील यांची कादंबरी म्हणजे ‘मॅजिकल रिअलिझम’चा, अदभुत रहस्यांचा आणि ज्ञानविज्ञानाचा एक नवा प्रयोग आहे. नुकत्याच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या कादंबरीला लेखिकेने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

‘त्रिकोणी साहस’ हे पुस्तक मी नक्की कुणासाठी लिहिलेय? सगळ्यांसाठी! लहान असूनही मोठ्यांप्रमाणे तल्लख बुद्धी असणाऱ्या बालकांना हे पुस्तक आवडेल अन् प्रौढ असूनही बालकांप्रमाणे जिज्ञासूवृत्ती जपणाऱ्या वाचकांनाही आवडेल.

या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या १२ वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या १२व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो.

या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन मारणार आहे… तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल...

साहसच्या नावाचे स्पेलिंग ‘SAHAS’ हे ‘पॅलिनड्रोम’ आहे, मागून- पुढून कसेही नाव लिहिले, तरी स्पेलिंग तेच. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या साहसला पुस्तके अन् पझल्स खूप आवडतात. तो खूप खट्याळ अन् उपद्व्यापीही आहे. तो आधुनिक, उदारमतवादी विचारांचा आहे, परंतु त्याच्या सभोवतालचा समाज जुन्या, संकुचित विचारांचा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एक दिवस त्याला ‘हॅना’ (HANNAH) नावाची मुलगी भेटते. तिचे नावही साहसप्रमाणेच पॅलिनड्रोम आहे. ती तीक्ष्ण बुद्धीची, संवेदनशील मनाची आणि उदारमतवादी विचारसरणीची कलाकार आहे. आपल्या सभोवतालच्या संकुचित समाजाच्या जाचाने त्रस्त असलेले साहस आणि हॅना इतर समविचारी मित्र-मैत्रिणींसोबत एक टीम स्थापन करतात, ‘टीम शॉक’. जुन्या, संकुचित विचारसरणीच्या लोकांना त्यांची टीम शॉक आपल्या वर्तनाने ‘शॉक’ देत राहते आणि सगळ्यांसाठी भरपूर अडचणी निर्माण करत राहते. पण आपली मैत्री अबाधित ठेवत ते प्रत्येक संकटाचा सामना कसा करतात, ते वाचणे खरोखर मनोरंजक आहे.

साहसी वृतीचे साहस आणि हॅना स्वतःला ‘explorent’ (explorer + student) म्हणवून घेतात. अनेक रहस्यांचा शोध घेताना आलेले अद्भुत अनुभव आणि जिवावर बेतलेल्या धाडसामुळे ‘टीम शॉक’ स्वतःच अनेकदा शॉक होते आणि त्यांच्यासोबत वाचकही...

या पुस्तकात फक्त ‘टीम शॉक’च्या सदस्यांनीच मौजमस्ती केलेली नसून एक लेखिका म्हणून मीसुद्धा शब्दांशी भरपूर मौजमस्ती केलेली आहे. १५०पेक्षा अधिक ‘अनुप्रास अलंकार' (alliteration), १००पेक्षा अधिक ‘त्रिविराम’ (tricolon), ५०पेक्षा अधिक ‘संयुक्तशब्द’ (portmanteau), ४० ‘ऑक्सिमोरॉन’ (oxymoron) यांच्यासोबत इंग्लिशमधील अनेक अलंकार (figure of speech) आणि संकल्पना यांचा सढळ हस्ताने वापर करण्याचा अनुभव खूप मजेदार होता.

काही नवीन संकल्पना, नवीन म्हणी आणि काही इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याचाही मी प्रयत्न केला आहे. माझ्या कल्पनाशक्तीला न्याय देऊन तयार केलेले हे मराठी प्रतिशब्द प्रमाणभाषेत सर्वमान्य व्हावेत, असा काही माझा आग्रह नाही. हे प्रतिशब्द तयार करताना मला नवनिर्मितीचा आनंद मिळाला आणि ते वाचताना वाचकांना नवीन शब्दसंपदा अनुभवण्याचा आनंद मिळेल, हे माझ्या दृष्टीने पुरेसे आहे...

या पुस्तकात वर्णन केलेला ‘एग ऑम्लेट पॅराडॉक्स’ (egg omelette paradox) मी स्वतः तयार केलेला आहे. बायोकेमिस्ट्रीतील denaturation ofproteinबद्दल वाचत असताना ‘एग ऑम्लेट पॅराडॉक्स’ माझ्या डोक्यात आला. वैद्यकीय अभ्यासक्रमात आम्हा डॉक्टरांचा अनेक सिंड्रोम (syndrome)शी परिचय होत असतो. त्यामुळे मी हाच शब्द वापरून एक नवीन सिंड्रोम तयार केला, ‘crisis creativity syndrome!'

‘अक्षरपुष्प’, ‘अक्षरमाला’, ‘द्विमो’, ‘द्विक’, ‘सवाब’, ‘पॉलीमोनो’, अशा नवीन संकल्पना तयार करून मी त्यांचा वापर केला आहे.

व्यक्ती आणि स्थळांनाही मी गमतीदार नावे दिलेली आहेत. ‘श्वेता’लिया, ‘शुभ्र’पूर, ‘धवल’पूर, ‘वेल्लई’पूर, ‘बिली’पूर, ‘ब्लॉन्श’, ‘बियांका’, ‘ब्लांको’, ‘शिरोई’ ही सर्व नावे वेगवेगळ्या भाषांमध्ये पांढऱ्या (white) रंगास सूचित करतात. ‘नीर’ या शब्दाचा अर्थ पाणी. पुस्तकात वर्णिलेले नीर लोक नदी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असल्याने बहुतांश नीर लोकांची नावे मी देशोदेशीच्या नदी आणि समुद्रांच्या नावांवरून ठेवली आहेत. पुस्तकातील ज्वाल लोक हे पर्वतांच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांची नावे मी देशोदेशीच्या पर्वतशिखरांच्या नावावरून ठेवली आहेत अन् मरुत लोक जंगलात राहत असल्याने त्यांची नावे देशोदेशीची जंगले अन् अभयारण्यांच्या नावावरून ठेवली आहेत. पुस्तकातील मनुष्यांना ज्या नद्यांची, समुद्रांची, पर्वतांची, जंगलांची नावे दिलेली आहेत, ते नक्की कुठल्या प्रदेशात खरोखर अस्तित्वात आहेत, तेही जिज्ञासू वाचकांना शोधायला आवडेल.

...............................................................................................................................

या पुस्तकात वर्णिलेले अनेक चविष्ट खाद्यपदार्थ हे काल्पनिक वाटत असले, तरी ते तसे नाहीत. ‘चोकोनट’, ‘पाईनक्रीम कोन’ आणि ‘कॅण्डीडेट’ या तीन काल्पनिक खाद्यपदार्थांचा अपवाद वगळता इतर सर्व खाद्यपदार्थ जगात वेगवेगळ्या प्रदेशात खरोखर मोठ्या चवीने खाल्ले जातात. पुस्तकात वर्णिलेले कपडे, संगीताची वाद्ये, नृत्य, भाषा (लिपी) हे सर्वही काल्पनिक नसून जगातील वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांचा खरोखर वापर केला जातो. एकंदरीत ‘magical realism’ असलेल्या या पुस्तकात कुठली गोष्ट सत्य आहे आणि कुठली काल्पनिक आहे, ते शोधताना वाचकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे.

...............................................................................................................................

पुस्तकात साहस आणि त्याची मित्रमंडळी अनेक साहसी क्रीडाप्रकारांत सहभागी होतात. क्लस्टर बलूनिंग, स्नोर्कलिंग, स्कुबा डायविंग, रॉक क्लायम्बिंग, मंकी क्राउलिंग, कमांडो क्राउलिंग, झिपलायलिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग, आईस स्केटिंग, स्नोबोर्डिंग, हायलायनिंग, ट्रिकलायनिंग, बोल्डरिंग इत्यादी साहसी क्रीडाप्रकारांत मुलांचे ‘साहस’ दिसते.

या पुस्तकात मुलांसाठी रोमांचक साहसी आव्हानांसोबत रंजक बौद्धिक आव्हानेही आहेत. वेगवेगळ्या प्रकारची ॲक्रोस्टिक कोडी (puzzles), गुप्त सायफर, गणिती कोडी यांद्वारे मुलांच्या (आणि मोठ्यांच्याही) बुद्धीला चालना मिळते. ‘भूमितीय परिवर्णी कोडे’ (geometrical acrostic) हे एक नवीन प्रकारचे अॅक्रोस्टिक तयार करून त्याचा वापर केला आहे.

व्यक्ती आणि स्थळांनाही मी गमतीदार नावे दिलेली आहेत. ‘श्वेता’लिया, ‘शुभ्र’पूर, ‘धवल’पूर, ‘वेल्लई’पूर, ‘बिली’पूर, ‘ब्लॉन्श’, ‘बियांका’, ‘ब्लांको’, ‘शिरोई’ ही सर्व नावे वेगवेगळ्या भाषांमध्ये पांढऱ्या (white) रंगास सूचित करतात. ‘नीर’ या शब्दाचा अर्थ पाणी. पुस्तकात वर्णिलेले नीर लोक नदी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असल्याने बहुतांश नीर लोकांची नावे मी देशोदेशीच्या नदी आणि समुद्रांच्या नावांवरून ठेवली आहेत. पुस्तकातील ज्वाल लोक हे पर्वतांच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांची नावे मी देशोदेशीच्या पर्वतशिखरांच्या नावावरून ठेवली आहेत अन् मरुत लोक जंगलात राहत असल्याने त्यांची नावे देशोदेशीची जंगले अन् अभयारण्यांच्या नावावरून ठेवली आहेत. पुस्तकातील मनुष्यांना ज्या नद्यांची, समुद्रांची, पर्वतांची, जंगलांची नावे दिलेली आहेत, ते नक्की कुठल्या प्रदेशात खरोखर अस्तित्वात आहेत, तेही जिज्ञासू वाचकांना शोधायला आवडेल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

या पुस्तकात अनेक रहस्यमयी गोष्टी असल्या, तरीही कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. यातील जादू फक्त मनोरंजनासाठी आहे. मनुष्य आपली बुद्धिमत्ता, परिश्रम आणि चिकाटीने विश्वातील मोठमोठ्या अगम्य रहस्यांचा उलगडा करू शकतो, हेच सांगण्याचा पुनःपुन्हा प्रयत्न केलेला आहे.

मी पाच वर्षे भारतीय लष्करात वैद्यकीय अधिकारी म्हणून अनुभवांचाही उपयोग पुस्तक लिहिण्यासाठी मला झाला. आजवर आयुष्यातून मी जे काही शिकले, अनुभवले, कल्पिले, त्यातून हे पुस्तक निर्माण झाले आहे. मी स्वतःच्या कल्पनेतून एक अद्भुत सृष्टी निर्माण केली आहे, पण यातील अनेक अद्भुत गोष्टी आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशात खरोखर अस्तित्वात आहेत. जर हे पुस्तक वाचकांना आवडले, तर त्याचे श्रेय फक्त माझ्या एकटीचे नसून संपूर्ण जगाचे आहे; कारण हे जग सुंदर अन् अद्भुत आहे! हे जग आपण विवेकीपणे जपायला हवे अन् ज्ञात क्षितिजापलीकडेही जाण्याचे धैर्य दाखवायला हवे.

महाराष्ट्राला ‘श्यामची आई’सारखे अजरामर पुस्तक देणारे साने गुरुजी ‘आंतरभारती’ नावाच्या एका सुंदर संकल्पनेचेही जनक होते. भारतातील सर्व प्रांतातील लोकांमध्ये भाषिक अन् सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, हा उदात्त विचार त्यांनी केला होता. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत मी ‘आंतरभारती’ला विस्तारित करून ‘आंतरधरती’ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझे पुस्तक वाचून हा उदात्त विचार वाचकांच्या मनात वृद्धिंगत झाल्यास मी कृतकृत्य होईल.

‘त्रिकोणी साहस’ – प्रगती पाटील | साधना प्रकाशन, पुणे | पाने – ६२४ | मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......