तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला...

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली ...

जोसेफ पिंटो : आपल्या जीवनकार्याने हे जग चांगले बनवण्यासाठी, त्यातले चांगूलपण अबाधित राहण्यासाठी सदोदित प्रयत्न करणारा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता

भारत हे बहु-धार्मिक, बहु-जातीय आणि बहु-सांस्कृतिक राष्ट्र आहे, या कल्पनेवर पिंटो यांचा प्रगाढ विश्वास होता. त्यामुळे त्यांचा सामाजिक समरसतेला नेहमीच पाठिंबा असायचा. पत्रकार म्हणून त्यांना पुण्यातील विविध संस्थांमध्ये पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात विशेष रस होता. इंग्रजीत लिहू इच्छिणाऱ्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पिंटो नेहमी प्रोत्साहन आणि प्रेरणा देत...

म. गांधींच्या दीड वर्षाच्या सहवासाने अरुण खूपच बदलले, आयुष्यभर पुरेल इतका ‘प्रेमाचा वारसा’ व ‘रागाचे वरदान’, अशी शिदोरी त्यांना मिळाली. त्या बळावर पुढील ७५ वर्षे ते कार्यरत राहिले

‘कष्टाविना संपत्ती, विवेकहीन सुखोपभोग, चारित्र्यविना शिक्षण, नीतिमत्तारहित व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागरहित भक्ती, तत्त्वहीन राजकारण’, ही बापूंनी जगभर लोकप्रिय केलेली सात सामाजिक पातके. त्याला Rights without Responsibility, जबाबदारीविना अधिकार हे आठवे पातक अरुण गांधी यांनी जोडले. ही पातके कमी होत जावीत, यासाठी काम करणारे अरुण गांधी स्वतःला ‘शांती पेरणारा शेतकरी’ असे संबोधत असत...

सुनील देशमुख यांनी मागील २८ वर्षांत जी भूमिका निभावली, ती पाहता, त्यांना महाराष्ट्राच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रांतील ‘कॅटलिस्ट’ संबोधने योग्य ठरेल

सुनील देशमुख यांनी दोन कोटी रुपये ही प्रारंभीची गुंतवणूक केली, ते केवळ भागभांडवल होते आणि नंतर २८ वर्षे त्यांनी स्वतःचा वेळ, ऊर्जा, बुद्धी यांची जी गुंतवणूक केली, तिचे मूल्य शेकडो कोटी रुपयांमध्ये मोजावे लागेल. अन्यथा दोन कोटी रुपये देणारे पूर्वीही कमी नव्हते आणि आजही कमी नाहीत. पण असे दोन कोटी रुपये देऊन असे पुरस्कार या पद्धतीने व या प्रकारे देऊन इतके परिणामकारक काम करता येणार नाही...

सय्यदभाई : इस्लाम आणि कुराणावर श्रद्धा कायम राखून मुस्लीम समाजातील अनिष्ट चालीरीतींची धर्मापासून फारकत व्हावी, अशी आग्रहाची मागणी करणारा संघर्षशील कार्यकर्ता

मजबूत बांध्याच्या आणि टोकदार मिशा असलेल्या सय्यदभाईंना पाहिले म्हणजे, ही व्यक्ती पोलीस अथवा सुरक्षा किंवा कायदेव्यवस्था हाताळणाऱ्या एखाद्या खात्यातील अधिकारी असावी, अशी समजूत कोणाचीही व्हायची. अन्यायकारक सामाजिक रूढी आणि कायदेकानून बदलण्याच्या कामाला सय्यदभाई यांनी अनेक वर्षे स्वतःला वाहून घेतले होते. ‘समान नागरी कायद्या’साठी अनेक वर्षं झगडणाऱ्या देशातील मूठभर व्यक्तींपैकी सय्यदभाई एक होते...

पुष्पाताई गणिताच्या बाबतीत ‘अन-अ‍ॅपोलोजेटिकली प्यूरिस्ट’ असाव्यात. त्यांचा गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘गणितासाठी गणित, रिगरसाठी-कसासाठी गणित, बौद्धिक आव्हानासाठी गणित’ असा असावा

पुष्पाताईंच्या बोलण्यातले विराम अर्थपूर्ण असत. आपल्याला काय वाटतं किंवा म्हणायचं आहे, हे स्पष्ट होईपर्यंत त्या थांबत असाव्यात. आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा असायला पाहिजेत, असाही त्यांचा आग्रह नसे, असं मागे बघताना वाटतं. पुष्पाताईंनी आम्हाला अर्थातच गणित शिकवलं. माझ्यासकट अनेकांना आपण बारावीत गणितात पास होऊ शकतो, इथपासून ते आपल्याला गणित(सुद्धा) समजू शकतं इथपर्यंत आत्मविश्वास दिला...

