‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादाच्या निमित्तानं सलमाच्या जगात मिसळण्याचा ‘जो’ अनुभव मिळाला, तो स्वत:पलीकडे नेणारा होता...
या अनुवादामुळे एखाद्या कामासाठी नेटानं बसायची सवय लागली. भावनेला किंवा क्रियेला नेमके शब्द शोधावेत, अशी आस निर्माण झाली. शब्द सापडत जाण्याचा व भावना नेमकी पोहोचवण्याचा विलक्षण आनंद मिळाला. स्वातंत्र्य, नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना, स्त्रीवाद, मानवी संस्कृती, धर्मांधतेमुळे येणारी कट्टरता या सगळ्याचा एक वेगळा विचार जो यातल्या बायकांच्या नजरेतून सुरू केला होता, त्याबद्दल माझं एक आकलन तयार झालं...