आभासी पुढारलेपणाच्या पांघरुणाखाली मिळणाऱ्या स्वातंत्र्यात अजून किती काळ महिलांना आपलं अस्तित्व शोधावं लागणार आहे, कोण जाणे!
वर्षातून एकदा तिच्या कामाचं, कर्तृत्वाचं, बाईपणाचं कोडकौतुक करून तीला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव करून देणं, याला ‘पुरुषी अहंकार’ सुखावण्याचाच भाग म्हटला तर खोटं ठरणार नाही. मात्र यात वाईट काही असेल तर ते हे की, महिलांना हे आभासी स्वातंत्र्यच खरं वाटून याची भुरळ पडते. गंमत म्हणजे, मी माझ्या बायकोला, मुलीला, प्रेयसीला हवं तसं वागण्याची मोकळीक दिली आहे, हे सांगतानाही पुरुष आपला अहंकार कुरवाळत असतो!...