डॉ. आ. ह. साळुंखे : विद्वत्ता व ऋजुता यांचा अनोखा संगम असलेले आणि विद्वत्तेला मानुषतेची व तर्ककठोर चिकित्सेला सहृदयतेची जोड देणारे विचारवंत!

गेली पन्नास वर्षे तात्यांनी निर्मळ मनाने मानवतेचे अवकाश निर्माण करण्यासाठी अहोरात्र आपली लेखणी आणि वाणी वापरत अविश्रांत परिश्रम घेतले आहेत. तात्यांनी फुले- शाहू- आंबेडकर यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाट विकसित केली आहे. त्यांनी धर्मचिकित्सेचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि जोखमीचे कार्य करत सांस्कृतिक गुलामगिरीची खोलवर गेलेली पाळेमुळे उघडी केली, गंभीर वैचारिक लेखनाबरोबर ललितलेखनही केले...

‘स्पायरल ऑफ सायलन्स’ : सामाजिक मतप्रवाह कुठल्या दिशेने चालला आहे, यावर तुम्ही आपली राजकीय, सामाजिक मते व्यक्त करायची की, शांत पडून राहायचं ठरवता, हे सांगणारं तत्त्व

एलिझाबेथला असे आढळून आले की, एखाद्या समूहात आपल्या मतांना इतरांकडून पुष्टी मिळते आहे, असे दिसून आले, तरच माणसे आपले मत प्रकट करतात, अन्यथा समूहातील बहुसंख्यांना आपली मते पटत नाहीत असे त्यांना वाटले, तर ते गप्प बसतात. समाजात मतांचा हा भोवरा सतत गरगरत असतो, त्याच्या डोक्याकडे सर्वाधिक समान धारणांचे वर्तुळ. जसे खाली जाल, तसे आसावर गरगर स्थिरावल्यासारखी दिसते, ती स्थिरता गप्प बसलेल्या अल्पमतांची. या भोवऱ्याला गती देतो,...

आम्ही ‘ललित कला केंद्रा’च्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत

ललित कला केंद्राच्या परीक्षांच्या वेळी, रंगमंच हाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य परीक्षक/तज्ज्ञ उपस्थित असतात. या परफॉर्मन्समध्ये तोंडी परीक्षा (Viva) हा पण मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असतो. या सादरीकरणांमध्ये कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असत नाही...

‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ : पुरुषांचं ‘पुरुषभान’ जागृत करू पाहणारे आणि त्यांना ‘चांगला माणूस’ होण्यासाठी मार्गदर्शन करणारे दिवाळी अंक

‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ हे आगळेवेगळे दिवाळी अंक आहेत. ‘तरुणाईच्या डोक्याला खुराक’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘पुरुष उवाच’मध्ये केवळ पुरुषांचंच लेखन वाचायला मिळतं, तर ‘पुरुष स्पंदनं’मध्ये स्त्री-पुरुष दोन्हींचं. ‘माणूसपणाच्या वाटेवरची ‘पुरुष स्पंदनं’ अशी त्याची टॅगलाईन आहे. ‘पुरुषभान’ जागृत करणारे, त्याला प्रोत्साहन देणारे आणि ते मर्दानगीऐवजी ‘माणूसपणा’कडे कसं झुकेल, यासाठी प्रयत्न करणारे हे अंक आहेत...

‘सेक्युलर’ शक्तींना टिकून राहायचे असेल, पुन्हा उभे राहायचे असेल, तर ‘धर्म’ ही बाब वजा करून चालणार नाही आणि जनतेची भाषा आपलीशी करून ‘भारतीयत्वा’च्या चर्चेचा भाग व्हावे लागेल

साधेभोळे देवभिरू लोक कधीच मुळात सांप्रदायिक नसतात. त्याचमुळे त्यांची मने वळवली जाऊ शकतात; तर बुद्धिवादी व उदारमतवादी हे कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या तुलनेत नेहमीच अधिक विद्वान व सर्जनशील आहेत. अशा प्रसंगी पुराणकथा अनर्थ घडवून आणत आहेत, म्हणून ऊर बडवत बसण्याऐवजी आपली विद्वत्ता व सर्जनशीलता यांच्या जोरावर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना जागे करण्याची वेळ आज आलेली आहे...

आज जर समर्थ असते, तर आजचा उच्चभ्रू मध्यमवर्ग पाहून ‘सांगे वडिलांची कीर्ती’ यापुढे ‘तो एक ढोंगी’ असं म्हणाले असते की, ‘तो एक दांभिक’, की ‘तो एक कोडगा’, की…

बहुतांश उच्चभूंना आपल्याच गावात आपल्याच पूर्वजांनी गेल्या हजारो वर्षांपासून आजतागायत अस्पृश्यांवर, कनिष्ठ जातींवर, विधवांवर केलेल्या अत्याचारांची खंत सोडा, माहितीही नसते. पण एक हजार वर्षांपूर्वी मुहम्मद गझनवीने आणि आठशे वर्षांपूर्वीच्या मुहम्मद घोरीने केलेल्या अत्याचारांची मात्र इत्थंभूत माहिती असते. अर्थात व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्या कोणीतरी उच्चभ्रूने ‘फॉरवर्ड’ केलेल्या ‘फेक न्यूज’वर आधारित असते...

इतिहास खरे तर सक्षमीकरणाचे, उन्नतीचे आणि सुधारणांचे ‘हत्यार’ असायला हवे; पण हल्ली आपण त्याच्याकडे ‘बंदिवासाचे साधन’ म्हणून बघतो आहोत!

टोकाच्या भूमिका घेणाऱ्यांनी संवादाची सर्व दारे प्रदूषित केलेली आहेत. त्यांनी समाजात त्यांच्या विचारांना वाढता पाठिंबा मिळेल, अशी पार्श्वभूमी तयार करून ठेवलीय. आसपासचा सर्व ‘प्राणवायू’ ताब्यात घेत त्यांनी बहुसंख्याकांना भयभीत करून ठेवले आहे. आता असहिष्णुता आणि दंभाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ ही प्रवृत्ती सोडून न पटणाऱ्या सगळ्या धोरणांविरुद्ध बोलण्याची हीच वेळ आहे...

आपण लोकांना शुभेच्छा देतो, पण त्यांनी शुभ जीवन जगावे म्हणून काय करतो? याचा शोध घेता लक्षात आले की, काहीच करत नाही! मग त्यांना पोकळ शुभेच्छा देण्यात आपण कोणती नीती बाळगतो?

मी ज्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांना कोणती मदत कशाच्या रूपात देऊ केली आहे काय? निदान देऊ शकतो काय? तशी शक्यता असेल, तर मी ती करतो आहे काय? की सगळ्यांनी म्हणजे प्रत्येकाने आपापले प्रश्न स्वतःच सोडवावयाचे असतात, त्यात इतर जन काय करणार, असे म्हणून आपण केवळ शुभेच्छा देऊन स्वतःचीच फसवणूक तर करत नाही आहोत ना? ‘चांगले रहा’ म्हणून ‘चांगले राहता येते का?’ म्हणूनच या अशा शुभेच्छांना काही नैतिक दर्जा उरत नाही...

आता सरकारविरुद्ध सुरू केलेल्या कुठल्याही आंदोलनाला इतर जनतेच्याही रोषाला व टीकेला सामोरं जावं लागतं. ‘नागरिक’ विरुद्ध ‘सरकार’ अशी आंदोलनं होणं बंद झालं आणि ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असं चित्र दिसू लागलंय

सद्यस्थिती अशी आहे की, ‘ते’ आणि ‘आपण’ दोघांपैकी कोणीच रस्त्यावर उतरत नाही. हातातल्या मोबईलवर पोस्ट, कमेंट, शेअर, ट्वीट, रीट्वीट आणि अंगठे दाखवण्यातच धन्यता मानत आहे. देशात दोन निश्चित गट पडले आहेत. देश ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर आहे, असं मानणारा एक गट आहे, तर दुसरा गट देश परत मध्ययुगात जात आहे, असं मानणारा आहे. पण या दोघांपैकी कुठेही आंदोलनकर्ता उरलेला दिसत नाही...

‘एकते’ची संस्कृती गाणारी उर्दू ही भाषा हिंदू आणि मुस्लीम या दोन प्रमुख धर्मांत अंतर निर्माण करणारी ठरली, त्याला भाषेचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण कारणीभूत आहे!

एकेकाळी देशभरातील जनसामान्यांची संपर्क भाषा असलेल्या ‘उर्दू’ला आज भारतीय विद्यापीठ परकीय भाषा मानत आहे. एकतेची संस्कृती गाणारी ही भाषा हिंदू आणि मुस्लीम या दोन प्रमुख धर्मांत अंतर निर्माण करणारी ठरली आहे. अर्थात त्याला भाषेचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणच कारणीभूत आहे. त्यामुळे उर्दूचे खच्चीकरण झाले व होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत या भाषेबद्दलची गृहितकेही बदलत आहेत...

