तळवलकर – एक मूल्यमापन
लोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे...