अजूनकाही
आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीवनावर आधारित ‘अॅन इनसिग्निफिकेन्ट मॅन’ हा डॉक्युड्रामा वा फीचर फिल्म खुशबू रांका आणि वनिय शुक्ला यांनी तयार केला आहे. डिसेंबर महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला होता. तेव्हा तो पाहून अनेकांनी या सिनेमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आप या पक्षाचे समर्थक फारसे नव्हते, हे विशेष.
नुकताच हा १:३८:३४ एवढ्या कालावधीचा सिनेमा यूट्यूबवर उपलब्ध झाला आहे. त्याविषयी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार इंद्रजित खांबे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक वॉलवर म्हटलं होतं –
“केजरीवाल यांचा मी समर्थक नाही, तरीही ही फिल्म पाहताना अंगावर शहारे आले. ज्या दृरदृष्टीने दिग्दर्शक खुशबू रांका आणि विनय शुक्ला यांनी ही फिल्म शूट करायला सुरुवात केली, त्या दूरदृष्टीला सलाम. संपूर्ण फिल्ममध्ये अंगावर शहारे आणणारे, रडवणारे, हसवणारे कित्येक क्षण टिपलेत. सुदैवाने पूर्ण फिल्म यूट्यूबवर आलीय. चुकवू नका.”
हा सिनेमा २०१३पासून सुरू होतो. तेव्हा केजरीवाल उत्तर भारतात लँड ऑफिसर असतात. तिथपासून त्यांच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
तुम्ही केजरीवाल यांचे समर्थक असा किंवा नसा, एका राजकीय विषयावरील फीचर फिल्म कशी असावी हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा तुम्ही पहिल्यांदा पाहायला हवा. तसं तुम्ही केलंत की, दुसऱ्यांदा तुम्ही हा सिनेमा केजरीवाल या माणसाचा आजवरचा प्रवास समजून घेण्यासाठी पाहाल.
केजरीवाल राजकारणी, मुख्यमंत्री म्हणून किती यशस्वी आहेत किंवा नाहीत, हा वेगळा मुद्दा आहे. त्याची चर्चा जरूर करावी. ती स्पष्टपणे करावी. पण त्यासाठी हा माणूस आधी नीट समजून घ्यायला नको का? ते काम हा सिनेमा चांगल्या प्रकारे करतो. तेव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पहा-
.............................................................................................................................................
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment