‘वाजदा’ : अरबी भाषा, सौदी अरेबियामधील चित्रीकरण, वेगळे कथानक आणि उत्तम दिग्दर्शन
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सतीश कुलकर्णी
  • ‘वाजदा’चे एक पोस्टर व त्यातील एक प्रसंग
  • Sat , 09 October 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र वाजदा Wadjda हफिया अल मन्सूर Haifaa Al-Mansour

दिग्दर्शिका हफिया अल मन्सूर यांचा ‘वाजदा’ हा अरबी भाषेतील चित्रपट. सौदी अरेबियाच्या वतीने ८६ व्या अ‍ॅकेडमी अवार्डसाठी या चित्रपटाला प्रवेश मिळाला होता. पण दुर्दैवाने नामांकन मिळू शकले नाही. या चित्रपटाची कथा सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये घडते. वाजदा या १० वर्षांच्या मुलीला सायकल हवी असते, कारण तिला तिचा मित्र अब्दुलाबरोबर शर्यत खेळायची असते. मात्र सायकल महाग आणि सौदी अरेबियामध्ये मुलींना-स्त्रियांना सायकल चालवण्यास परवानगी नसते. पैसे नसल्यामुळे वाजदा सायकल घेऊ शकत नाही. त्यासाठी ती वेगवेगळे उपाय शोधून काढते, पण तरीही पुरेशी रक्कम साठत नाही. शेवटी ती शाळेत होणाऱ्या कुराण पठण स्पर्धेत भाग घेते. म्हणजे त्याच्या बक्षिसाच्या स्पर्धेतून सायकल विकत घेता येईल. वाजदाला शेवटी सायकल मिळते का? कशी मिळते? या प्रश्नांचा मागोवा म्हणजेच हा चित्रपट. 

पण हे कथानक उलगडताना दिग्दर्शिका सौदी अरेबियाची संस्कृतीही उलगडून दाखवतात. ही संस्कृती काटेरी तारेची आणि भिन्न आहे. मुली सहज बोलत असतानाही त्यांचा आवाज पुरुषांनी ऐकता कामा नये, याचा त्यांना धाक असतो किंवा टेरेसवर जेव्हा मुले खेळत असतात मुलींनी त्यांच्याकडे बघता कामा नये. कारण ते सुसंकृतपणाचे लक्षण नाही, हे लहानपणापासून मुलींच्या मनावर बिंबवले जाते. मुलींनी कोणत्याही परिस्थितीत बुरखा घातलाच पाहिजे, नाहीतर त्यांना शिक्षा दिली जाते!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

वाजदा याच संस्कृतीत वाढत चाललेली मुलगी. तिच्या घराबाहेर जसे वातावरण असते, तसेच घरीही असते. एका प्रसंगात वाजदाची आई आणि ती गाणे म्हणत असतात. तेव्हा वाजदा तिला ‘गायिका का झाली नाहीस?’ म्हणून विचारते? तिच्या आईला धक्का बसतो. स्त्रीने इतकं पुढारलेलं असणं पुरुषांना, विशेषत: नवऱ्याला मान्य नसतं.

स्त्रिया जरी बंधनात राहत असल्या, तरी पुरुषांना मात्र कुठलंच बंधन नसतं. वाजदाची आई (रिम अब्दुला) दिसायला सुंदर असते. पण केवळ मुलगा पाहिजे आणि तो तिला होत नाही म्हणून तो दुसरा विवाह करू इच्छितो. वाजदाच्या आईचे नवऱ्यावर प्रेम असते, पण त्याला प्रेमापेक्षाही मुलगा हवा असतो. त्याचमुळे वाजदाची आई चोरून सिगरेट ओढते किंवा शाळेतल्या मुख्याध्यापिकेचेही बाहेर चोरटे प्रेमसंबंध असतात. मुली मुलांना चोरून प्रेमपत्रे लिहितात.

वाजदाची भूमिका वाद मोहमदने चांगली केली आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वात निरागसपणा आहे, वेळप्रसंगी ती बेदरकार आहे, पण तरीही बंडखोर नाही. जेव्हा तिला शाळेत बुरखा घालून यायला सांगतात, तेव्हा तिची आई म्हणते- ‘वाजदा आता लग्नाची झाली.’ तेव्हा ती ते सहज घेते. कारण रूढी-परंपरांशी ती मिसळून गेलेली असते.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

वर्षानुवर्षं चालत आलेल्या परंपरा, रूढी यातच जखडून राहायचे का? दिग्दर्शिका चित्रपटाच्या सुरुवातीला हा प्रश्न उपस्थित करते आणि शेवटी त्याचे उत्तरही देते. संपूर्ण चित्रपटात हे दोन प्रसंग महत्त्वपूर्ण ठरतात. सुरुवातीला प्रार्थना म्हणत असताना वाजदाचे लक्ष नसते, तेव्हा तिला शाळेबाहेर कडकडीत उन्हात उभे करतात, असा एक प्रसंग आहे. त्यातून बुरसटलेल्या संस्कृतीचे चटके असेच लागताहेत असे दिग्दर्शिका प्रेक्षकांना सुचवून जाते.

चित्रपटाच्या शेवटी वाजदा एका रस्त्यावरून सायकल चालवत वेगाने पुढे जाते आणि एके ठिकाणी थांबते. समोर दुसरा रस्ता असतो. जुन्या रस्त्यावरून जात असताना तिला नवीन रस्त्याची ओळख, नवीन संस्कृतीची ओळख झालेली असते. सुरुवातीला असणाऱ्या रखरखीत उन्हातून आल्यावर समोर नवीन रस्ता दिसू लागतो...

अरबी भाषा, सौदी अरेबियामधील चित्रीकरण, वेगळे कथानक आणि उत्तम दिग्दर्शन, यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.

..................................................................................................................................................................

सतीश कुलकर्णी

satishkulkarni2807@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख