फिलॉसॉफीमध्ये सखोल ‘इन्साइट’ तर आहेतच, पण जीवनातून अर्थ काढण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आहे! ती आपल्याला जीवनाच्या जवळ नेते!!
कुणी गंभीरपणे बोललं की, आपण लगेच त्याला म्हणतो, ‘ये बाबा, फार फिलॉसॉफी झाडू नको!’ आणि मोठ्यानं हसतो तरी किंवा वैतागतो तरी! पण तेव्हा ती व्यक्ती खरंच फिलॉसॉफी झाडत असते? फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, म्हणजे काय? तर जगण्याचे नीतीनियम. नीतीपूर्ण जगण्यात स्वातंत्र्याचं, प्रेमाचं, न्यायाचं महत्त्व असतं. फिलॉसॉफी त्यातल्या सीमारेषा स्पष्टपणे अधोरेखित करते...