लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो...

नावल-अल-सदावी : अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज

नावल-अल-सदावी. स्त्री हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेली इजिप्तशियन स्त्रीवादी लेखिका-कार्यकर्ती. तिच्या विरोधाची धार स्त्री-सुंता करण्यासाठी वापरात येत असलेल्या पात्यापेक्षाही तीव्र-तीक्ष्ण. गेल्या वर्षी २१ मार्च रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी सदावीचे निधन झाले. तसे अरब जगतातल्या पिचलेल्या-दबलेल्या स्त्रियांचाच नव्हे, तर समस्त जगातल्या न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्त्रियांचा बुलंद आवाज निमाला...

सुशिक्षित, उच्च-सुशिक्षित स्त्रियांची भूमिका आता निश्चित होणे, हाच त्यांच्या मुक्तीचा मार्ग ठरणार आहे. सर्व प्रकारच्या शोषणातून मुक्त झाल्याशिवाय अस्सल अर्थाने स्त्री-मुक्ती साध्य होणार नाही!

निर्घृण पुरुषी सत्तेविरुद्ध दीर्घकाल युद्ध करून अतिशय कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याचा स्त्रिया खरेच आत्मविकासासाठी आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी उपयोजन करतात का? वर्ण-जात संघर्षाचे युद्ध ते पुढे नेत आहेत का? त्यांचे पुन्हा नव्या स्वरूपात ‘वस्तूकरण’ तर होत नाही ना? हे आणि असे काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे. स्त्री-स्वातंत्र्य युद्ध अनेक शतके ‘समांतर रीती’ने जगातील बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये विकसित झाले...

फुले दाम्पत्याच्या कार्यामुळे केवळ मुक्ता साळवेला ‘मुक्तीचा मार्ग’ मिळाला नाही, तो इतर सर्व स्त्रियांना मिळाला, तसाच तो तमाम पुरुषांनाही मिळावा!

गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हे सारं वास्तव माहिती असतं. स्वयंघोषित गुरू, बाबा, महाराज, योगी, साधू आणि त्यांच्या संस्था, देवस्थानं, आखाडे आणि त्यांचे सत्संग, स्वाध्याय यात जनता अडकलेली आहे. हे सारे उपक्रम स्त्रियांच्या दुय्यमत्वाला, अंधश्रद्धांना, रूढी-परंपरांना आणि विशिष्ट प्रकारच्या राजकीय विचाराला खतपाणी घालणारे असतात. या विचारांची समीक्षा करून मग ते स्वीकारावे, अशी मानसिकता निर्माण होत नाही...