पुरोगामी, सुधारणावादी विचारवंतांना मुस्लीम समाज हळूहळू बदलत आहे आणि तो आधुनिक बनेल, अशा विश्वास होता. मात्र तो आज तसा झाल्याचे दिसत नाही

हिंदू-मुस्लीम प्रश्न प्रामुख्याने राजकीय हेतूने हाताळला गेला. त्यामुळे ‘समान नागरी कायदा’, धर्मनिरपेक्षता आदी निकषांच्या आड मुस्लीम धर्मातील चालीरिती आणि ‘शरिया कायदा’ ही अंतर्गत बाब असून त्यात कोणी हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका घेतली. समाजातून या सुधारणांसाठी फारसा प्रयत्न न झाल्याने राजकीय पातळीवर त्यासाठी दबाव निर्माण झाला नाही आणि मुस्लिमांना दुखवायचे नाही, अशीच भूमिका राजकीय पक्षांनी घेतली...

गेल्या काही वर्षांत ज्या विकृतींचा प्रादुर्भाव व विस्तार होऊ लागला, त्याबद्दलचे चिंतनही याच मध्यमवर्गातले सुजाण लोक करू शकतील आणि हा भस्मासूर गाडू शकतील!

आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवनमान अधिक चांगली व्हावे, अशी आकांक्षा ठेवण्यात काही आक्षेपार्ह नाही. प्रत्येकाची धडपड व प्रयत्न त्यासाठी असतो. जगातल्या सर्व ‘ट्रेड युनियन्स’चा संघर्ष अधिक उत्पन्नासाठी, अधिक चांगल्या कामाच्या सुविधांसाठी आणि अधिक व आधुनिक तंत्रकुशल कामासाठी असतो. ती भौतिक वा ऐहिक सिव्हिलायझेशनची गती आहे. पण जेव्हा वास्तव आकांक्षा अवास्तव महत्त्वाकांक्षांचे अक्राळविक्राळ रूप धारण करतात...

सामाजिक-भावनिक शिक्षणामुळे आम्ही शिक्षक मुलांसाठी हात छडी घेऊन उभे असलेले ‘सर’ न राहता, त्यांच्या हातात हात घालून त्यांच्यासोबत प्रवास करणारे मित्र बनलो!

या सर्वांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शैक्षणिक आणि इतर बाबींवर झाला. वर्षाच्या सुरुवातीला ५७ टक्के विद्यार्थ्यांची वाचन आकलनक्षमता त्यांच्या इयत्तेपेक्षा तीन वर्षांनी कमी होती, तो आकडा ३८ टक्क्यांपर्यंत खाली आला. गणितात आधी ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले फक्त २८ टक्के विद्यार्थी होते, तो आकडा ६१ टक्क्यांपर्यंत पोहचला. त्या व्यतिरिक्त मुलं स्वतःच्या भावना आणि कृती यांतला संबंध समजू लागली...

मानवी आयुष्याला अर्थ आहे की नाही, हा प्रश्न फार महत्त्वाचा नाहीये. आयुष्यात अर्थ आहे की नाही, या विषयी आपल्याला काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे!

मला श्रृती आणि संतोष यांचं रमणं, राजा आणि महेश यांच्या रमून जाण्यापेक्षा श्रेष्ठ वाटत होतं. श्रृती आणि संतोष त्यांच्या आजूबाजूच्या जिवंतपणामध्ये रमले होते. स्वतःच्या मनात किंवा शरीरात रमण्यापेक्षा निसर्गात रमणं मला श्रेष्ठ वाटत होतं, कारण त्यासाठी तीव्र संवेदना, तीव्र बुद्धीची गरज होती. आपल्या अस्तित्वाच्या बाहेरच्या जगामध्ये ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायचं असेल, तर भावनिकदृष्ट्या जास्त जिवंत असणं गरजेचं असतं...

इस्लामची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी महिलांनी हिजाब परिधान करायला सुरुवात केली, पण तो अधिकाधिक मुस्लीम समुदायाशी जोडले जाण्याचे प्रतीक म्हणूनही प्रस्थापित झाला…

हिजाब हा प्रतिगामी आहे, धार्मिक आहे असे ज्या पुरोगामी आणि आधुनिक शिक्षक, अधिकारी, आमदार, मंत्री यांना वाटते, त्यांनी इतरांना त्यांच्यासारखे प्रगत बनण्यासाठी त्यांना आधी हिजाब घेऊन शिकू द्यावे. दुसरे असे की मुस्लीम मुलींनी, तेही काही, डोक्यावर हिजाब घेतल्याने बहुसंख्य हिंदू शिक्षकांना त्यांचे कर्तव्य बजावता येणार नाही, अशी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, असे वाटत नाही...

