ओपेनहायमर ‘देशद्रोही’ नव्हते, पण ‘मॅकार्थिझम-ग्रस्त’ वातावरणाने त्यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण केले...
प्रचंड असत्य, अपमाहिती, खोटे आरोप यांची राळ उडवायची. समोरील व्यक्तीचे चारित्र्यहनन करायचे. त्यास ‘देशद्रोही’ ठरवायचे, हे एकीकडे आणि दुसरीकडे समाजासमोर सातत्याने एक शत्रू उभा करायचा. त्याच्यापासून आपल्याला, राष्ट्राला, धर्माला धोका आहे, असे सांगत द्वेष आणि भय यांचे वातावरण उभे करायचे. त्यातून तयार होणाऱ्या भयग्रस्त, हिंस्त्र, उन्मादी झुंडींद्वारे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करायचे... हा ‘मॅकार्थिझम’!...