तुकाराम शृंगारे या खासदार, केंद्रीय मंत्री आणि मराठवाडा विकास महामंडळाचं अध्यक्षपद भूषवलेल्या नेत्यास शेवटपर्यंत स्वत:चं घर बांधता आलं नाही!

यावर आज कुणाचाही विश्वास बसणं अशक्य आहे. काही वर्षांपूर्वी अशा अनेक नि:स्वार्थी व निरलस व्यक्ती भारतीय राजकारणात सक्रिय होत्या. लातुरातील तुकाराम श्रृंगारे - टी.एस. उर्फ बाबा (२० मे १९३८ - ८ जानेवारी २०११) हे त्यापैकी एक विरळ व्यक्तिमत्त्व! श्रृंगारे (१९३८-२०११) हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी स्वत:साठी, कुटुंबीयांकरता वा स्वकीयांसाठी कोणतीही संस्था उभी केली नाही...