जर किशोरीताई आमोणकर ‘जशा’ होत्या, ‘तशा’ नसत्या तर...
प्रत्येक मैफलीच्या आधी ताई अस्वस्थ, चिंतातुर, उत्कंठित असायच्या. काही यशस्वी कलाकारांनी यावर असंही म्हटलं आहे की, आपण एवढी साधना केलेली असते, त्याचा काय उपयोग, एवढाही आत्मविश्वास नसेल तर! ताईंच्या समोर कोणी हे मत मांडलं असतं तर त्यांनी सपशेल माघार घेत म्हटलं असतं – “नाही मला आत्मविश्वास” आणि विषय संपवला असता. आणि मग केव्हा तरी जवळच्या शिष्याला म्हटलं असतं – “स्वराला गृहीत धरण्याचा फाजिल आत्मविश्वास नको रे बाळगू!”...