‘दी क्वीन अँड दी रीबेल्स’ : या नाटकातील राणी हे सत्तेचं एक सांकेतिक प्रतीक आहे. ती बंडखोरांप्रमाणेच निष्ठावंतांनाही घाबरते. तिला काहीही नको असतं, फक्त भीतीमुक्त, शांत झोप हवी असते

कळसूत्री बाहुली उभी करून, काही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरुद्ध क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने काहीच केलेलं नाही. ती लपूनछपून दिवस काढत राहते, आणि स्वत:ची ओळख लपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. त्यातून तिला एक मुलगाही होतो. पण ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठावाल्यांचा स्वार्थ आहे. त्यांना कोणाच्या तरी नावानं हे चालू ठेवायचं आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात...

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता...

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत...

राहुल गांधी मंदिरांना भेटी देतात म्हणजे ते धार्मिक आहेत असे नव्हे. ते धार्मिक असण्यापेक्षा आध्यात्मिक आहेत. ते हिंदू संस्कृती-धर्म जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कदाचित ते भाजपच्या हिंदुत्वाला टोकाचा विरोध करतात. त्यांनी उपनिषदे वगैरे वाचलेले आहे. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधी जाहीरपणे खोटे बोलल्याचे अजून तरी दिसलेले नाहीत. राहुल गांधींना महादेवाचे म्हणजे शंकराचे प्रचंड आकर्षण आहे...

‘शब्दांची रोजनिशी’ : वरवर हे नाटक जरी भाषेच्या राजकारणाचा प्रश्न उपस्थित करत असले, तरी ते मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देते

या नाटकात दोनच पात्रे आहेत. पुरुषाचे नाव ‘ज्ञ’ आहे आणि स्त्रीचे ‘अ’. या अतितंत्रशास्त्रीय जगात भाषा लुप्त होत आहेत. जिवंत माणूस मोबाईलचा... आधार कार्डचा नंबर झाला आहे. त्याला जिवंत आयडेंटिटी राहिलेली नाही. केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याचा जगाशी संपर्क आहे. प्रत्यक्ष जैवसंबंध पूर्णपणे अनुपस्थित आहे. त्यामुळे हे जणू अति-उत्तर-आधुनिक काळातील ३२१व्या मजल्यावर राहणारे ईव्ह आणि ॲडमच असावेत असे वाटते...

धर्मचक्राच्या चोवीस आऱ्या म्हणजे धर्मपालनाची चोवीस तत्त्वे. आपले पंतप्रधान आणि चोवीस तत्त्वे! आम्हाला हळूहळू स्लो-मोशनमध्ये सगळे उलगडत गेले

खूप विचार करूनही आम्हाला उत्तर सुचले नाही. शेवटी नड्डाजींचा फोन आला की, मोदीजी स्वर्गाचा कारभार रात्री चालवतात, आणि मुख्य म्हणजे सूक्ष्म रूपात चालवतात. आम्ही चकित झालो. आम्ही म्हटले, ‘नड्डाजी तुम्हाला कसे कळले की, आमच्या डोक्यात हाच विचार चालू आहे?’ नड्डाजी गालातल्या गालात हसल्याचे आम्हाला व्हिडिओ कॉल असल्यामुळे दिसले. नड्डाजी भाजपच्या स्वर्गशाखेचेसुद्धा अध्यक्ष आहेत, हे आम्ही तात्काळ ओळखले...

गोपराजू रामचंद्र राव उर्फ गोरा यांची ईश्वरावर श्रद्धा नव्हती. त्यामुळे गांधी वर्तुळात गोरा काही प्रमाणात अस्वीकारार्ह होते…

हे पुस्तक म्हणजे चार वर्षांपेक्षा कमी अवधीमधील गांधीजींसोबतचा व्यक्तिगत संपर्क आणि पत्रव्यवहाराची कहाणी आहे. अपरिचित आणि काहीसे नकोसे वाटणारे गोरा, गांधीजींचे निकटवर्तीय होऊन त्यांच्या ‘कुटुंबाचे’ प्रिय सदस्य कसे बनले आणि गोरांच्या नजरेतील महान राष्ट्रीय नेते गांधीजींचे रूपांतर व्यक्तिगत संबंधात होऊन ते उच्च नैतिक पातळीचे गुरू कसे बनले आणि आदर अधिकाधिक वृद्धिंगत कसा झाला, या संबंधी हे पुस्तक आहे...

राज्यकर्त्यांवर धाक ठेवण्यासाठी थोरो-गांधीजी यांनी आखून दिलेला आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला ‘सविनय कायदेभंगा’चा मार्ग, हेच प्रभावी साधन आहे

वैयक्तिक सत्याग्रहाचा गांधीजी-विनोबा प्रयोग जरी भारतात झाला असला, तरी आज अशी उदाहरणं भारतात कमी बघायला मिळतात आणि अशा व्यक्तीची स्वीकारार्हताही आपल्याकडे कमी दिसते. ग्रेटा थूनबर्गला स्वीडनमध्ये मिळणारी वागणूक आणि दिशा रवीस आपल्याकडे मिळणार प्रतिसाद, यात खूप तफावत पाहायला मिळते. ‘सविनय कायदेभंग’ हा कितीही नकोसा असला तरी राज्यकर्त्यांनी आंदोलनाविषयी किमान सहानुभूती दाखवण्याची आवश्यकता असते...