कर्नाटक विजयानंतर काँग्रेसने तेलंगणात कात टाकली आहे. त्यामुळे भाजप व केसीआर यांच्यासमोर पेच उभा राहिला आहे
तेलंगणात ४८ टक्के ओबीसींशिवाय अनुसूचित जाती १७ टक्के, अनुसूचित जमाती ११ टक्के आणि मुस्लीम १३ टक्के आहेत. या घटकांना सत्तेत वाटा देऊन आणि कल्याणकारी योजनांचा सपाटा लावून केसीआर यांनी त्यांना गेली दहा वर्षं सोबत ठेवलं आहे. मात्र एक ना अनेक कारणांमुळे आता केसीआर यांची या घटकांतील जादू कमी होत आहे. ही बदलती परिस्थिती पाहून केसीआर यांनी नव्यानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे...