‘हरिण, बकरी घ्या आणि त्याच्या बदल्यात पांडा द्या’, असे कुणी सांगितले तर? किंवा ‘पाम तेल खरेदी करा आणि माकड भेट घ्या’ अशी ऑफर मिळाली तर?
राजकारण, शह, काटशह, कुरघोडी, भेटवस्तू, आमंत्रण, शाही मेजवानी या आणि अशा कितीतरी बाबींचा समावेश परराष्ट्र धोरणात होतो. मात्र, यामध्ये प्राण्यांचेही महत्त्व मोठे आहे, असे कुणी सांगितले, तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरे आहे. मलेशियाने तेथील माकडांबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे त्याची जगभर चर्चा सुरू झाली आहे...