हेन्रिएटा लॅक्स : मृत्यूनंतरही पेशीपेशींत जगणारी तुम्हाआम्हाआपणासगळ्यांची आई!
हेनरिएटा एक प्रेमळ आई होती, तिला तिची मुले फार प्रिय होती. तिला गाण्याची, नाचण्याची आवड होती. पण तिचे आयुष्य कॅन्सरने अवघ्या ३१ वर्षी संपवले. तिच्या मृत्यूनंतर तिने अगणित जणींचे आयुष्य कॅन्सरला पराभूत करून वाचवले आहे, आजही वाचवत आहे. आज जगाला करोनाने ग्रासले आहे, पण हेनरिएटा तयार आहे, तिच्या अब्जावधी लेकरांना वाचवण्यासाठी. HeLaच्या मदतीने करोनाला हरवू शकू हा विश्वास शास्त्रज्ञांना आहे...