‘कुराणा’च्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने : भाषांना राष्ट्रवादाचे वा जातीयवादाचे हत्यार समजणे, हा मानवी मनाचा मोठा आजार आहे आणि तो फारच सार्वत्रिक आहे

प्राणिसृष्टीचा भाग म्हणून विचार केला, तर बांधीलकीपेक्षा वाळीत टाकणे अधिक आवडणारा माणूस हा एका बाजूने कळपप्रधान शेळ्यांसारखा असतो आणि त्याचवेळी आपण सिंहासारखे आहोत, इतर नरांना माझ्या कळपात जागा नाही, हे त्या कळपात सुरक्षित राहूनच तो गर्जून सांगत असतो. त्यामुळे त्याचे शौर्य हे केवळ कळपाबाहेरच्यांबाबतचा द्वेष इतकेच शिल्लक राहते. आणि ते ही शिल्लक राहावे म्हणून कळपाबाहेरचे लोकही शिल्लक राहावे लागतात...

सर्व भारतीय उपखंडात एकच राम असावा, एकच ‘रामायण’ असावे आणि एकच रावण असावा, हा संघपरिवार व भाजपचा हेतू आढळतो. पण त्यांचा रावण नेमका कोणता?

गांधीजींचा राम संघपरिवार व भाजपलाच काय, पण काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी कोणत्याच पक्षालाच नको आहे. अगदी स्थापनेपासून राम काँग्रेसचा कधीही नव्हता, म्हणजेच रामाचे कोणतेही गुण काँग्रेसला फारसे मान्य नव्हते. पण जेव्हा राम उघडपणे संघपरिवार व भाजप इत्यादी हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात गेला, तेव्हा त्यांचे अहिंसक व प्रेमळ स्वरूप बदलले. ‘रामायण हा अतिशय स्फूर्तीदायक ग्रंथ आहे’ या विधानाचा उलटा अर्थ घेतला गेला...

एखादा स्वयंप्रकाशित तारा आकाशात सदैव चमकत असतो आणि किती तरी प्रकाशवर्षे दूर असणार्‍या दुसर्‍या ग्रहांना तो जाणवतो. त्याप्रमाणे मला कुमारजी थोडेसे जाणवले आहेत, बस इतकंच!

एखाद्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये एवढं वैविध्य असण्यामागे विविध कारणं असतात. कुमारजींच्या बाबतीत ते कारण आहे, त्यांची सौंदर्यदृष्टी, असं मला वाटतं. त्याच सौंदर्यदृष्टीमुळे ते फक्त शास्त्रीय गायक न राहता ‘गंधर्व’, एक ‘तत्त्ववेत्ता’ आणि एक ‘तर्कविद्यानिपुण’ होतात. कोणताही सिद्धांत कसून तपासून पाहून मगच आत्मसात करण्याच्या मार्गाचे ते अनुसरण करतात, म्हणून ते ‘सिद्धांतकार’ होतात...

‘समाजवादी शिव्यांचा शोध’ : समाजवादी माणसेच आहेत, ती संतापणार व इतरांची अवहेलना करावीशी त्यांना वाटणारच. तेव्हा त्यांनी शिव्या जरूर द्याव्यात, पण... 

समाजवाद्यांनी कोणत्या शिव्या द्याव्यात? समाजात जबाबदारीने राहणाऱ्या मानवी व्यक्तीचे माणूस म्हणून महत्त्व हा समाजवादी तत्त्वज्ञानाचा व नैतिकतेचा पाया आहे. म्हणून एखादा कमी आहे, हे दाखवण्यासाठी त्याच्या वर्तनातला कमीपणा दाखवणे हीच फक्त समाजवाद्यांना परवानगी आहे. व्यक्तिगत अवगुण दर्शवून अवहेलना हीच शिव्या देण्याची योग्य पद्धत आहे. व्यक्तीचे वर्तन समजून घेऊन, मग त्यातील वैगुण्यावर आघात करावा...

व्यावसायिक भूमिका व व्यक्तिमत्त्वं यांच्या सरमिसळीमुळे अनेक जण ‘हायब्रीड’ झाले आहेत. त्यांच्यातील हाडामांसाची व्यक्ती कधी संपून चाणाक्ष व्यावसायिक भूमिका कधी सुरू होते, हे कळतही नाही

औद्योगिकीकरणानं आपल्या वाटेल्या आलेल्या व्यावसायिक भूमिका आपल्यावर हावी झाल्याचं दिसतं. कुठल्याही नात्यात आपण मुख्यत्वे करून आपलं काम, व्यावसायिक मूल्य दाखवून सुरुवात करतो. व्यावसायिक मूल्य कधीही बदलू शकतं. ते बदलतं तेव्हा आपल्याला त्रास होतो. व्यावसायिक भूमिका खूपच गंभीरपणे घेतल्यानं व्यक्ती म्हणून वाढ खुंटलेल्या, अति पैसा कमावूनही समाधानी नसलेली मंडळी बघितली की वाटतं, कशासाठी हा अट्टाहास?...

आपल्यासारख्या नसणाऱ्या लोकांकडे संशयाने, द्वेषाने पाहण्याच्या वृत्तीत वाढ होत आहे. हिजाबवरून सुरू झालेला वाद हे केवळ एक उदाहरण म्हणता येईल

श्रीरामपुरात आम्ही राहायचो ती चाळ बहुजातीय आणि बहुधर्मीय होती. आमच्या एका भिंतीला लागून एक आणि समोर एक, अशी दोन मुसलमानांची घरं होती. दुसऱ्या भिंतीला लागून मराठा कुटुंबाचं घर, तर समोर माळी कुटुंबांची तीन घरं होती. दुसऱ्या एका टोकाला आणखी एक मुसलमान घर होतं. थोड्या अंतरावर असलेल्या एकमजली इमारतीत इतर जातींतली आणि मारवाडी समाजाची घरं होती, तर चाळीच्या अगदी शेवटच्या टोकाला दगडी बांधकामाची बैठी घरं होती...

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत, म्हणजे ज्ञान-विज्ञान, औपचारिक शिक्षण, लोकशिक्षण, प्रबोधन, राजकारण या सार्‍यांमध्ये एक मूलभूत बदल आवश्यक आहे (उत्तरार्ध)

वास्तव वा सत्य काय याचे निर्णय केवळ विचार, कल्पनाप्रणाली, सिध्दांत, प्रचार, भाषा, जाणीव, यांनी करता येत नाहीत. वस्तुनिष्ठ सत्य हे केवळ बाह्य जगाची नक्कल, प्रतिबिंब वा प्रतिमा निर्माण करणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. तर ‘सत्य’ हे माणसांनी जग व परिस्थिती आकळून, समजून घेऊन ते बदलण्याशी, त्या बदलण्यात ‘सत्य’ गवसण्याची, एवढेच नव्हे तर ते ‘निर्माण’ करण्याशी आणि त्याचे ज्ञान होण्याशी ते जोडलेले आहे...

आयुष्यातल्या प्रत्येक घटनेकडे दोन विरुद्ध प्रकारच्या नजरांनी बघता येतं. पहिली, तटस्थपणे कार्यकारण भाव शोधून; आणि दुसरी, व्यक्तीसापेक्ष विचारांतून

तुमच्याआमच्या आयुष्यात ‘frequency bias’ सततच डोकावणार आहे. त्यानं काही बिघडत नाही. फक्त, त्याच्या प्रभावाखाली येऊ नका. तो येतो, काही काळ थांबतो, आणि निघून जातो. मग पुन्हा येतो... हे चालूच राहणार. तुम्ही ठाम रहा. सिन्क्रोनिसिटीच्या अनुभवांनीही आपलं आयुष्य सुखद होतं. जीवनातली ही मजा कायम घेत रहा. आयुष्याच्या महावस्त्रावर विविध खऱ्या आणि आभासी आकृतीबंधांची वेलबुट्टी काढत रहा, आपली कथा आपणच रंगवत रहा. हसत रहा...

महाराष्ट्रात म. जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं किंवा तामिळनाडूमध्ये पेरियार यांचं जे योगदान आहे, तेवढंच केरळमध्ये अय्यंकाली यांचं आहे!

अय्यंकाली यांनी केरळमध्ये अस्पृश्यता, निरक्षरता आणि गुलामगिरी यांच्या विरोधात मोठा लढा दिला. जगात अनेक महापुरुष झाले. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी मोठ्या लढाया लढल्या, पण बैलगाडीतून क्रांती घडवणारा मात्र तो एकमेव होता. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं, ‘तुमचं स्वप्न काय आहे?’ त्यावर अय्यंकाली उत्तरले होते, ‘डोळे मिटायच्या आधी मला माझ्या समाजातील दहा-बारा विद्यार्थ्यांना पदवीधर झाल्याचं पाहायचं आहे...

अवघड काळांचा विसर न पडू देता जगण्याचा, माणसांशी जोडलं राहण्याचा, त्यांच्यासाठी उपस्थित असण्याचा सरावच आपल्याला पुढच्या आयुष्यात तारून नेईल

छोट्या गावातली सगळ्यांच्या सहभागातून केलेली संमेलनं हे सगळ्यांसाठी घरचंच कार्य असतं. लहान पोरासोरांपासून उंबरठा कसाबसा ओलांडू शकणार्‍या सगळ्या वयोज्येष्ठांचा त्यात सहभाग असतो. अलीकडे ज्येष्ठ लेखक विचारवंत भालचंद्र नेमाडेंची मुलाखत घेतली. ते म्हणतात त्यानुसार गावं जगली ती त्यामध्ये गुंतलेल्या व गुंफलेल्या सेंद्रिय संबंधांमुळे. याचा अनुभव घेण्यासाठी गावातल्या जिव्हाळ्याचा पोत समजून घ्यावा लागतो...

