औटघटकेचे शिराळशेठ!
भाजपला रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी अशी तडजोड करण्याची तयारी सोनिया गांधी यांनी दाखवली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दावा करणाऱ्या भाजपनेही सत्तास्थापनेचे निष्फळ प्रयत्न करण्यापेक्षा प्रारंभीच विरोधकांना शुभेच्छा दिल्या असत्या, तर ते अधिक स्वागतार्ह ठरले असते. अन् त्याला नैतिक उंची मानता आली असती, जी अटलबिहारी वाजपेयींनी केंद्रात दाखवली होती. त्यातील तत्परता, सत्ता लाथाडण्याचे धाडस प्रारंभीच कर्नाटकात द...