प्रयोगसिद्ध गानपरंपरांचा मागोवा
सर्वसाधारणपणे गायन\वादनाविषयी लिहिताना ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘अवीट गोड’, ‘दिव्य’ अशा विशेषणांमध्ये वर्णन संपून जातं. पण ‘म्हणजे काय?’ हा प्रश्न उरतोच. रानड्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यात काही एक यश मिळवलं आहे. अलंकारिक, लालित्यपूर्ण, संपूर्णपणे व्यक्तिनिष्ठ अशा उद्गारांतून लेखकाची लेखनवस्तूविषयीची भावना लक्षात येते, परंतु विश्लेषण होऊ शकत नाही. म्हणूनच रानड्यांना ‘गुळचट लालित्य’ वर्ज्य आहे....