‘करोनापश्चात जगाचा वेध’ : मुख्य प्रवाहातील महत्त्वाच्या आणि कळीच्या मुद्द्यांकडे नव्याने कसे पाहायचे, याचा सम्यक दृष्टिकोन येण्यासाठी

करोनाने समाजाचे जे अनपेक्षित नुकसान केले आहे, ते लवकर भरून निघणारे नाही. तरीही प्राप्त परिस्थितीत बदलांसाठी आणि भविष्यासाठी आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्याच्या बळावरच आपण खचल्यानंतर सावरतोही. या सकारात्मक दृष्टिकोनाची आपल्याला सांगड घालता यायला हवी. नकारात्मक वाटेवरून सकारात्मकतेच्या संवेदनशील पायवाटेला विस्तारता यावे, यासाठीची धडपड आपण ‘वास्तव’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून करत आहोत...

लोपॅडो टेमॅको सिलॅझो गॅलिओ क्रॅनिओ लेइप्सॅनो ड्रिम हायपो ट्रिमॅटो सिल्फिओ पॅरॅओ मेलिटो कॅटॅकेझी मेनो किच्ल एपि कोसिफो फॅटो पेरिस्टर अलेकट्रायन ऑपटे केफॅलिओ किगक्लो पेलेइओ लॅगॉइओ सिराइओ बॅफे ट्रॅगॅनो टेरायगॉन

हे एका ग्रीक खाद्यपदार्थाचं इंग्रजी नाव आहे. ‘एक्लेझिआझाऊझाई’ या ग्रीक नाटकात या डिशचा उल्लेख आहे. आता हा पदार्थ काल्पनिक होता की, त्या काळी खरंच ग्रीसमधल्या बायका हा पदार्थ शिजवून आपल्या नवऱ्यांना खाऊ घालत होत्या का, हे नक्की माहीत नाही. पण रेसिपीच्या वर्णनावरून तरी यात असंभव असं काही वाटत नाही. इतर कोणताही इंग्रजी शब्द या लांबीचा नाही, असं ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’वाल्यांनी १९९० साली सांगितलेलं आहे...

‘ब्लांडिग्ज’ हा शब्द ‘वुडहाऊसिया’ या स्वप्नभूमीतल्या देशाशी संबंधित आहे. या काल्पनिक देशात अनेक प्रांत आहेत. त्यातल्या एका प्रांताचं हे नाव आहे!

एखाद्या शब्दाच्या व्युत्पत्तीचा शोध घेणं हे एखाद्या शेरलॉक होम्स, अर्क्युल प्वारो, मिस मार्पल किंवा गेला बाजार आपल्या एसीपी प्रद्युम्न यांच्यासारख्या विख्यात डिटेक्टिव्ह लोकांच्या कामगिरीपेक्षा कमी नसतं. वेगवेगळे सुगावे लागतात, पुरावे हाती येतात, अजीबोगरीब अनुमान काढले जातात, आणि मग या सगळ्या उपलब्ध सामग्रीवरून निष्कर्ष निघतात. बहुतेक वेळा तर्कशुद्ध निष्कर्षांवरून हाती आलेला निकाल खरा आणि अंतिम ठरतो...

खाद्यसंस्कृतीवरून कुणी स्वतःला श्रेष्ठ आणि दुसऱ्याला नीच ठरवू नये. आहार पद्धतीनुसार एखाद्या व्यक्तीचे वा समाजघटकाच्या संस्कृतीचे किंवा उच्चनीच पातळीचे मोजमाप होऊ नये!

‘समुद्रातील मासे, आकाशात विहार करणारे पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, वनस्पती आणि फळफळावळ हे तुमचे अन्न आहे,’ असे ‘बायबल’मधील ‘उत्पत्ती’ या पहिल्या पुस्तकात देवाने मानवाला म्हटले आणि हे वचन आज्ञाधारकपणे मी पुरेपूर अमलात आणतो, असे मी गमतीने म्हणतो. गंमतीने यासाठीच की, ‘बायबल’मधले हे वचन शब्दशः स्वीकारल्यास हे विश्व मानवकेंद्रीत आहे, असे मान्य करून पर्यावरण किंवा इतर जीवसृष्टी गौण ठरू शकते...

