संघटित गुन्हेगारी आता नगरला नवी राहिलेली नाही!
सत्तर-ऐंशीच्या दशकात असलेले टांगेवाला, हमाल, कुणी दूधवाला, हातगाडीवाले छोटी-मोठी दादागिरी करत, गुंडगिरीने साम्राज्य तयार करत आज महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत. हे आपसात एकमेकांचे सोयरेही झालेत. सर्वपक्षीय सोयरेधायरे राखून होत असलेली ही संघटित गुन्हेगारी आता या शहराला नवी राहिली नाही. दारू, मटका, जुगार, हॉटेल्स, वेश्याव्यवसाय अशा सर्वच ठिकाणी यांचा हात आहे. भैया, दादा, भाऊ, हे परवलीचे शब्द आहेत...