‘शेरनी’ : पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणारी एका स्त्रीप्रधान वाघिणीची कहाणी!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
चंद्रकांत कांबळे
  • ‘शेरनी’चं एक पोस्टर
  • Sat , 26 June 2021
  • कला-संस्कृती हिंदी सिनेमा शेरनी Sherni वाघीण Tigress विद्या बालन Vidya Balan विजय राज Vijay Raaj नीरज काबी Neeraj Kabi अमित मसुरकर Amit Masurkar

हिंदी सिनेजगतानं आजवर वाघावर आधारित अनेक सिनेमे केले आहेत, मात्र ‘शेरनी’ त्या सगळ्यांना अपवाद आणि आपलं वेगळेपण ठसवत ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर नुकताच रिलीज झाला आहे. व्यावसायिक सिनेमाच्या माध्यमातून दुर्लक्षित विषय हाताळणं अनेकांना जमत नाही. पण तीच नेमकी लेखक-दिग्दर्शक अमित मसुरकर यांची खासीयत आहे. त्यांचा हा तिसरा सिनेमा. त्यांचे सगळेच सिनेमे एका विशिष्ट पठडीतले आणि तितकेच परिणामकारक आहेत.

हिंदी सिनेमाने आपले नायक आजपर्यंत पडद्यावर वाघासारखे लढताना, भिडताना आणि चवताळताना, दाखवले आहेत. त्यांना आपण प्रसंगी वाघासोबत प्रत्यक्ष लढतानाही पाहिलं आहेत. यामागची बरीचशी कारणं तशी पक्षपाती आणि एकांगी आहेत. हिंदी सिनेजगत हे पुरुषप्रधान, पुरुषी वर्चस्ववादी असलेलं आहे. म्हणून त्यातले नायक वाघासारख्या डरकाळ्या आणि गर्जना करतात. वाघाचा थेट संबंध पुरुषांच्या मर्दानगीशी लावला जातो. वाघ पुरुषांच्या मर्दानगीचं प्रतीक म्हणून हिंदी सिनेजगतात अनेकदा वापरलं जातं. त्यामुळे समाजजीवनावरही त्याचा प्रभाव आहेच.

मात्र ‘शेरनी’ ही या सगळ्यांच्या पुढची गोष्ट आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

विद्या वन-अधिकारी एका जंगलानं वेढलेल्या गावात नुकतीच बदली होऊन आलेली असते. गावकरी वाघाच्या हल्ल्यानं त्रस्त झालेले असतात. वाघिणीला जिवंत पकडण्याचं ‘रेस्क्यू ऑपरेशन’ चालवलं जातं. फिल्ड वर्क विद्यासाठी नवीन असतं. एक मध्यमवर्गीय स्त्री ऑफिसर असण्यापासून ते गावकरी, गेंड्याच्या कातडीचं प्रशासन, त्यांची बेजबाबदार कार्यपद्धती, प्रशासकीय कामावर असणारा स्थानिक राजकीय नेत्यांचा प्रभाव आणि जंगली प्राण्यांची शिकार करून समाजात प्रतिष्ठा मिळवू पाहणारे बिनडोक समाजकंटक, या सगळ्या समस्यांना तोंड देत वाघिणीला वाचवण्यासाठीचा विद्याचा प्रवास म्हणजे ‘शेरनी’.

विद्या पुरुषी वर्चस्ववादी व्यवस्थेत इमानदारीनं स्वतःला झोकून देऊन काम करणारी वन-अधिकारी असते. सरकारी अधिकारी हा कोणत्या विशिष्ट समाजाचा, वर्गाचा अथवा पक्षपाती नसावा. मात्र भारतीय प्रशासनाचा गाडा त्यातच खोलवर रुतलेला आहे. त्यासाठी स्थानिक राजकीय नेते मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात. गावातील दुबळी, मजूर जनता जमीनदारांच्या शेतीवर काम करून, जंगलात गुरं चारून आपला उदरनिर्वाह करतात. राजकारणी आपल्या हितासाठी गावकऱ्यांचा वापर करून घेतात. सत्तेत असणारे आणि नसणारे या दोघांसाठी गावकरी व जंगल हे राजकीय विषय झालेले आहेत.

सत्तेत असणारा अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली कामं करून घेतो आणि सत्तेत नसलेला गावकऱ्यांच्या मृत्यूचं भांडवल करून सत्ताधारी व अधिकारी यांची कोंडी करण्याचा प्रयत करतो. या कचाट्यात विद्या अडकते. प्रामाणिक असण्याची किंमत तिला वेळोवेळी मोजावी लागते. ती दुर्बल गावकऱ्यांच्या समस्या आणि आपले हितसंबंध जोपासत राजकीय नेत्यांना सोबत घेऊन बेजबाबदार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या द्वंद्वांत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असते. मात्र त्यात यशस्वी होते की नाही, हे ‘शेरनी’ पाहिल्यावरच समजेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या सिनेमातला विद्या बालन, नीरज काबी, विजय राज, शरत सक्सेना, ब्रिजेंद्र काला यांचा अभिनय कमालीचा सुंदर आहे. विद्या बालनने सहज सुंदर वन-अधिकारी साकारली आहे. सगळेच कलाकार कसदार असल्यानं सिनेमाला आशयासहित वास्तवाचा रंग चढला आहे. राकेश हरिदास यांची सिनेमॅटोग्राफी समृद्ध करते. वाईड, टॉप अँड लो अँगलचे शॉट डोळ्यांना मोहित करतात. हा सिनेमा पाहून आपल्या मनात ‘जंगलवारी’ करण्याची इच्छा उत्पन्न होते.

सिनेमाचं संगीत भावनाप्रधान आहे. ते पात्रांच्या भावनांना एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवतं. यात एक ‘रनिंग साँग’ही आहे. ते पाहताना ‘काला’ या सिनेमातल्या गाण्याची आठवण येते. एकंदरीतच तांत्रिक अंगानं हा सिनेमा उत्तम आहे. त्याची लांबी जरा कमी करता आली असती तर टाइम व स्पेसचं तंत्र साधलं गेलं असतं. सिनेमात ज्या समस्या प्रकर्षानं येतात, त्यावर कोणतंही भाष्य न करता कथा सरळ मार्गानं सांगण्याचा दिग्दर्शकानं यशस्वी प्रयत्न केला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा विषय जितका पर्यावरण आणि विकासाशी संबंधित जितका आहे, तितकाच तो समकालीन आणि भविष्यकालीनही आहे. त्यासोबतच जल, जमीन आणि जंगल यांच्याशी संबंधित लोकांच्या जगण्याचा प्रश्नही आहे. भारत हा जगात सर्वांत जास्त वाघ असणारा आणि त्यांचं संरक्षण-संवर्धन करणारा देश आहे. म्हणून हा सिनेमा ‘लोकल टू ग्लोबल’ होणं साहजिकच आहे. पुरुषी वर्चस्वाला आव्हान देणारी एका स्त्रीप्रधान वाघिणीची ही कहाणी आवर्जून पाहण्यासारखी आहे.

..................................................................................................................................................................

लेखक चंद्रकांत कांबळे पुण्याच्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये सिनियर रिसर्च स्कॉलर आहेत.

chandrakant.kamble@simc.edu

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......