जो दिखता है, वो होता नहीं जनाब!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
अनिरुद्ध प्रभू
  • अॅटली कुमार अर्थात अरुण कुमार आणि त्याची पत्नी पत्नी कृष्णप्रिया मोहन
  • Sat , 16 September 2017
  • कला-संस्कृती चलत्-चित्र अॅटली कुमार Atlee Kumar अरुण कुमार कृष्णप्रिया मोहन Krishna Priya Mohan

वरचा फोटो आपण सगळ्यांनी किती वेळा पाहिलाय... कधी मेमे तर कधी असाच... ‘सरकारी नोकरी असण्याचे फायदे..’ किंवा मग दुनियादारीताल्या फेमस (खरंच?) संवादाप्रमाणे ‘चांगल्या झाडावर नेहमी माकडेच चढतात...’ या किंवा अशा अनेक टॅग्जसोबत... खिल्ली उडवून अनेकदा हसलोसुद्धा असू... पण खरं नक्की काय आहे, हे किती जणांना ठाऊक आहे?

आपण आजही वर्णभेद मानतो... लग्नासाठी मुलगी गोरी हवी असते... मुलींनाही गोरे तरुणच आवडतात असा समज आहे... आजही आपण स्वभावापेक्षा रूपाला... दिसण्याला जास्त महत्त्व देतो. पण खऱ्या प्रेमात हे सगळं गौण असतं. याचंच उदाहरण म्हणजे ही जोडी...

या छायाचित्रात जो काळा, सुमार तरुण दिसतोय, तो आहे आजच्या घडीला तमिळ चित्रपटसृष्टीतल्या सगळ्यात मोठ्या दिग्दर्शकांपैकी एक. अॅटली कुमार अर्थात अरुण कुमार!

हा अवघा तीस वर्षांचा तरुण तमिळ चित्रपटसृष्टीत शंकर, मुरुगादोससारखे मातब्बर असताना महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक आहे हेच वाचून बऱ्याच जणांना धक्का बसला असेल... पण ते सत्य आहे.

अरुण कुमारनं पाच वर्षं शंकरबरोबर काम केलं... प्रसिद्ध नि बिग बजेट असलेला रजनीस्टारर ‘इंथीरण’ अर्थात ‘रोबोट’ बनत होता, तेव्हा अरुण शंकरचा मदतनीस होता... ‘रोबोट’ हिट झाला. त्यानंतर शंकरनं ‘थ्री इडियटस’चा तमिळ रिमेक केला, तेव्हाही हा त्याचा मदतनीस होता...

त्या पाच वर्षात तो शंकरकडून सिनेमाचे बारकावे शिकला... जमेल ते काम केलं... मिळेल त्या पद्धती शिकला... स्वत:ला नेहमी उपडेट करत गेला. हे सगळं करत असताना तो स्वत:ची एक कथा लिहीत होता... लग्न झालेल्या जोडप्याची कथा... संधी मिळाली आणि त्यानं ती कथा आर. मुरुगादोसला ऐकवली. त्याला ती आवडली. त्यानं पैसे गुंतावायचं मान्य केलं... अॅटलीला आभाळ ठेंगण झालं. त्यानं अजून जोमानं काम सुरू केलं. २०१३ ला त्याचा पहिलावहिला तमिळ चित्रपट रिलीज झाला - ‘राजा राणी’. आर्या, नयनतारा, जय, नाझ्रिया अशा मोठ्या नावांना घेऊन त्यानं हा चित्रपट बनवला होता. बऱ्याच कालावधीत तमिळमध्ये शांत, संयत अशी प्रेमकहाणी बनली नव्हती. ‘राजाराणी’ला त्याचा फायदा झाला. १५ कोटीचं बजेट असलेल्या या फिल्मनं तब्बल ६० कोटी कमावले. हा ‘विश्वरूपम’ नि ‘सिंघम २’नंतरचा सगळ्यात जास्त व्यवसाय करणारा सिनेमा ठरला. अरुणचा आता खरा प्रवास सुरू झाला होता...

पहिला सिनेमा फिल्म हिट झाला की, दिग्दर्शक त्याच पठडीतले सिनेमे बनवण्यावर भर देतात. कारण यश मिळवणं सोप असतं. अॅटली तेच करू शकला असता, पण त्यानं ते केलं नाही. यावेळी त्यानं लिहिली एक सूडकथा... यावेळी त्याच्यावर विश्वास दाखवला तो कलैपुली एस.थानु यानं. थानुनं अॅटलीला पूर्ण स्वातंत्र्य दिलं नि त्यानं त्याचं सोनं केलं. या सूडपटात त्यानं नायक म्हणून निवड केली ती सलग बरेच फ्लॉप देणाऱ्या विजयची...

हे तमिळमध्ये रजनी, विक्रम यांच्या खालोखालचं मोठं नाव... अभिनय खास नाही पण तरीही फक्त नृत्याच्या जोरावर त्यानं मिळवलेलं फॅन फॉलोइंग पाहून थक्क व्हायला होतं. म्हणूनच त्याला नाव दिल गेलं – ‘इलयदळपती’ (म्हणजे विजेच्या चपळाईने नाचणारा). या विजयनं बऱ्याच दिवसांत एकही हिट दिला नव्हता. आणि त्याचा अलीकडे रिलीज झालेला बिग बजेट चित्रपट ‘पुली’ तर सपशेल आपटला होता. अशा अवस्थेत अॅटलीनं त्याच्यावर विश्वास टाकला.

हा विजयच्या कारकिर्दीतला ५९ वा चित्रपट होता म्हणून सुरुवातीला या सिनेमाचं नाव होतं ‘विजय ५९’. पण यात विजयसह प्रभू, अॅमी जक्सन समान्था प्रभू, अशी मोठी नावं होती. हा चित्रपट १४ एप्रिल २०१६ ला प्रदर्शित झाला नि नाव होतं - ‘थेरी’!

‘थेरी’नं अवघ्या सहाव्या दिवशी १०० कोटींचा पल्ला गाठला. त्यानं शंकरच्या ‘रोबोट’चाही विक्रम मोडला. हा सिनेमा तमिळमधला मेजर हिट ठरला आणि अॅटली आघाडीच्या दिग्दर्शकांच्या यादीत जाऊन बसला!

विजय पुन्हा स्टार झाला. अॅटलीला त्यानं मित्रापेक्षाही मोठा दर्जा दिला. आता विजय त्याच्या ६१ वा चित्रपट करत आहे. त्यासाठी त्यानं पुन्हा एकदा अॅटलीलाच बोलावलं. या सिनेमाचं नाव आहे -‘मार्सल’. येत्या १६ ऑक्टोबरला तो प्रदर्शित होईल.

अॅटलीबरोबर जी सुंदर, गोड मुलगी दिसतेय ना, जिच्यामुळे अॅटलीला ट्रोल केलं गेलं, ती आहे अॅटलीची पत्नी कृष्णप्रिया मोहन. अनुष्का-सूर्याच्या ‘सिंघम’मध्ये तिन अनुष्काच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली आहे. याआधी तिने ‘विजय टीव्ही’वरील ‘कना कानूम कानंगळ’ (२००६) या गाजलेल्या मालिकेत काम केलं होतं. तिची आणि अॅटलीची ओळख तेव्हापासूनची आहे. अॅटली तेव्हा कोण होता? एक शॉर्टफिल्म बनवली होती त्यानं केवळ! त्या काळात प्रिया त्याच्यापेक्षा अधिक कमवत होती. ज्या काळात अॅटली कुणीच नव्हता, त्या काळात तिनं त्याचं बाह्यरूप नव्हे तर जिद्द पाहिली होती. तिला त्याच्यावर प्रचंड विश्वास होता. तो आज खरा ठरलाय. आज तिचा नवरा तमिळ सिनेइंडस्ट्रीतल्या आघाडीच्या दिग्दर्शकांच्या पंगतीत मानानं बसलाय! आणि तो तसा बसेलच, यावर इतर कुणाच्याही आधी तिनं विश्वास दाखवला होता...

तर हे सगळं खूप साधं आहे.

मूळ कारण आहे की, आपण सगळेच खूप जास्त जजमेंटल झालो आहोत. एखाद्या सुंदर मुलीनं सामान्य किंवा तिला अजिबात सूट न होणाऱ्या मुलाशी लग्न केलंय म्हणजे ते नक्की पैशासाठीच केलं असणार, ही आपली मानसिकता झालीय. मानसिकरीत्या आपण गोऱ्या कल्पनेचे गुलाम आहोत. आजही! हे सत्य आहे की, आपण बाहेर पडू शकत नाहीत आहोत या विकृत मानसिकतेतून.

आताच गरज आहे हे सगळं बदलण्याची... मानसिकता आणि स्वत:लासुद्धा... कदाचित त्यासाठी हा अॅटली आणि त्याची बायको प्रिया आपल्याला मदत करतील!

aniruddh.kautilya@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

nagesh barsale

Sat , 16 September 2017

छान वाटली माहिती, योगायोगाने मागेही असे http://www.marathipizza.com/the-reality-behind-black-and-white-couples-viral-photo/ यांसह फेसबुकवर वाचले होते.. बाकी,लिहिले छान... शुभेच्छा


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......