भारतातील स्त्रियांची विद्यमान स्थिती चिंताजनक आहे. सर्व आघाड्यांवर त्यांची पीछेहाट सुरू आहे…
गेल्या १० वर्षांत सर्व माध्यमांत येणाऱ्या बातम्यांवर नजर टाकली, तर एवढं लक्षात येईल की, स्त्रियांच्या बाबतीतील सकारात्मक बातम्या जवळपास नाहीश्या झाल्या आहेत. यात मोठी भर टाकलीय हिंदी व मराठी मालिका यांनी. सर्व वयोगटातील स्त्रिया केवळ कुचाळक्या, लफडी, भांडण, कारस्थान करत असतात, हे पटवून देण्यात सर्व माध्यमांना यश आलं आहे. मालिकेतली स्त्री पात्रं आता आपल्या सर्वांच्या प्रत्यक्ष आयुष्यातही दिसू लागली आहेत...