‘The Great Indian Kitchen’ : घराघरातला विरोधाभास दाखवणारा आरसा 
कला-संस्कृती - चलत्-चित्र
सुहास किर्लोस्कर
  • ‘The Great Indian Kitchen’ सिनेमाचे पोस्टर आणि त्यातील काही प्रसंग
  • Fri , 16 April 2021
  • कला-संस्कृती चलत्-चित्र द ग्रेट इंडियन किचन The Great Indian Kitchen सुरज वेंजरामोड्डू Suraj Venjaramoodu निमिषा सजयन Nimisha Sajayan

सकाळी झोपेमधून उठल्यावर ती पहिल्यांदा किचनमध्ये जाते, सगळ्यांसाठी चहा टाकते, ब्रश करतानाच चहा तयार होतो. चहा तयार होत असतानाच ती बेडवर पडलेल्या पांघरुणांच्या घड्या घालते आणि नाश्त्याची तयारी करते. नवरा झोपेमधून आळोखेपिळोखे देत उठतो आणि चहाबद्दल विचारतो. ती त्याला चहा आणून देते. तो घरपोच आलेलं वर्तमानपत्र वाचता वाचता चहा पितो. तिथेच ठेवलेला रिकामा कप ती उचलते, धुवून ठेवते आणि नाश्ता तयार करते.

तो व्यायाम करून येतो आणि नाश्त्यासाठी खुर्चीवर बसतो. ती नाश्ता आणून देते. तो आणखीन एका चहाची मागणी करतो, ती लगेच आणून देते आणि नाश्त्याची रिकामी प्लेट उचलून ठेवते. तो उठून अंघोळीला जाण्याची तयारी करतो. ती नाश्ता करण्यासाठी टेबलवर येते, त्या वेळी तिला दिसते की, टेबलवर पडलेले खरकटे तसेच असते. ती तशाच अवस्थेत स्वतःचा नाश्ता करते, सर्वांच्या प्लेट उचलून ठेवते आणि अंघोळीला जाते. त्या वेळी तिला दिसते की, नवऱ्याने अंघोळीनंतर त्याची अंतर्वस्त्रे बाथरूममध्ये तशीच ठेवलेली असतात. ती अंघोळ करून घरातल्या सगळ्या पुरुषांचे कपडे हाताने धुते आणि जेवणाच्या तयारीला लागते.

भाजी निवडून, घरात काय आहे-नाही याची पडताळणी करेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते. ती पोळ्या  करते आणि भाजी-भात तयार करेपर्यंत नवरा आणि त्याचे वडील टेबलजवळ येऊन बसतात. त्यांना ताट-वाटी मांडून पाण्याचा तांब्या-भांडे आणून ठेवते. नवरा टेबलवरून सांगतो की, पानात मीठ वाढलेले नाही. ती पूर्ण ताट मांडून ठेवते. बसल्या बसल्या तो कांदा मागतो. ते दोघेही जेवत असताना ती त्यांना काय हवं-नको ते बघते. तो सांगतो की, ‘आईच्या आमटीची चव वेगळीच होती’. ती विचारते, ‘त्या आमटीत काय मसाला वापरायच्या?’ तो म्हणतो, ‘मला त्यातले काही कळत नाही’. जेवण झाल्यावर तो पाणी मागतो, कारण तांब्यात पाणी नसते. ती पाणी आणून देते. तो पाणी पिल्यावर हात धुवायला जातो. ती दोघांची ताटे उचलून ठेवते, त्यातले खरकटे काढून टाकते आणि ताटे–वाट्या घासायला ठेवून देते. ती जेवायला बसणार इतक्यात तो सोफ्यावर बसून बडीशेप मागतो. ती जेवताना उठून त्याला तत्परतेने बडीशेप देते.  

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

बऱ्याच दिवसानंतर तिच्या लक्षात येते की, आपण नृत्य–गायन–संगीत विसरलो आहोत. बऱ्याच दिवसांत वर्तमानपत्र वाचायला वेळ झालेला नाही. स्वयंपाकघरात आणि घरातले आवरण्यात वेळ कसा जातो, हे कळत नाही. नवरा ऑफिसमध्ये आठ तास काम करतो, परंतु तिला पहाटे सर्वांच्या आधी जागे व्हावे लागते आणि रात्री सर्वांच्यानंतर झोपावे लागते.

शरीरधर्म पुरुषालाही आहे, परंतु तिच्या शरीरधर्माला प्रत्येक धर्माने सोवळे-शिवाशिवीची बंधने घातली आहेत. कारण धर्माचे नियम ठरवणारे पुरुष असतात आणि त्यामध्ये बदल करण्याची गरज पुरुष धर्मसंरक्षकांना वाटत नाही. कामाचे तास सर्वांत जास्त असूनही तिला सगळीकडे गृहीत धरले जाते, शिवाय स्वातंत्र्य कशाचेच नाही. धार्मिक प्रथा असो वा परंपरा किंवा घरातल्या पुरुषांची वर्तणूक, स्त्रियांनी विचार केलाच नाही, तर सर्व काही सुरळीत सुरू आहे असे वाटावे. 

पुरुषांनी पोथ्या पुराणापासून आजच्या स्वयंपाकघरापर्यंत एकूणच व्यवस्था कशी आपल्या मतलबासाठी वापरून घेतली आहे… घेत आहेत, याचे वास्तव भीषण आहे. परंतु स्त्रियांना विचार करण्यास प्रवृत्तच होऊ द्यायचे नाही, याचा प्रयत्न पुरातनकालापासून पुरुष करत आले आहेत. अजूनही आपण घरातल्या स्त्रियांवर कसा अन्याय करत आहोत, याची जाण बऱ्याच पुरुषांना नाही. त्याचेच प्रत्यंतर ‘द ग्रेट इंडियन किचन’ या मल्याळम भाषेतील सिनेमातून येते. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

ज्यो बेबी लिखित-दिग्दर्शित या सिनेमात संवाद मोजकेच आहेत, इतके की आपल्याला नायिकेचे नावही समजत नाही. तिच्या रोजच्या कामांमधून सिनेमा उलगडत जातो आणि आपल्या लक्षात येत राहते की, एका नृत्यकुशल हुशार स्त्रीची स्वयंपाकघर आणि रोजच्या कामामध्ये कशी कुचंबणा होते! सबरीमाला आंदोलन, अय्यप्पा मंदिर, त्या अनुषंगिक परंपरा याचा उल्लेख सिनेमात येतो, पण ठोस विधाने – चटपटीत संवाद नसतानासुद्धा आपल्याला वस्तुस्थितीचे गांभीर्य समजते. निमिषा सजयन आणि सुरज वेंजरामोड्डू यांनी नैसर्गिक शैलीमध्ये प्रसंग उभे केले आहेत. निमिषाच्या मनातले द्वंद्व, तिची कुतरओढ आपल्याला तिच्या कृतीमधून आणि चेहऱ्यावरून समजते. तरीही हा सिनेमा बारकावे आणि त्यातले विरोधाभास दाखवणाऱ्या लेखकाचा आहे.

सिनेमा हे दृश्य माध्यम आहे, तरीही आपल्याकडे त्याला ‘बोलपट’ म्हणतात. बहुदा त्यामुळेच आपल्याला भरपूर संवाद असलेल्या सिनेमांची सवय झाली आहे. चित्राची भाषा समजण्यात आपण फारच मागासलेलो आहोत. त्यामुळे सिनेमात संवाद नसले तर आपण ‘बोअर’ होतो. या सिनेमात सलू थॉमस यांचा कॅमेरा बोलतो. सर्वांच्या पानातले खरकटे स्वच्छ करणे बघण्याचा आपल्याला कंटाळा येत असेल तर रोज आपल्याच घरातल्या स्त्रिया हे काम कसे करत असतील?

या सिनेमात कुठेही आक्रस्ताळे संवाद नाहीत, डायलॉगबाजी नाही, नवरा-बायको यांच्यात बाचाबाची नाही, कारण एखादा प्रश्न विचारला तरी पुरुषाचा अहं दुखावतो. बेडरूममध्येसुद्धा तिला स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाहीत, नकाराधिकार वापरता येत नाही. लग्न झालेल्या स्त्रीवर होणाऱ्या अत्याचाराला बलात्कार म्हटले जात नाही. त्यामुळे एकाच अनुभवातून तिला समजते की, पुरुषाचे दोष काढायचे नसतात, त्याच्या वागण्यातला विरोधाभास, दुटप्पीपणा दाखवून द्यायचा नसतो. 

‘अॅमेझॉन प्राईम’वर नुकताच प्रदर्शित झालेला हा सिनेमा मल्याळम भाषेत असला तरीही सर्वांनी बघायला हवा. जेवण झाल्यानंतर स्वतःचे ताटही न उचलणारे, स्वतःचा चहाचा कपही न धुणारे, स्वयंपाक ही स्त्रियांचीच जबाबदारी आहे असे मानणारे, ऑफिसमधून आल्यावर सोफ्यावर बसून बायको किंवा आईला निर्लज्जपणे पाणी मागणारे पुरुष सगळीकडेच दिसतात. यामध्ये आपल्याला गैर काहीच वाटत नाही, कारण लहानपणापासून आपल्यावर तसेच संस्कार झालेले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुजेची तयारी स्त्रियांकडून करून घेणारे पुरुष गणपतीची मूर्ती मात्र स्वतः आणतात. गौरीची पूजा स्त्रियांनी करणे अपेक्षित असेल तर त्या पूजेच्या साहित्याची तयारी पुरुष करत नाहीत. देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन अभिषेक करण्याची परवानगी फक्त (उघड्याबंब) पुरुषांना असते. यातले आपल्याला काहीच खटकत नाही.

स्त्रिया शिकण्यासाठी शाळेत जाऊन पहिले क्रमांक पटकावू लागल्या तरीही अजूनही फक्त मुलाची मुंज केली जाते. यात काही गैर आहे असे मुलीच्या आईला वाटत नाही. लग्न झाल्याचा पुरावा म्हणून स्त्रियांना गळ्यात मंगळसूत्र घालावे लागते, परंतु पुरुषाला असा लग्नाचा कोणताही पुरावा दाखवावा लागत नाही. बरेच पालक आपल्या मुलाला स्वयंपाक शिकवत नाहीत, परंतु मुलीला मात्र सुगरण असल्याचा पुरावा पदोपदी द्यावा लागतो. शिकल्यासवरलेल्या घरातसुद्धा लग्नात कन्यादान करण्यात, कोणाचेही पाय धुण्यात गैर मानले जात नाही. याचे कारण सर्वसामान्य लोक कशाचाही विचार करत नाहीत.

त्यामुळेच विचार करायला लावणारा हा सिनेमा प्रत्येकाने सहकुटुंब, सहपरिवार पाहायलाच हवा.   

..................................................................................................................................................................

लेखक सुहास किर्लोस्कर सिनेअभ्यासक आहेत.

suhass.kirloskar@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......