केवळ साक्षीभावाने पाहावे लागण्याचे धबधब्याचे विधिलिखित याही वर्षी चुकलेले नाही…
तथाकथित वृत्तपत्राचा आणि सेना, ब्रिगेड, संघटना यांचा घाटातल्या धबधब्यातला इन्ट्रेस्ट आता संपला आहे. मध्यवर्ती सरकारने घेतलेल्या कुठल्याशा महत्त्वाच्या, दूरगामी, कदाचित आत्मघाती निर्णयावर देशभर चालू झालेल्या चर्चा, निदर्शने, निषेध, आंदोलने इ. मध्ये आता त्यांनी उडी घेतली आहे. तीन हवालदार अजूनही निलंबित आहेत, चौकशीचा फेरा अजून थांबलेला नाही. पावसाळा संपल्यामुळे आता धबधब्याची तब्येतही खालावली आहे...