जयंत पवार गेले त्या वेळची गोष्ट (हात थरथर कापायला लागले. आपली कवचकुंडले कुणीतरी काढून घेतलीत, त्वचा सोलून काढली जात आहे, असा भास होत राह्यला…)

जयंत पवार गेल्याचं कळलं, आणि मी सुन्न झालो. एक हात आणि पाय लुळा पडल्याचा भास झाला. अंगाला कापरं सुटलं. काहीच सूचेना. दाट निबिड अरण्यात आपल्याला एकटे सोडून सगळे निघून आलेत आणि आपला रस्ता हरवला आहे. हो, खरंच रस्ता हरवला आहे. हे केवळ भावनिक नाही. त्यांच्या लेखनाने आणि सहवासाने माझ्यासह आमच्या पिढीला एक नवा मार्ग दाखवला आहे. तो वाटाड्याच आता आपल्यात राह्यला नाही. लेखक कसा असावा, याचा उत्तम आदर्श म्हणजे जयंत पवार होत....

अभिनयाची पार्श्वभूमी नाही, प्रशिक्षण नाही, उच्चशिक्षितही नाही, तरीही दिलीपकुमारने अभिनयाची स्वतःची चौकट तयार केली. ‘नैसर्गिक अभिनया’चा ‘वस्तुपाठ’ घालून दिला...

दिलीपकुमारने आपल्या अभिनयशैलीचे ट्रॅक सहजपणे बदलले. त्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्या कारकीर्दीचे सरळसरळ तीन टप्पे पडतात. ५०च्या दशकातला ‘ट्रॅजडी किंग’, ६०-७०च्या दशकातले हलकेफुलके व ड्रॅमॅटिक सिनेमे आणि ८०च्या दशकातला सुडाने पेटलेला म्हातारा. नंतर त्याच्या या दुसर्‍या इनिंगला ब्रेक लागला. परंतु, दिलीपकुमार संपला असं वाटत असतानाच त्याने नखं काढली. सुरुवात मनोजकुमारच्या ‘क्रांती’ने झाली...

सामान्य माणूस कल्पकतेने विचार करून एक मूलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्याची मागणी तयार करून चिकाटीने लढून जिंकू शकतो, हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं!

दत्ता अतिशय दिलखुलास आणि मिस्कील असला तरी सगळ्याला मोहक मालवणी छटा होती. किस्से  खुलवून सांगण्यात  त्याची हातोटी होती. त्याच्या पारदर्शक प्रेमळपणातून अनेक मित्र जोडले गेले. दत्ताला व्यक्तिगत लाभाची कुठलीच अपेक्षा कधीच नसल्याने मैत्रीमध्ये अकृत्रिमपणा जोडला जाई म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लढणारा दत्ता मॉडर्न मिल कंपाउंडमधील जुन्या सिंगल रूममध्ये राहिला. त्याच्या नजरेतून गिरणगाव पाहिला...

रत्नाकर मतकरी : लेखक कसा असावा, त्याने काय करावे याविषयी अवाक्षरही न उच्चारता ज्यांनी मला खूप काही शिकवलं, असा हा फार मोठा लेखक, त्याहून मोठा माणूस!

मतकरींनी या दोन्ही गोष्टी आयुष्यभर जीवापाड जपल्या. लेखणी, म्हणजे लेखनाशी असणारी त्यांची बांधीलकी आणि लेखक व माणूस (या दोन्ही गोष्टी वेगळ्या नसतातच) असणारे शील – आपण ज्या समाजात, पर्यावरणात जगतो, त्याबद्दल असणारे आपले कर्तव्य, बांधीलकी, ते देणे विविध पद्धतींनी देण्याची सहज ऊर्मी. या दोन्ही गोष्टी जपल्यामुळे रत्नाकर मतकरी नावाचा कवी आयुष्याची, लेखनाची दीर्घ कविता तालासुरात रचू शकला...