निसर्ग आणि समाज या दोहोंसाठी प्रचंड उपयोग असूनही, भारतातील बांबू उद्योग अजूनही अविकसित आणि प्राथमिक टप्प्यावरच आहे!
बांबू मार्केटमध्ये भारताचा एकूण वाटा फारच कमी आहे. तथापि, भारताच्या बांबू अर्थव्यवस्थेत काही खाजगी कंपन्या चांगले काम करत आहेत. त्यांना दासो आणि चीनच्या अनेक कंपन्यांशी स्पर्धा करणे आणि क्षमता वाढवणे आवश्यक आहे. तसेच उत्तर पूर्व, मध्य भारत, दक्षिण भारत यांसारख्या क्षेत्रांमध्ये ग्राउंड लेव्हलवर क्लस्टर आधारित दृष्टीकोन विकसित करणे आवश्यक आहे. तिथे बांबूचे जास्त उत्पादन होत असल्यामुळे प्रचंड क्षमता आहे...