अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझजचे भाषण ही उद्दामपणाला दिलेली सणसणीत चपराक आहे!
पडघम - विदेशनामा
फ्रान्सिन प्रोझ
  • अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ आणि टेड योहो
  • Thu , 30 July 2020
  • पडघम विदेशनामा अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ Alexandria Ocasio-Cortez टेड योहो Ted Yoho

न्यूयॉर्कमधील डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनी अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात २३ जुलै रोजी केलेलं भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यांचे सहकारी पुरुष खासदार टेड योहो यांनी त्यांना ‘a fucking bitch’ असं म्हटलं. त्यावर नंतर योहो यांनी दिलगिरीही व्यक्त केली. पण त्याला प्रत्युत्तर देताना ओकासिओ-कॉर्टेझ यांनी केलेलं भाषण हे सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना कसं बोलावं याचा उत्कृष्ट नमुना आहे. आपल्यावर झालेल्या हिणकस शेरेबाजीला त्यांनी ज्या संयमाने उत्तर दिलं ते अतिशय बुद्धिमान आणि त्यांच्याविषयीचा आदर वाढायला लावणारं आहे. ओकासिओ-कॉर्टेझ यांचं कौतुक करणाऱ्या ‘द गार्डियन’मधल्या लेखाचा हा अनुवाद...

..................................................................................................................................................................

अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांचं भाषण

..................................................................................................................................................................

न्यूयॉर्कमधील डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ यांनी अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात २३ जुलै रोजी केलेलं भाषण प्रभावी, स्पष्ट, सत्यान्वेषी, बुद्धिमान, हेलावणारं आणि विचारप्रवण होतं. राजकीय भाषण कसं असू शकतं, याचा तो एक स्वागतार्ह नमुना होता. त्यातून आपल्या सार्वजनिक चर्चेचा स्तर किती घसरला आहे, याचीही जाणीव होते. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाजूंकडून आपण प्रतिक्रिया, हल्ले, शाई वाळायच्या आत नष्ट होणारी आश्वासने आणि श्रीमंतांनी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांनी गरीब राहावं या दृष्टीने केलेले युक्तिवाद ऐकत असतो. जेव्हा ट्रम्प बोलायला उभे राहतात, तेव्हा आपल्या पुढ्यात वाढलेली ‘भरकटलेपणा, चिथावणीखोरपणा, विरोधाभासात्मकता, मीठ-मसालायुक्त, सोयीस्कर आणि खोटरडे’ या शब्दांची खिचडी स्वीकारायला आता आपण शिकलो आहोत.

याउलट फर्डं वक्तृत्व आणि उपदेशपरता ही उत्तम वक्त्याची लक्षणं असलेलं ओकासिओ-कॉर्टेझचं भाषण हा सौहार्दतेचा, अनलंकृत सरळ साध्या भाषणाचा एक उत्कृष्ट नमुना होता. आपल्यावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव पडतो? तर पुनरावृत्ती, लय, जोर, कणखरपणा, उच्चारांचं पावित्र्य (काँग्रेस महिला प्रादेशिक उच्चारांच्या बाबतीत कच्ची आहे) आणि प्रत्येक घटनेचं किंवा संकल्पनेचं अखंडपणे संक्रमण होत उमटणारे व्यापक पडसाद.

संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या इमारतीच्या पायर्‍या चढेपर्यंत ‘कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारं’ असंच ओकासिओ-कॉर्टेझ यांचं आयुष्य होतं. फ्लोरिडाचे रिपब्लिकन पक्षाचे खासदार टेड योहो यांनी त्यांना हटकलं आणि त्यांच्यावर बोट रोखून त्यांना तिरस्करणीय, मूर्ख, वेडपट आणि धोकादायक ठरवलं. त्या पुढे सांगतात तसं, न्यूयॉर्कच्या १४व्या जिल्ह्यातल्या त्यांच्या मतदारांची घरं शाबूत राहावीत, त्यांच्या कुटुंबांचा चरितार्थ नीट चालावा आणि त्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून त्यानंतर ओकासिओ-कॉर्टेझ त्या इमारतीमध्ये मतदान करण्यासाठी गेल्या.

जेव्हा त्या पुन्हा पायऱ्या उतरू लागल्या, तेव्हा योहो यांनी त्यांना प्रसारमाध्यमांसमोर ‘a fucking bitch’ असं म्हटलं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

ओकासिओ-कॉर्टेझ यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जाणवतं की, कुठल्याही प्रकारच्या आक्रोशाविना किंवा भावनातिरेक न करता त्यांनी उच्चारलेले हे तीन शब्द सभागृहात बॉम्बस्फोटासारखे ठरले. भयानक रीतीने अपमान होऊनही त्या भयभीत झाल्या नाहीत. कारण त्यांनी कामगार म्हणून काम केलं आहे. त्यामुळे अशी भाषा त्यांनी याआधीही ऐकलेली आहे. त्यांनी वेटर म्हणून पुरुषांना दारूच्या बारमधून बाहेर घालवलेलं आहे. त्या काही नाजूक फूल वा बाई नाहीत. त्यामुळे त्या सभागृहामध्ये तमाशा करणार नाहीत. योहोंचे गैरवर्तन किंवा त्यांचे अपमानास्पद बोलणे त्यांना दुखवू शकत नाही. ओकासिओ-कॉर्टेझ यांनी म्हटलंय की, योहोंचं वर्तन ही फक्त एक घटना नाही, तर तो ‘हम करे सो कायदा’ संस्कृतीचा एक भाग आहे. त्यातून हिंसा आणि हिंसेची भाषा महिलांविरुद्ध वापरली जाते. त्यांनी असं बोलणं हे एका पत्रकारासमोर बोलून इतर पुरुषांनाही तसं करण्याची परवानगी देण्यासारखं आहे.

ही घटना खूप दु:खदायी आहे, पण मला या गोष्टीचा आनंद आहे की, या निमित्ताने पहिल्यांदाच ‘fucking bitch’ या शब्दांनी संसदेच्या रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. हे शब्द तिरस्करणीय, अस्वस्थ करणारे, संताप आणणारे आणि अपमानास्पद आहेत. त्यांना फक्त ‘असभ्य’ किंवा (योहो यांच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार) ‘ग्राम्य’ म्हणणं हे त्यांचा आशय पातळ करण्यासारखं आहे.

दरम्यान ओकासिओ-कॉर्टेझ यांच्या भाषणाला अजून एक वळण लागतं. त्या पुढे जाऊ इच्छितात. अजून एक वाईट दिवस म्हणून सोडून देऊ इच्छितात. पण योहो यांनी सभागृहाला कारण दिलं की, हे ‘गैरसमजा’तून झालं आहे. मी ४५ वर्षांपूर्वी लग्न केलेला दोन मुलींचा बाप आहे. मी माझ्या भाषेबद्दल दक्ष असतो.

काही शानदार वाक्यांनी ओकासिओ-कॉर्टेझ ‘कन्येची ढाल’ करण्याच्या या वृत्तीचा आणि बायका-मुले असल्यामुळे पुरुष स्त्रियांबद्दल अधिक संवेदनशील आणि आदरयुक्त होतात, या ब्रेट काव्हनॉफ आणि मिच मॅककोनेल यांच्या सष्टीकरणाचाही समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटलंय -

“आणि मी हे स्वीकारू शकत नाही… शाब्दिक छळ स्वीकारू शकत नाही, आणि वाईट म्हणजे ते पाहू शकत नाही. अशा घटनांना आपली संसद कायदेशीररीत्या स्वीकारू शकते, हे पाहू वा स्वीकारू शकत नाही. महिला, बायका आणि मुली यांना वाईट वागणुकीचे समर्थन करण्यासाठी ढाल म्हणून वापरण्याला माझी हरकत आहे. मीही कुणाची तरी मुलगी आहे. मी ज्यांची मुलगी आहे त्यांनी मला पुरुषांकडून होणारा अत्याचार सहन करण्यासाठी इथं उभं केलेलं नाही.”

“मुलगी असल्याने माणूस सभ्य होत नाही. बायको असल्याने सभ्य माणूस बनत नाही. लोकांचा सन्मान आणि सन्मानपूर्वक वागणूक यामुळेच माणूस सभ्य होतो.”

‘सभ्य’ या शब्दावरून काहींना आठवण होईल की, अमेरिकन लष्कराचे मुख्य सल्लागार जोसेफ एन वेल्च यांनी विध्वसंक आणि विखारी सिनेट सदस्य जोसेफ मॅककॉर्थी यांना ‘तुम्हाला सभ्यतेची काही चाड आहे की नाही?’ असा प्रश्न विचारून त्यांची लायकी दाखवली होती.

ओकासिओ-कॉर्टेझ यांनी त्यांच्या भाषणाचा शेवट पश्चाताप न करता वेगळ्या पद्धतीने केला. त्यांनी योहो यांचे आभार मानले आणि आपल्याला संसदेच्या पायऱ्यांवरून पूर्ण वर्तुळात उभं केलंय. “मी योहो यांचे आभार मानते की, त्यांनी जगाला हे दाखवून दिले आहे की, ते एक शक्तिशाली पुरुष आणि अत्याचारी माणूस आहेत. तुम्हाला मुलगी असू शकते आणि तरीही तुम्ही कुठल्याही पश्चात्ताशिवाय स्त्रियांवर अत्याचार करू शकता. तुम्ही कुटुंबासोबत छायाचित्रं काढून जगाला दाखवू शकता की, तुम्ही कसे कुटुंबवत्सल गृहस्थ आहात. आणि तरीही तुम्ही ‘हम करे सो कायदा’ संस्कृतीने, कुठल्याही पश्चात्ताशिवाय स्त्रियांवर अत्याचार करू शकता. हे या देशात रोज घडतं. हे आपल्या देशाची राजधानी असलेल्या संसदेच्या इमारतीच्या पायऱ्यांवरही घडतं. जेव्हा या संसदेच्या सभापतीपदी पदावर एक महिला असते, तेव्हा हे घडते. महिलांविरोधात असभ्य भाषा वापरली जाते.”

एखादा शब्द किंवा वाक्प्रयोग पुन्हा पुन्हा वापरण्याला इंग्रजीत anaphora म्हणतात. तुम्ही हा शब्द गुगलवर शोधलात तर तुम्हाला अनेक पोर्टल्स मार्टिन ल्युथर किंग यांच्या “I Have a Dream” या भाषणाचा पर्याय देताना दिसतात. मला हे सुचवायचे नाहीये की, ओकासिओ-कॉर्टेझ यांचे भाषण मार्टिन ल्युथर किंग यांच्या वक्तृत्वशैलीजवळ जाणारं आहे. त्यांची स्वतंत्र शैली आहे. आपल्याला जे ऐकण्याची सवय लागली आहे त्यापेक्षा ती वेगळी आहे. ती तुमचं लक्ष वेधून घेते. तिचा स्वर, त्यांची शब्दांची निवड, ठेवण, त्यांचा प्रामाणिकपणा यातून त्या हे स्पष्टपणे दाखवून देतात की, स्त्रिया (जर ते स्पष्ट करायची गरज असेल तर) कुठल्याही पुरुषापेक्षा जास्त बोलण्यात वाकबगार, बुद्धिमान आणि शूर असतात. बायका तर्कहीन असल्याचा आरोप केला जातो, परंतु ओकासिओ-कॉर्टेझ यांच्या भाषणातील तर्क हे सिद्ध करतात (जर ते सिद्ध करण्याची गरज असलेच तर) की, त्या कोणत्याही पुरुषांइतक्याच थंड डोक्याच्या असतात, योहोंसारख्यांपेक्षा तर नक्कीच जास्त.

सार्वजनिक भाषणं कसं करावं याविषयीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी ओकासिओ-कॉर्टेझ यांच्या भाषणाचा अभ्यास करायला हवा. हे भाषण ट्विटरवरून आणि सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, त्याचा व्हिडिओ पाहिला गेला. मी तो दहा वेळा पाहिला आहे. कारण ती माझ्यासाठी बोलत होती आणि ‘fucking bitch’ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या प्रत्येक महिलेसाठीही. कुणीतरी योहोच्या ‘भाषेचा जाणकार’ या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यासाठीही मला ओकासिओ-कॉर्टेझ यांचं भाषण ऐकायचं होतं की, एक काँग्रेस महिला त्यावर कसं भाषण करते आणि प्रत्युत्तर देते.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘द गार्डियन’मध्ये २८ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

फ्रान्सिन प्रोझ या अमेरिकन कादंबरीकार, कथाकार, निबंधकार आणि समीक्षक आहेत.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......

हा लेख लिहिण्यायासाठी मी अनेक वेबसाईट धुंडाळल्या. अनेक लेख डाऊनलोड केले. त्यातून जागतिक उत्सर्जनात आणखीच भर पडली. त्यामुळे माझ्या मनातही अपराधीपणाची भावना आहे…

कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, असे आपण ऐकत आलो आहोत. पण एखाद्या गोष्टीला दुर्लक्षित अशी तिसरी बाजूही असू शकते. ती मोबाईललाही आहे. मात्र या दुर्लक्षित तिसर्‍या  बाजूविषयी फारसे कोणी बोलताना दिसत नाही. हे तंत्रज्ञान जेथे विकसित झाले, त्या पाश्चात्य देशांमध्ये मात्र आता या तिसर्‍या बाजूची जाणीव होऊ लागली आहे. ही बाजू आहे मोबाईलमुळे पर्यावरणात होणार्‍या प्रदूषणाची आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या हानीची.......

डॉ. आ. ह. साळुंखे : विद्वत्ता व ऋजुता यांचा अनोखा संगम असलेले आणि विद्वत्तेला मानुषतेची व तर्ककठोर चिकित्सेला सहृदयतेची जोड देणारे विचारवंत!

गेली पन्नास वर्षे तात्यांनी निर्मळ मनाने मानवतेचे अवकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र आपली लेखणी आणि वाणी वापरत अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. तात्यांनी फुले- शाहू- आंबेडकर यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाट विकसित केली आहे. त्यांनी धर्मचिकित्सेचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जोखमीचे कार्य करत सांस्कृतिक गुलामगिरीची खोलवर गेलेली पाळेमुळे उघडी केली, गंभीर वैचारिक लेखनाबरोबर ललितलेखनही केले.......