‘सचिन – ए बिलियन ड्रीम’ : ओन्ली फॉर सचिन–भक्त!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
महेंद्र तेरेदेसाई
  • ‘सचिन – ए बिलियन ड्रीम्स’ची पोस्टर्स
  • Sat , 03 June 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा सचिन : ए बिलियन ड्रीम्स Sachin - A Billion Dreams सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar

‘Behind every great fortune there lies crime,’ या एका फ्रेंच लेखक, तत्त्ववेत्ता बाल्झाकच्या संकल्पनेला तडा जाईल अथवा खोटं पाडेल असा आत्मचरित्रपट म्हणजे ‘सचिन – ए बिलियन ड्रीम्स’. भारतात क्रिकेट हा धर्म आहे आणि सचिन त्याचा देव आहे हीच कल्पना ग्लोरिफाय करणारा हा माहितीपट आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या ‘देव’ किंवा महापुरुषावर असलेला (रादर त्यानेच तो त्याच्या भक्तांकरिता बनवलेला) एक आत्मचरित्रात्मक माहितीपट.

या माहितीपटाविषयी तीन प्रकारे विचार करावा लागतो.  ती व्यक्ती म्हणून काय आहे? तो माहितीपट म्हणून काय आहे? आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती व्यक्ती त्या माहितीपटातून तुमच्यापर्यंत किती आणि कशी पोहोचते?

हा माहितीपट पाहण्याआधी एक क्रिकेटप्रेमी म्हणून सचिनबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा माहित आहे?

भारतीय क्रिकेट म्हणजे सचिन. एक भरवसा, एक दिलासा म्हणजे सचिन... सचिन म्हणजे नेत्रसुख... बॅटिंग करायला आकाशाकडे पाहात क्रीजवर जाताना त्याला पाहणं म्हणजे एखाद्या कुटुंबाचा कर्ता पुरुष/स्त्री घरी परतताना होणारा आनंद... आता हा आलाय ना... आता आपल्याला जे पाहिजे ते मिळेल. बॅटिंगसाठी गार्ड आणि स्टान्स घेतानाचे त्याचे सगळे विभ्रम... आणि स्टान्स घेतल्यावर बॉलरकडे बघणारी त्याची तेजतर्रार तीक्ष्ण नजर. दीडशेच्या वेगाने आलेला चेंडू आपली पापणी लवते ना लवते तोच आल्यावाटे सीमापार करून काहीच झालं नाही अशा आविर्भावात क्रीजवर उभं रहाणं... त्याच वेळेस स्टेडियमवर आणि घराघरात टीव्हीसमोर उसळलेलो आपण!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गावस्करचा अस्त आणि तेंडुलकरचा उदय. जणू रामावतार संपून कृष्णावतार सुरू झालेला. नाही तो गावस्कर आणि व्हिव रिचर्डचं फ्युजन आहे. अरे नव्हे तो तर क्रिकेटमधील आणखी एक दंतकथा असलेल्या डॉनसारखा आहे, आणि हे खुद्द डॉनच्या बायकोने केलेलं वक्तव्य आहे. त्या म्हणाल्या, त्याला टीव्हीवर खेळताना पाहून मीच खेळतोय असा मला भास झाला, असं तो पुराण-पुरुष डॉन उद्गारला म्हणे. सचिनचा जन्म क्रिकेट पंढरीत झाला, हा त्याला मिळालेला बोनस होता. ‘आज एका मुलाला नेट्समध्ये पाहिला तो भन्नाट आहे’, ‘त्याला पहिल्यांदा नेट्समध्ये मी पाहिला’, ‘ तो माझी फाइंड आहे’  अशा आठवणी अनेक ‘दिग्गजांनी’ नंतर सांगायला सुरवात केली होती.

अक्रम आणि वकार समोर उभा असलेला सोळा वर्षांचा तो पोरसवदा मुलगा बघता बघता ‘सचिन नावाची दंतकथा’ कधी झाला ते आपल्याला कळलंच नाही. हे निव्वळ प्रतिभेने किंवा देवदयेने झालं असं म्हणणं चुकीचं ठरेल. तो आला तेव्हा अनेक प्रतिभावान त्याच्या आजूबाजूला होते. त्याचाच जिवलग मित्र विनोद कांबळी, कलकत्त्याचा सौरव, बंगळूरूचा द्रविड आणि हैदराबादचा लक्ष्मण एकाहून एक प्रतिभावान. आणि तरीही सचिन लखलखून वेगळा दिसला. त्यामागे निव्वळ नियतीचा आणि मैदानातल्या खेळाचा हात नव्हता. एक कुणकुण होती ती म्हणजे त्याच्यामागे (A brain behind) त्याचा भाऊ अजित तेंडुलकर होता. इतर प्रतिभावंताप्रमाणे सचिन मैदानावर धावा करत होता, पण त्याचवेळेस हळूहळू मैदानाबाहेर ‘सचिन’ हे व्यक्तिमत्त्व... एक विभूती... एक ब्रँड बनत होतं. तो काय बोलतो, तो काय करतो, त्याची एकाग्रता, त्याचा उत्साह, त्याचा अभ्यास या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं आणि त्याहून महत्त्वाचं, तुमचं त्याकडे लक्ष वेधलं गेलं. एका बाजूला सचिन एकामागून एक विक्रम मोडत, त्याचं स्टॅटिस्टिक्स भक्कम करत होता. त्याच वेळेस मैदानाबाहेर त्याची प्रतिमा राखण्याचा एक चोख एक्झरसाइज होत होता.

असा होता सचिन. आणि या माहितीपटातही आपल्याला असंच सगळं दिसतं, सांगितलं जातं. त्यात भर पडते सचिनच्या काही खासगी क्षणांची. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण, त्याचं लग्न, त्याची मुलं, त्याचे मित्र यांच्या होम व्हिडिओची. पराभव झाल्यावर, वाईट खेळल्यावर तो कोषात जायचा हे त्याची बायको सांगते, पाकिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये लवकर बाद झाल्यावर अजितला पाकिस्तानला जावंसं वाटतं तो जातो हे सांगितलं जातं. गावस्कर, रिचर्डस, लारा हे त्याच्याविषयी बोलतानाच्या क्लिप्स दाखवल्या जातात. कादिर आणि वार्नला मारलेले फटके दाखवले जातात.  पण.... पण हे सगळं आपण याआधीच त्याच्या प्रेमाखातर युट्यूबवर शोधून शोधून पाहिलेलं असतं. तेच अडीच तासाच्या या माहितीपटात आपल्याला दाखवलं जातं. सचिन आणि अंजलीच्या निवेदनानं सांगितलं जातं. एका महापुरुषाची गाथा त्याच्याच तोंडून.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

असं वाटतं हा माहितीपट बनवण्याचा हेतू हाच होता. जे त्याच्याबद्दल तुकड्या-तुकड्यात पाहिलं ते एकसंध त्याच्या निवेदनात पहा. आणि हेच पाहायची तुमची अपेक्षा असेल तर ती नक्की पुरी होते.

पण जर तुमची अपेक्षा त्याचं चरित्र, त्याचे विचार, त्यावेळचं क्रिकेट, त्यातले पैलू, त्यातलं राजकारण, त्याच्या बरोबरीच्या खेलाडूंविषयी जाणून घेण्याची असेल (ज्याला खऱ्या अर्थाने आपण चरित्रपट म्हणू) तर मात्र तुमची निराशा होईल. साधा ‘चक दे’ हा व्यावसायिक सिनेमा तुम्हाला हॉकीच्या खेळातील तत्त्व आणि तंत्राबद्दल सांगतो. एका वेळेस तो चित्रपट, देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या मुलींमधील वैविध्य व त्यातला संघर्ष आणि शेवटी टीम म्हणून एक होणं, हे दाखवतो. तर दुसरीकडे Man-to-man marking पासून ते Ball passing सारख्या खेळातील तंत्राबद्दल तुम्हाला नाट्यमयरित्या सांगितलं जातं. क्लायमॅक्सला पायाच्या हालचालीवरून किंवा तिच्या स्टान्सवरून ऑस्ट्रेलियन खेळाडू कुठल्या दिशेला पेनल्टी स्ट्रोक मारेल याचा विचार कबीर खान करतो, तेव्हा आपल्यालाही हॉकीची ती माहिती सहज मिळून जाते. नुकताच आलेला ‘दंगल’ चित्रपट, महावीरसिंग फोगट आणि त्याच्या गीता-बबिता या दोन मुलीच्या संघर्षाबरोबरच कुस्ती या क्रीडा प्रकाराबद्दल, उत्सुकता निर्माण होईल, इतकी माहिती तुम्हाला देतो. पण क्रिकेट हा प्रकार जगात सगळ्यांनाच माहीत आहे (हा खरं तर गैरसमज) हे गृहीत धरूनच हा माहितीपट तयार केला आहे. आणि म्हणून यात सचिन क्रिकेटमधील कुठल्याच तत्त्व वा तंत्राबद्दल बोलताना दिसत नाही.

पहिला गार्ड घेताना तो नेमका काय विचार करायचा? स्टेडियमवरचे काही हज्जार डोळे आणि घराघरातून बघणारे काही कोटी डोळे यांच्या दडपणावर मात करायला तो काय करायचा? इनिंग बिल्डिंग कशी करायचा? त्यात त्याला वेळोवेळी आलेलं यशापयश, त्याची कारणं, एखाद्या उदाहरणाने जर त्याने सांगितली गेली असती तर? जसं त्या त्या देशाच्या वातावरणाशी एकरूप होताना काय करायचं याचं एक उत्तम उदाहरण त्याच्या मित्राच्या बोलण्यातून उलगडतं. तो सरावाला येणार म्हणून फुल एसी लावलेला. सचिन आल्यावर सगळ्या खिडक्या उघडायला लावून जागेचं तापमान त्या देशाच्या तापमानाइतकं झाल्यावर तो प्रक्टिसला सुरुवात करतो.  

विविध देशातील, विविध बॉलरना खेळायचं कुठलं तंत्र त्याने कमावलं होतं? याबद्दल तो बोलत नाही. वॉर्नचे चेंडू हवेत टर्न होत व टप्पा पडल्यावर वेगळ्या दिशेने जात हे तुम्हाला तो दाखवतो पण वॉर्नच्या या घातकी गोलंदाजीवर हावी होण्यासाठी त्याने काय विचार केला? कुठलं तंत्र वापरलं? याबद्दल तो काहीच बोलत नाही. कुठल्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीतील कच्चे दुवे ओळखले होते? की त्याच्यात ते नव्हतेच? आणि असले तर त्यावरही त्याने नंतर कशी मात केली वा ती करू शकला नाही? कारकिर्दीच्या शेवटाला नव्वदीतून शतकाकडे पोहोचण्यात येणारं अपयश. आणि त्याच्या शतकी शतकाकडे डोळे लावून बसलेलं सारं क्रिकेटविश्व. त्यावेळची त्याच्या मनातली चलबिचल. यातलं तो काहीच सांगत नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मैदानावर जसा खेळ चालू असतो तसा तो मैदानाबाहेरही चालू असतो. किंबहुना मैदानावरच्या खेळावर त्याचाच प्रभाव असतो. तिथं अनेक छोटी-मोठी वादळं आली. त्यावर सचिनची प्रतिक्रिया (वक्तव्य किंवा मौन) काय असावी या मागे खूप विचार केलेला असायचा. तिथूनच मग त्याच्या विरुद्ध एक वेगळा सूर लागायचा. क्रिकेटमध्ये असलेल्या प्रांतीय ताण्याबाण्यात त्याचा फायदा घेतला गेला. सचिन फक्त स्वतःसाठी खेळतो. सचिन हा match-winner नाही. कांबळी त्याच्यापेक्षा शैलीदार आणि प्रतिभावान होता. द्रविड (the wall), लक्ष्मण हे जास्त भरवशाचे खेळाडू आहेत. पण या सगळ्या आक्षेपांवर सचिन ठरवून मौन पाळायचा. तो एकच स्वप्न उराशी बाळगून होता, हातात वर्ल्डकप घ्यायचं, रन्स काढण्याचं.

पण भारतीय क्रिकेटला ग्रहण लागलेलं. एकट्याने खेळून वर्ल्डकप जिंकता येत नाही हे सत्य त्याला ठाऊक नव्हतं असं नाही. पण त्याला कुठल्याही वादात पडायचं नव्हतं. मैदानावर प्रतिस्पर्ध्याला तो तोंड द्यायला तयार होता, पण बाहेरचं राजकारण आणि त्यांचा रोष घ्यायला तो ‘तयार’ नव्हता. जे गावस्कर आणि कपिलने त्यांच्यावेळेस केलं.

आज क्रिकेटकडे करिअरच काय, तर सोन्याची खाण म्हणून पाहिलं जातं. याची सुरवात गावस्करने नुसतं मैदानात नाही तर मैदानाबाहेर झटून आणि या क्रिकेटमधल्या राजकारणी दांडग्यांशी झगडून केली होती. (Selectors ना हा Pack of Jokers म्हणाला होता. आठवतंय?) कपिलही आपल्या खेळाडूंचं या सगळ्यांपासून रक्षण करायचा. म्हणून त्याच्या हातात तो वर्ल्डकप दिसला. कारण ती टीम म्हणून श्रेष्ठ होती. त्यात गावस्कर आणि कपिल सोडले तर बाकीचे खेळाडू मोहिंदर, मदनलाल, बन्नीसारखे होते. श्रेष्ठ नाही पण उपयुक्त. कपिलने त्यांची टीम केली. सचिन कर्णधार म्हणून यशस्वी न होण्याचं ते एक महत्त्वाचं कारण असावं. क्रिकेट खेळणं, जगणं ही एक गोष्ट आणि क्रिकेट समजणं ही दुसरी. कपिल एकदा एका मुलाखतीत म्हणाला होता, ‘आज सचिन सर्वोत्तम फलंदाज आहे, पण भारतात गावस्कर इतकं क्रिकेट कोणालाच कळत नाही.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

सचिन खेळलेल्या आधीच्या दोन वर्ल्डकप पैकी एका टीमची वाताहात ग्रेग चॅपेलने केली होती, पण ग्रेग विरुद्ध ठामपणे बोलणार कोण? सचिनशिवाय ती ताकद कोणातच नव्हती. पण....   

अखेर सचिनचं स्वप्न धोनीच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या ‘टीम’ने पूर्ण केलं. यात सुद्धा महत्त्वाचा वाटा वर्ल्ड क्लास प्लेअरचा नव्हता तर युवराज, गंभीर, रैनासारख्या उपयुक्त खेळाडूंचा होता. विराट तेव्हा नवीन होता. त्यांच्यासाठीही सचिन देवच होता. अर्थात त्या स्पर्धेतही सचिनने श्रीलंकेच्या दिलशान खालोखाल सर्वांत जास्त धावा जमवल्या होत्या. त्याचं काम त्याने चोख बजावलं होतं. (यातही शेवटच्या सामन्यात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि तो लवकर बाद झाला. पॅव्हेलीयनमध्ये परतताना वाटेत क्रीजकडे जाणाऱ्या विराटशी बोलतानाचा तो क्षण या चित्रपटात दाखवला. पण तो तेव्हा त्याला काय बोलला असेल याची आपली उत्सुकता कायमच राहते.)  

वर्ल्डकप जिंकल्यावर अख्ख्या टीमने मैदानातल्या मिरवणुकीत सारा वेळ त्याला आपल्या खांद्यावर घेतलं. हे म्हणत की ‘इतकी वर्ष भारतीय क्रिकेटच ओझं त्याने वाहिलं’. आपण सगळ्यांनी साश्रूनयनाने ते पाहिलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

Match-fixing, अझर याविषयी तो आजही (माहितीपटात) काही बोलत नाही. कर्णधारपदावरून काढल्यावर त्याबाबत त्याला कळवलं नाही याची तो निव्वळ खंत व्यक्त करतो. ग्रेगच्या ‘Divide and Rule’ पोलिसीमुळे संघाची वाताहात झाली याचा तो फक्त उल्लेख करतो. पण तो एकशे चौराण्याववरती (द्विशतकाच्या इतक्या जवळ) असताना द्रविडने डाव घोषित केला या प्रकरणाचा तो साधा उल्लेखही करत नाही. राज्यसभेबद्दल तो काही बोलत नाही. ना IPL, ना अंबानी, आत्ताही कुठल्या वादग्रस्त विषयावर बोलायची त्याची ‘तयारी’ नाही.

इतक्या तरुण वयात मिळालेला भारतरत्न, हा देशातला सर्वोच्च किताब स्वीकारताना दाखवून माहितीपट संपतो आणि थेटरात गेलेला भक्त तृप्त होऊन साश्रुनयनाने बाहेर पडतो. सचिनsss सचिन.... सचिनsss सचिन.... चा गजर मात्र कानात घुमत राहतो.

.................................................................................................................................................................

लेखक महेंद्र तेरेदेसाई चित्रपट व नाटक दिग्दर्शक आहेत.

mahendrateredesai@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Rohit Deo

Tue , 06 June 2017

खेळा पेक्षा खेळाडू महान याच उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय टीम आणि सचिन... जेव्हा खेळाडू टीम पेक्षा मोठा होतो तेव्हा टीमला खेळाडू प्रमाणे ऍडजस्ट करावं लागतं ना की खेळाडू टीम प्रमाणे ऍडजस्ट होतो...

Rohit Deo

Tue , 06 June 2017

As a team player Sachin's limitations were perfectly highlighted... Good work...

Rohit Deo

Tue , 06 June 2017

उत्तम परिक्षण...

Ashok Rane

Mon , 05 June 2017

महेद्रचा ' सचिन ' वरचा लेख कम समीक्षा खूपच चांगली आणि नेमकी आहे. कलाकृतीचा विषय आणि माध्यम जाण उत्तम असल्या शिवाय असं लेखन होऊ शकत नाही. आणि म्हणून महेंद्रचं विशेष कौतुक वाटतं. त्याच्याशी बोलतानाही हे विशेषत्वाने जाणवत. ज्यांच्या माध्यम जाणीवा सखोल आणि समृध्द असतात, ज्यांच्यात तरल संवदनशिलता असते, सर्जनशिलता असते अशा कला रसिकांनी सातत्याने लिहिलं, बोललं पाहिजे म्हणजे तथाकथित समीक्षेच्या चौकटीत अडकलेल्या विविध कला आणि त्यातील कलाकृती मुक्त होतील आणि त्यांचे अधिक चांगले मूल्यमापन सर्जनशील रसास्वादाच्या अंगाने होईल. सिनेमा आणि नाटक या दोन माध्यमांवर महेंद्र याप्रकारचं खचितच लिहू शकेल. त्याने लिहावं. बोलावं...आणि हे करतानाच त्याने त्याचं संकल्पित पुस्तकही लिहावं. सिने - नाट्य रसिकांना केवळ वेगळंच नाही तर त्यांच्या कला जाणीवा अधिक सखोल करणारं वाचायला मिळेल.

Alankar Arvind

Sun , 04 June 2017

सचिन व सिनेमा विषयी अतिशय उत्तम लेख... समजण्यास सोपा आणि सरळ. थोडक्यात सांगायचा तर "सुरेख"

Madhav Shirvalkar

Sat , 03 June 2017

सचिनवरचा हा माहिती-कम-चरित्रपट मी अजून पाहिला नाही. त्याआधी महेंद्रची त्या वरची ही समीक्षा वाचायला मिळाली. आता जेव्हा मी तो मा.क.चरित्रपट पहायला जाईन तेव्हा 'इन बिटवीन द लाईन्स' वाचणं म्हणतात तशा चाणाक्ष दृष्टीने तो पाहीन. ही चाणाक्ष दृष्टी महेंद्रची ही समीक्षा माझ्यासारख्या सरासरी (इंग्रजीत त्यासाठी अॅव्हरेज हा किंचित अवमानकारक शब्द आहे. असो. ) प्रेक्षकाला देते, आणि 'चार्ज' करून सोडते. क्रिकेट एक खेळ, क्रिकेट एक करियर, क्रिकेट एक राजकारणाचा आखाडा असे क्रिकेटचे जे वेगवेगळे पैलू आहेत त्यांचेसाठी एक एक स्वतंत्र ऐरण (आणि स्वतंत्र हातोडेही अर्थातच ) घेऊन महेंद्रने सचिनच्या मा. क.च.पटाला आडे हाथो घेतलेलं आहे. एक तर महेंद्र स्वतः एक अनुभवी दिग्दर्शक. एक दिग्दर्शक दुसऱ्या दिग्दर्शकाची कलाकृती ऐरणीवर घेऊन चौफेर समीक्षा करतोय हे तसं दुर्मिळ दृश्य. त्या दृष्टीनेही महेंद्रची समीक्षा ही 'हटके' म्हणावी अशी आहे. महेंद्रच्या अशा चौफेर पैलूंमधून आलेल्या समीक्षेची समीक्षा करण्याचा प्रयत्न मोठ्या क्षमतेची अवजारं ज्यांच्याकडे आहेत त्यांनी करावी. ते माझ्या आवाक्यातले 'काम नोहे'. पण, सचिनला मैदानावर, पडद्यावर आणि कागदावर आयुष्यभर अनेकदा पाहिलेला सरासरी माणूस महेंद्रची समीक्षा वाचून हे नक्की ओळखेल की महेंद्रच्या त्या माकचपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, आणि त्या अपेक्षांची पूर्ती न झाल्याने, पण माकचपट दखल घेण्याजोग्या उंचीचा वाटल्याने महेंद्रने हा समीक्षेचा प्रपंच केलेला आहे. माकचपट जर अगदीच 'हा' वाटला असता तर समीक्षा लिहून त्याची दखल महेंद्रने बहुधा घेतली नसती. महेंद्रने ज्या उणीवा समीक्षेत सांगितल्या आहेत त्यावर वाद होण्याची शक्यता वाटत नाही. कारण त्या उणीवा ह्या वस्तुस्थितीशी नातं सांगताहेत. पण, समजा, त्या सर्व उणीवा दूर करून पुन्हा तोच माकचपट सुधारून निर्मिला तर तो प्रायोगिक चित्रपटाच्या जातकुळीतला बनेल काय? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुरू बेर्डेसारखे किंवा महेंद्रसारखे अनुभवी दिग्दर्शकच हवेत. तो ना माझा प्रांत आहे, ना ती माझी कुवत आहे. ह्या समीक्षेवर इतका लांबडा कमेंटलो कारण एका न पाहिलेल्या माकचपटाविषयी खूप उपयुक्त अशी प्रेक्षकदृष्टी तिने (समीक्षेने) दिली यासाठी. त्यासाठी महेंद्रच्या साक्षेपी समीक्षेला धन्यवाद.

Dilip Bapat

Sat , 03 June 2017

शक्यतोवर समीक्षा थोडी फार *पेडच* असते या मताचा मी आज पर्यंत होतो. पण आज तुझं समीक्षण वाचलं आणि शंका दूर झाली. मोजक्या आणि नेमक्या शब्दांत; पिक्चर पाहून बाहेर पडणाऱ्या प्रेक्षकाच्या मनातलं तुझ्या लेखणीतून कागदावर बरोब्बर उतरलं आहे.

purushottam berde

Sat , 03 June 2017

सचिन चित्रपटावरचा महेंद्रचा लेख अप्रतिम आहे ... पहिलेला सिनेमा पुन्हा उभा रहातो .... डॉक्यु - ड्रामा करण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय किती योग्य आहे हे सिनेमा बघुन कळते ... त्यामुळेच सचिन जवळून कळतो ....

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख