१०० कोटीच्या ‘सैराट’साठी पॉपकॉर्न भाजताना...
पुस्तकी ज्ञान घेऊनच किंवा पदव्या घेऊनच चांगला फिल्ममेकर बनतो असं नाही, पण इतरांची कामं पाहून, सल्ले घेऊन, सराव करून संपूर्ण ज्ञानाकडे किमान वाटचाल तरी करणं आपल्या हातात आहे. नाहीतर प्रदर्शित होऊन आपटलेल्या सिनेमांच्या रांगेत नव्हे, तर चित्रीकरण सुरू असतानाच गुंडाळलेल्या चित्रपटांचा इतिहास आपल्या खात्यावर जमा होईल... आणि स्वप्नातल्या १०० कोटीच्या सिनेमाचे पॉपकॉर्न कच्चेच राहतील....