हेन्री किसिंजर : बुद्धिजीवी वर्गाचे अभिन्न अंग असणारा ‘बोटचेपेपणा’ निडरपणाने धुडकावून लावणारे अजब व्यक्तिमत्त्व
किसिंजर यांनी अमेरिकेचा कुटनितीज्ञ म्हणून खेळलेल्या डावपेचांत, खेळलेल्या खेळीत नीतिमत्ता, आदर्शवाद, मानवता या संकल्पनांचा कधीच बाऊ केला नाही. चीन, कम्बोडिया, व्हितनाम आणि इतर देशांसोबतच्या डावपेचामुळे, किसिंजरच्या धोरणामुळे भलेही जगात त्यांचा उल्लेख कुठे युद्ध गुन्हेगार, क्रूरकर्मा म्हणून केला जात असेल, पण जगाच्या सत्ताकारणात भावनेला स्थान नाही, हे यापूर्वी ठासून कोणी स्पष्ट केले नव्हते...