शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण...

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते...

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे...

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा ...

मूळ चाणक्याने साम-दाम-दंड-भेद वगैरे ‘दबंगाई’ मान्य केली होती, परंतु सगळी तत्त्वे पायदळी तुडवावीत, असे तो कधीच म्हणालेला नव्हता, ही गोष्ट ‘मोदीकालीन भारता’तील लोक विसरले होते!

शिरोजीने ऐन ‘अँटिक्लायमॅक्स’च्या सर्वांत खालच्या बिंदूवर बखर संपवल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मोदी-काळात कुणालाही ‘चाणक्य’ म्हणायची प्रथा पडली होती. पैसा आणि इतर दबंगाई करून मार्ग काढणाऱ्या कुणाही नेत्याला त्या काळी ‘चाणक्य’ म्हणायची पद्धत पडली होती. अजून एक म्हणजे विश्वासघात करून आपले राजकीय आणि आर्थिक हित साधणाऱ्या कुणाही तत्त्वहीन नेत्याला ‘मोदीकालीन भारता’त ‘चाणक्य’ म्हणण्यात येत असे...

या लेखात आम्ही पवारसाहेबांबद्दल चांगले बोलतो आहोत की, त्यांच्यावर टीका करतो आहोत, याविषयी तुमचा गोंधळ उडाला, तर त्यांचे राजकारण आमच्या थोडे का होईना लक्षात आले आहे, असे समजायला हरकत नाही!

आमच्या मते संकल्पना आणि राजकारण, या दोन्ही गोष्टींवर अतिशय मजबूत पकड असलेले शरद पवार हे एकच नेते आम्ही जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे अदानी यांना हिंडेनबर्गने ‘लक्ष्य’ केले आहे, असे साहेब म्हणाले, तेव्हा आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही. साहेब याविषयी नक्की काय म्हणाले आहेत, हे आम्ही शांतपणे वाचत बसलो असताना आमच्या एका विद्वान मित्राचा फोन आला. त्यांनी साहेबांबद्दल नाराजी व्यक्त करायलाच फोन केला होता...

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

युद्धाच्या पहिल्या दिवशी ‘व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठा’त विनोदाचा तास होता! नाही म्हणायला अगदी दोन दिवसांआधीपर्यंत बायडन यांना ‘म्हातारचळ’ लागला आहे, असे दावे करणारे जरा नरमले होते. पहिल्या दिवसाच्या विश्लेषणास एकच फ्लेवर होता. तो म्हणजे ऐन वेळी धुलाईच्या वेळेस गायब होणाऱ्या मित्राची तुलना NATO म्हणजेच पर्यायाने अमेरिकेशी केलेली होती. दुसऱ्या दिवशी मात्र मेसेजेसना ‘युद्धस्य कथा रम्या’चे रूप येऊ लागले...

१८ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील मतदानाची तिसरी फेरी समाप्त झाली. मोदी-योगींचे समर्थक आणि विरोधक या दोघांमध्येही आनंदाची लहर उठली...

खुद्द पंतप्रधानांचे इतके मोठे ‘स्टेक’ असल्याने त्यांचे साहाय्यक श्रीमान अमितजी शहा यांनी सुरुवातीलाच या निवडणुकीतील ‘स्टेक’ वाढवले. त्यांनी लोकांना आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकले होते - ‘येत्या २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असेल तर ‘बीजेपी को उत्तर प्रदेश विधानसभा में जिताना होगा.’ पण, गंमत अशी झाली की, आपण हे कुठून बोलून बसलो असे त्यांना झाले...

शिरोजीची बखर : प्रकरण सहा - भारतीय राजकारणाचा हा कालखंड उत्तरोत्तर रोचक होत गेला. शिरोजी स्वतः या कालखंडाचा इतिहासकार बनून हे सर्व कांड आपल्यासाठी लिहीत गेला, हे आपले भाग्य!

आज २१२१मध्ये आपण हे सगळे बोलणे सोपे आहे. कारण इतिहासात काय घडले हे आपल्या डोळ्यासमोर आहे. शिरोजी लिखाण करत होता, ते या काळाच्या प्रवाहात राहून. आपल्याला आज जो ‘परस्पेक्टिव्ह’ आहे, तो त्याला नव्हता. परंतु त्या काळात राहून काळाची पावले कुठल्या दिशेने चालली आहेत, हे शिरोजीने बरोबर ओळखले होते. मोदीप्रणित राजकारणाच्या कोलाहलातून देशाच्या हाती काहीही लागणार नाही, हे शिरोजीने ओळखले होते...

अविनाशला एका क्षणासाठी एक गहन सत्य कळले. मानवता हे सर्वोच्च मूल्य आहे. अंतिम मूल्य आहे. बाकी कुठलीही मूल्ये ही महत्त्वाची असली तरी दुय्यम आहेत

बरोबर शंभर वर्षांपूर्वी बखरकार शिरोजी याने बखर लिहायला सुरुवात केली. तो काळ मोठा खळबळीचा होता. हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी ‘हिंदुत्ववाद’ नावाच्या राजकीय तत्त्वज्ञानाने घेतली होती. शिरोजी ज्यांचा उल्लेख मोदीजी असा करतो, ते म्हणजे तत्कालीन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी होत. आज त्यांचे नाव राजकीय विश्लेषक सोडून कुणाला माहीत असणे अवघड आहे. परंतु तत्कालीन भारतात त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती...