रामानुजन : असामान्य गणितज्ञ
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
कॅ. मिलिंद परांजपे
  • ‘The Man Who Knew Infinity’चं पोस्टर
  • Sat , 22 October 2016
  • कॅ. मिलिंद परांजपे Milind Paranjpe Ramanujan रामानुजन

गणिती रामानुजन यांच्या जीवनावरील ‘The Man Who Knew Infinity’ हा इंग्लिश बोलपट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे भारतापेक्षा चार-पाच महिने उशिरा अमेरिकेत प्रसिद्ध झाला. रॉबर्ट कनिगेल यांनी लिहिलेल्या रामानुजनच्या चरित्रावर आधारीत म्याट ब्राऊन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनीटी कॉलेजमध्ये केलं  आहे.

मद्रासच्या श्रीनिवास रामानुजन या एका सामान्य कारकुनाचं असामान्य गणिती ज्ञान मद्रासचा इंग्रज कस्टम ऑफिसर ट्रिनीटी कॉलेजमधील जी. एच. हार्डी या गणितज्ञाच्या लक्षात आणून देतो. हार्डी त्याला १९१३ साली केंब्रिजला बोलावून घेतो. रामानुजनची विधवा सनातनी आई समुद्रपर्यटन निषिद्ध मानणारी असते. तिची समजूत घालून आणि तरुण पत्नीला घरी सोडून रामानुजन इंग्लंडला पोचतो. रामानुजनचे निर्भेळ गणिती सिद्धान्त बरोबर असले तरी त्यासाठी इतर गणितज्ञांना पटतील असे पुरावे देण्याचा आग्रह हार्डी धरतो. त्यावरून दोघांमध्ये वाद होतात. रामानुजनचे सिद्धान्त केम्ब्रिजच्या दृढ्ढाचार्यांना मान्य करायला लावून त्याला रॉयल सोसायटीचा फेलो करण्याचा हार्डीचा पहिला प्रयत्न असफल होतो, पण दुसऱ्या खेपेस यशस्वी होऊन रामानुजनला फेलो होण्याचा मान मिळतो.

रामानुजनच्या मते प्रत्येक समीकरण ईश्वराशी निगडित असतं, तर हार्डी पडला पूर्ण नास्तिक. पण ही मतभिन्नता त्यांच्या बौद्धिक किंवा वैयक्तिक मैत्रीच्या आड येत नाही. हे होत असताना पाच वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात रामानुजनला क्षयाची सुरुवात झालेली असते. शाकाहारी रामानुजनच्या जेवणाचेही हाल होतात. भारतात परतल्यावर एका  वर्षातच वयाच्या ३२ व्या वर्षी तो मृत्यू पावतो. इंग्लंडमधील टॅक्सीत बसण्याच्या वेळेस तिचा १७२९ हा नंबर दोन घनांची बेरीज असलेला सर्वांत लहान आकडा आहे हे रामानुजन दाखवून देतो. गणितातल्या अशा काही विक्षिप्त संख्यांना आजही taxicab numbers असं संबोधलं जात.

या चित्रपटात वर्णद्वेष दाखवला असला तरी एकंदर मध्यवर्ती कल्पनेतून  इंग्रजांची  गुणग्राहकताच दिसून येते.  

रामानुजनचे काम देव पटेलने ( ‘स्लम डॉग मिलिओनर’फेम ) तर त्याच्याहून १२ वर्षांनी लहान असलेल्या पत्नी जानकीचं काम अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या देविका भिसे हिनं केलं आहे. देविकाच्या आई स्वाती भिसे या चित्रपटाच्या  कार्यकारी दिग्दर्शक आहेत. जानकी (देविका) आणि तिच्या सासूबाई  (अरुंधती नाग) दक्षिणी पद्धतीने नेसलेल्या नऊ वारी साडीत (पण सकच्छ नव्हे) इंग्लिश बोलणाऱ्या दाखवल्या आहेत. ऑस्कर विजेता जेरेमी आयर्न हा हार्डीच्या अभिनयासाठी पंधरा वीस वर्षांनी मोठा असला तरी सामान्य प्रेक्षकाला ते जाणवणार नाही.

हा चित्रपट मी सिनेमा सिलिकॉन व्ह्यॅलीतील सांताक्लारा इथं पहिला. चित्रपटगृह अर्धंच भरलेलं होतं. बहुतेक प्रेक्षक भारतीय असले तरी चार-पाच गोरे आणि एकदोन चीनीही दिसले. चित्रपटाचं परीक्षण इंग्लंड आणि अमेरिकेत वर्तमानपत्रांमधून आलं आहे. असं ऐकलं आहे की, रँग्लर परांजपे ज्या वर्षी सिनिअर रँग्लर झाले म्हणजे केंब्रिज विद्यापीठात पहिले आले त्याच वेळेस हार्डी दुसरा आला होता. मनात विचार येतो की रामानुजनचे गणिती ज्ञान ओळखण्यात परांजप्यांचा काहीच सहभाग का नसावा?

 

लेखक निवृत्त नौदल अधिकारी आहेत.

captparanjpe@gmail.com 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......