‘द केरला स्टोरी’ : हा चित्रपट जरूर पहावा आणि काय समजायचं ते समजून जावं. आपण तेवढे सुज्ञ नक्कीच आहोत...
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
गौतम ननावरे
  • ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे पोस्टर
  • Sat , 13 May 2023
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा द केरला स्टोरी The Kerala Story मुस्लीम Muslim महिला Women

‘द केरला स्टोरी’ हा बहुचर्चित चित्रपट काल मुलगी व पत्नीसोबत पाहिला.

तीन-चार जणांच्या ग्रुपमधील एका विशी-बावीशीतील मुलीने ‘मुली एवढ्या मूर्ख असतात काय?’ हे वाक्य उच्चारले. मागे वळून पाहिले, मला राहवलं नाही. त्या अनोळखी मुलीला तिथल्या तिथं ‘करेक्ट’ असं म्हणत प्रतिक्रिया दिली. त्यानंतर सोबत असलेल्या माझ्या मुलीनं ‘चित्रपट आहे. बघायचा आणि सोडून द्यायचा’, अशी प्रतिक्रिया दिली.

सोबत असलेल्या पत्नीनं तर वेगळाच मुद्दा उपस्थित केला. ‘खरं तर या चित्रपटामध्ये देवदेवतांविषयी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर एकही ठोस उत्तर न दिले गेल्यामुळे, त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. खरं तर या प्रश्नांची समर्पक उत्तरं देणारं एक तरी पात्र असायला हवं होतं,’ असं तिला वाटलं.

जगभरातील वाढत्या क्रूर दहशतवादाविषयी काळजी वाटावी, अशी आज परिस्थिती आहे. कारण त्याला अलीकडे स्पष्ट आणि उघडपणे राजकीय व धार्मिक स्वरूप दिलं जात आहे. हे करताना सर्वसामान्य लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्याची अधिक काळजी वाटते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

...आणि सगळीकडे बाईलाच ‘टार्गेट’ केलं जातं. मध्यंतरादरम्यान समोरच्या रांगेत बसलेल्या मध्यमवयीन दोन-तीन महिलांची आपसात चर्चा चालली होती. ‘हो ना,  मग मुलींना बाहेर पाठवायचं नाही, शिकवायचं नाही का?’ खरंच काळजी वाटावी, असाच प्रश्न आहे.

सर्वत्र काळोख झाला आणि पुन्हा पिक्चर सुरू झाला.

रात्री ९.४५चा शो असूनही थियटर पूर्ण भरलेले होते. त्यात प्रामुख्यानं तरुण-तरुणींची आणि पन्नाशीपुढील आईवडिलांची संख्या होती. दरम्यान संपूर्ण थियटरमध्ये एक वेगळाच सन्नाटा अनुभवायला मिळाला. लिपस्टिक लावल्याबद्दल एका मुलीचे हात आणि मुंडके तोडले जाते, या दृश्याच्या वेळी थियटरमध्ये अंगावर काटा आणणारी एका मुलींची दबकी आरोळी सर्वांनी अनुभवली. चित्रपटात दाखवला जाणारा हिंसाचार, रक्तपात  आणि त्यांचा प्रेक्षकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम, हा एक वेगळा विषय आहे.

हा संपूर्ण चित्रपट महिलांना समोर ठेवून बेतलेला आहे. घर, कॉलेजचे हॉस्टेल, दहशतवादी अड्डे सर्वत्र महिला व्यक्तिरेखांची रेलचेल आहे.

सार्वजनिक ठिकाणी होणारा महिलांचा विनयभंग, पुरुषांशी जवळकी, प्रेमाच्या जाळ्यात अडकणे आणि त्यानंतर घडणारे शारीरिक संबंध, हे काही कुठल्या एका धर्मातच घडतं असं नाही. पण धर्माधर्मातील वितुष्ट वाढवण्यासाठी, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी, कोणी अशा घटनांना धार्मिक स्वरूप देत असेल, तर सामाजिक शांततेवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

यापूर्वी अनेक वेळा अनेक चित्रपटांतील अनेक प्रणय दृश्यांना, प्रदीर्घ चुंबन दृश्यांना संस्कृतीच्या नावाखाली आपण विरोध केलेला आहे. या चित्रपटात तर थेट जबरी संभोगाची हालचालींसह विचलित करणारी ‘शॅडो’ दृश्यंच दाखवण्यात आली आहेत. आणि तरी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या वयात आलेल्या मुलीसह हा चित्रपट जरूर पहावा, अशी समर्थनं केली जात आहेत...

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

धर्मांतराचा मुद्दा या चित्रपटात दहशतवादाशी जोडण्यात आलेला आहे. अमली पदार्थाचा खुलेआम व्यापार औषधांच्या नावाखाली सुरू असल्याचंही दाखवण्यात आलं आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तरुणींना औषध म्हणून देण्यात आलेल्या गोळ्या कोणतीही शहानिशा न करता खाताना दाखवण्यात आलं आहे. लग्नाअगोदर शरीरसंबंध आणि गरोदर राहिल्यानंतर थेट धर्मांतर करून लग्नालाच तयार होणं, असंही दाखवण्यात आलं आहे.

नर्सिंग करत असलेल्या मुलींना मासिकपाळी, गरोदरपण आणि गर्भपाताच्या औषधांविषयी तर नक्कीच माहिती असणार. पण नाही, जन्मल्यापासून कॉलेजमध्ये दाखल होईपर्यंत झालेलं प्रदीर्घ काळातील शिक्षण आणि संस्कार केवळ काही दिवसांत ‘ब्रेनवॉश’ करून धुतले गेल्याचं दाखवलं आहे. ते संस्कार, शिक्षण एवढं तकलादू असतं?

कोणत्याही मानवी संस्कृतीला चांगली आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतात. प्रत्येक संस्कृतीतील समर्थकांना आपलीच संस्कृती चांगली आणि श्रेष्ठ आहे, असं म्हणण्याचा अधिकार कोणी नाकारत नाही. पण त्यासाठी दुसऱ्यांचे दोष काढले की, संघर्षाला सुरुवात होते. यात बळी मात्र सर्वसामान्यांचाच जातो.

या चित्रपटात एका मुलीनं फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं दाखवलं आहे, कारण सामाजिक बदनामीची भीती. प्रगत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आता क्षणात बदनाम करता येतं. तुम्ही न केलेल्या गोष्टी तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्हीच केल्याचं दाखवूनही बदनाम करता येतं. पण केवळ बदनामीला घाबरून जीवन संपवणं, हा मार्ग योग्य नव्हे. बदनामी झाली म्हणून सरळ आत्महत्या? यातून काय सूचित होतं?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उंटाच्या शर्यतीसाठी, भिक्षा मागण्यासाठी चोरट्या मार्गानं होणारी लहान मुलांची तस्करी काही महिन्यांपूर्वी गाजली होती. दहशतवादी कारवायांसाठी महिलांचा वापरही नवा नाही. बऱ्याचदा दहशतवादाला जात-धर्म नसतो, असं सांगितलं जातं; पण तो असतो, असं या चित्रपटात दाखवलं आहे.

कोणत्याही कारणास्तव प्रगत आणि मागास देशांतून होणाऱ्या बिनबोभाट मानवी तस्करीचा संबंध त्या त्या देशातील भ्रष्टाचारांनी पोखरलेल्या प्रशासकीय यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतो. माहीत नाही, पण पासपोर्टपासून सर्व बोगस कागदपत्रं त्यांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचं  दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटाच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. याची कथा खरी आहे की, खोटी? गायब मुलींची आकडेवारी कुठून, कोणी, कशी काढली? असं असेल तर सरकारला कसं कळलं नाही? निवडणूक काळात मतांचा प्रवाह आपल्याकडे वळवण्यासाठी असे चित्रपट प्रचाराचं साधन म्हणून वापरले जात आहे, असंही म्हटलं गेलं. असो.

चित्रपटात खंडर, वाळवंट यांची दृश्यं मात्र अप्रतिमरित्या चित्रीत करण्यात आली आहेत. प्रत्येक व्यक्तीरेखेला साजेशी वेशभूषा अत्यंत काळजीपूर्वक निवडल्याचं लक्षात येतं. त्यामुळे ते ते प्रसंग जिवंत झाले आहेत. कोणताही फार आरडाओरडा व भाषणबाजी न करता शांतपणे बोलली जाणारी छोटी छोटी वाक्यं प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचतात. केंद्रस्थानी असलेल्या सर्वच मुलींचा अभिनय उत्तम आहे. एक वादग्रस्त ठरू पाहणारा विषय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवताना दिग्दर्शकानं कमाल आणि किमान पातळी राखत समतोल साधला आहे.

एकंदरीत, काय तर वादग्रस्त ठरला असला, तरी चित्रपट चांगला आहे. त्यावर बंदी वगैरे घालू नये.

राजकारण्यांनी त्याचा प्रचारपट करू नये. चित्रपटातील सर्व खरं असतं, अशी स्वतःची भाबडी समजूत आजकाल कोणी करून घेत नाही.

लोकांना रोजच्या जीवनात जातधर्मविरहित अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याविषयी कोणी काही बोलत नाही. सर्वच राजकारण्यांचे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतप्रवाह वळवण्याचे मनसुबे लोक चांगलेच जाणून आहेत.

चित्रपट जरूर पहावा आणि काय समजायचं ते समजून जावं. आपण तेवढे सुज्ञ नक्कीच आहोत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......