‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के
आपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते...