जब मिलते है यार, और बॅगपायपर (?) सोडा!
व्यसनाधीन मुलांना जबाबदारीची जाणीव कधीतरी होतेच, नाही असं नाही, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ऐन उमेदीच्या काळात रक्तात भिनलेल्या त्या विषारी द्रावाने मेंदूसहित साऱ्या शरीराचा कब्जा घेतलेला असतो. उमेदीच्या वर्षात सर्जनशीलतेची ऊर्जा एकीकडे बहरत असतानाच मेंदू आणि हातपाय पुकारा करू लागतात ‘दिल मांगे मोअर’! ते मिळाल्यावर निश्चयाने ठरवलेले साऱ्या कमिटमेंटस, सारं काम कसे आपोआप झूम आउट होत जातं. ...