डॉ. आंबेडकरांसारख्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांसाठी आजीवन खडतर कष्ट करणाऱ्या नेत्याला धर्मपरिवर्तनासाठी ‘बौद्ध तत्त्वज्ञाना’ची ओढ लागावी, यात नवल नाही!

बौद्ध तत्त्वज्ञान पृथ्वीवरील मानवाचे जीवन आणि समाजातील इतर मानवांशी त्याचे संबंध यांना मार्गदर्शन करणारे, वळण लावणारे आहे. मानवाच्या ऐहिक जीवनाकडे ते वैज्ञानिक दृष्टीतून पाहते, परमेश्वराचे अस्तित्व नाकारते. त्याचप्रमाणे पुनर्जन्म, आत्मा, रूढी आणि अंधश्रद्धा व चमत्कार या सर्वांवर या तत्त्वज्ञानाने साफ अविश्वास दाखवला आहे. त्यात समता, न्याय, बंधुत्व, अहिंसा आणि करुणा यावर भर आहे. नैतिकता हा त्याचा पाया आहे...

राम कोल्हटकर : रसिकाग्रणी, शास्त्रीय संगीताचे मर्मज्ञ जाणकार, उत्तम संग्राहक, विनम्र आणि प्रसिद्धीपराङमुख पारदर्शी स्नेही

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात रामभाऊंचं फार मोठं नाव आहे. खरा रसिक श्रोता आणि मर्मज्ञ जाणकार म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. त्यांच्याकडे मोठमोठ्या गायकांच्या मैफिलींची रेकॉर्डिंग्ज, दुर्मीळ फोटो, बड्या लेखकांची हस्तलिखितं आणि पत्रं आहेत. त्यातलं काही कोणाला हवं असेल तर ते हक्कानं रामभाऊंना साकडं घालतात. आणि त्यांची इच्छा पूर्ण होते. आपल्याजवळचा अमूल्य खजिना शेअर करण्यात त्यांना आनंद मिळतो...

जतीन देसाई : जतीनची संभावना काही वेळा एका विशिष्ट वर्तमानपत्रांतून तसेच काही कुत्सित जनांकडून ‘पाकड्या जतीन’ अशी केली जाते

आज तुम्ही-आम्ही जतीनला वेगवेगळ्या चॅनेलवर बोलताना बघतो. त्याचे वेगवेगळ्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाइटवरचे लेख वाचत असतो. त्यातून त्याचा कायम पाकिस्तानविषयीचा सामंजस्याचा तसंच सहानुभूतीचा सूर प्रगट होत असतो. मुस्लिमांविषयी जतीनच्या मनात एक ओलाव्याचा धागाच आहे. त्यामुळेच अगदी अलीकडल्या काळापर्यंत जतीनची संभावना काही वेळा एका विशिष्ट वर्तमानपत्रांतून तसेच काही कुत्सित जनांकडून ‘पाकड्या जतीन’ अशी केली जाते...

पोर्नोग्राफी हे मुळात समस्त स्त्रीवर्गाला घृणास्पद रीतीनं अवमानित करण्याचं, पुरुषी वर्चस्वाच्या भावनेतून आणि अतृप्त वासनेतून जन्मलेलं एक हत्यार आहे आणि याला बऱ्याच अंशी लॅरी फ्लिंट जबाबदार आहे!

पोर्नोग्राफी ‘लाइलाज’ आहे. ती कधीच मरणार नाही. पण स्त्रियांकडे बघण्याची आपली मानसिकता तर आपण नक्कीच बदलू शकतो. शोषणविरहित मानवी समाज ही युटोपियन फँटसी आहे, पण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हे एक साधं पाऊल तर आपण नक्कीच उचलू शकतो. आज ‘जागतिक महिला दिन’ आहे. सर्व स्त्रियांना आदर, सन्मानानं वागवणं, त्यांचा मान राखणं, त्यांचं शोषण होऊ न देणं, एवढी जाणीव जरी झाली, तरी ते सध्यापुरतं पुरेसं आहे...

‘डुलाली टॅप’, ‘डेली बेली’ आणि ‘बंगलोर्ड’ : देवळाली, दिल्ली, बंगलोर ही गावं खूप चांगली आहेत. पण तरीही त्यांच्या नावांना कुत्सित, निंदाव्यंजक अर्थ प्राप्त झालाय

देवळाली, दिल्ली आणि बंगलोर या तीन गावांमध्ये काय साम्य आहे? तसं पाहिलं तर काहीच नाही. पहिलं एक छोटेखानी टुमदार गाव आहे, बाकीची दोन महानगरं आहेत. एक उत्तरेला आहे, एक पश्चिमेला आणि एक दक्षिणेकडे आहे. या तिन्ही ठिकाणी भारतीय लष्कराचे महत्त्वाचे तळ आहेत हे एकच साम्य दिसतं बुवा. नाही, अजून एक साम्य आहे. या तीनही ठिकाणांच्या नावांवरून इंग्रजी भाषेत शब्द बनलेले आहेत. आणि हे तीनही शब्द नापसंती-दर्शक आहेत, हे विशेष...

