राजकारण की टोळी युद्ध? Democracy Betrayed?... लोकशाहीच्या नावाखाली पुन्हा आपण मध्ययुगाकडे - सरंजामशाहीकडे – चाललो आहोत का?
त्या काळात सरंजामदार आणि राजे उत्पादक शेतकऱ्याला लुटायचे, बडवायचे, ओरबाडायचे, त्यामधल्या काही जणांना सैन्यात जाऊन लुटारूच बनण्याशिवाय तरणोपाय राहणार नाही, असं कारस्थान रचायचे. तीच वैरभावना, एकमेकाला संपवण्याची भाषा, गॅंग बदलणे, नवी गँग तयार करणे किंवा गॅंगच्या पुढाऱ्याला बाजूला करून (कधी कधी प्रत्यक्ष ‘खलास’ करून) गँग ताब्यात घेणे!...