आपण आपली राजकीय मते अत्यंत विचारपूर्वक ठरवलेली आहेत आणि आपल्या विरोधकाची मते मात्र त्याच्या स्वार्थी स्वभावाचा परिपाक आहेत, अशी आपली भावना असते...

आजकाल भारत देशात डावे विरुद्ध उजवे अशी दरी तयार झाली आहे. अनेक लोक त्या दरीच्या आहारी गेलेले आहेत. डावे आणि उजवे हा फरक मुख्य मानला जात आहे. परंतु, हान्स आयझेन्कच्या अभ्यासावरून आपल्या लक्षात येते की, कठोर आणि मृदू अंतःकरणाच्या लोकांमधील फरक, उजवा आणि डावा या फरकापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. खरा राजकीय संघर्ष लोकशाहीवादी उजवे आणि लोकशाहीवादी डावे असा नसतो. खरा संघर्ष जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये असतो...

गाडगेबाबा : एका निरक्षर माणसाने शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे, नव्हे त्यासाठी अनेक कृती कार्यक्रम हाती घ्यावेत, ही गोष्टच महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व अशी आहे!

गाडगेबाबा एक मानवनिष्ठ संत होते. दुसऱ्यासाठी कसे जगावे, हा महान संदेश देत नवसमाजनिर्मितीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ‘खराटा’ हा श्रमप्रतिष्ठेचा फार मोठा मूल्यसंस्कार आहे, हे त्यांनी समाजमनावर बिंबवले. महात्मा गांधीजींच्या अगोदर श्रमप्रतिष्ठा हा मूल्यविचार मांडला. काम केल्याशिवाय कुठेही फुकट खाऊ नये, असा त्यांचा कटाक्ष होता. म्हणूनच आपल्या कीर्तनातून ते ऐतखाऊ समाजावर अगदी तुटून पडत...

‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक

गेल्या २५-२६ वर्षांत ‘ऋतुरंग’ने आपले ‌वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे. या वर्षीचा त्याचा विषय आहे – ‘लढत’. करोनामुळे मानवी जीवनावर जे अभूतपूर्व संकट कोसळले आहे, त्याची पार्श्वभूमी या विषयाला आहे. ‘लढत’ हा मानवी जीवनाचा स्थायीभावच आहे. त्यामुळे केवळ करोनाभोवती हा अंक नसून एकंदर माणसांनी वेगवेगळ्या पातळीवर दिलेली लढत या अंकांतून पाहायला मिळते. म्हणजे या लढतीचे वेगवेगळे आविष्कार या अंकातून पाहायला मिळतात...

दैवतीकरण आणि उदात्तीकरण हे हळव्या भावस्थितीचे मोठे आधार ठरतात. या दैवतीकरणाचे आणि उदात्तीकरणाचे उत्तराधिकारी म्हणविणारे अख्खा समाजच वेठीस धरू पाहताहेत.

देव हयात आहे, हे सांगायला कष्ट पडत नाहीत; पण देव नाही हे सांगायला मात्र आपल्याला आयुष्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. आणि अनेकांनी ही किंमत मोजूनही आजतागायत आपण आपल्याभोवती फक्त देवत्वाचाच एल्गार ऐकत आलो आहे. देव ही  संकल्पना ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार आकाराला आलेली असते हेही खरे आहे; पण ती पुढे ज्याच्या त्याच्या मगदुरानुसार न जाता कुणा एका शक्तीच्या मगदुरानुसार आकाराला येते...

एका न्यायमूर्तीची व्यथा : मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू?

मी आंधळ्यांच्या बाजारात आरसे विकण्याचा उद्योग करीत आहे. परंतु माझ्याही स्वभावाला औषध नाही. त्याला मी काय करू? लहानपण मी महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व मंतरलेल्या वातावरणात घालविले. हिमालयाच्या उंचीच्या व्यक्ती बघितल्या. आता पंगू व ठेंगण्या व्यक्ती बघत आहे. त्यांच्यासोबत जगतही आहे. मीही त्यांच्यातला एक आहे. तरीही मन मानत नाही. समझोते करू इच्छित नाही. त्याला माझा नाईलाज आहे...