‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे
ग्रंथनामा - झलक
ज्ञानेश्वर मुळे
  • ‘भिंतीआडचा चीन’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 15 December 2024
  • ग्रंथनामा झलक भिंतीआडचा चीन Bhintiaadacha Cheen श्रीराम कुंटे Shreeram Kunte

चीनमधल्या साम्राज्यशाहीच्या इतिहासापासून ते आजच्या उत्तुंग प्रगतीपर्यंतचा आढावा घेत श्रीराम कुंटे यांनी आपल्या या पहिल्याच पुस्तकात चीनची कुंडली मांडली आहे. त्याला भारत सरकारचे माजी सचिव व राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

भारताशी ३५०० किलोमीटरपेक्षा दीर्घ सीमा असणारा देश. स्वातंत्र्यानंतर झालेल्या १९६२च्या युद्धात भारताला निर्णायकपणे हरवणारा देश. संपूर्ण जगातील प्रबळ सत्ता म्हणून पुढे येऊ पाहणारा देश. भारताशी सातत्याने शत्रूची भावना बाळगून प्रत्येक क्षेत्रात भारतावर कुरघोडी करू पाहणारा देश. सख्खे शेजारी असूनही बहुसंख्य भारतीय ज्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत असा देश. या देशाचे नाव आहे चीन.

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव (किंवा प्रत्यक्षात पाहिलेल्या) प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात. अनेकदा त्या ऐकीव किंवा एकांगी माहितीच्या आधाराने उभारलेल्या असतात.

शिवाय स्वदेशाविषयीच्या प्रेमापोटी आणि वृत्तपत्रे, सोशल मीडिया, पुस्तकं यांच्या गैरप्रभावातूनही काही प्रतिमा तयार होतात. त्यांचे खोलवर जाऊन चिकित्सा आणि विश्लेषण केल्याशिवाय चिनी लोकांची भारताकडे पाहण्याची नेमकी दृष्टी काय आहे? ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक असे आयाम काय आहेत? याचं उत्तर मिळणं कठीण आहे. १४० कोटीच्या देशात चीनचा गंभीरपणे अभ्यास करणारे विद्वान किती आहेत? चिनी भाषा किती भारतीय लोक बोलतात, वाचतात, अनुवाद करतात आणि सातत्याने अभ्यासतात?

या प्रश्नांचा थोडा जरी विचार केला, तरी एक गोष्ट लक्षात येते की, आपला ‘ज्ञानाचा अनुशेष` भरायला कित्येक दशकं लागतील. शत्रूच्या बाबतीत असं म्हटलं जातं की आपली माहिती जितकी शत्रूला असते त्यापेक्षा अधिक माहिती आपल्याला शत्रूची असली पाहिजे! आज तरी आपण चीनविषयीच्या वरवरच्या ज्ञानापासूनही वंचित आहोत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आज जगातल्या महासत्तांच्या पंक्तीतही चीन वरच्या स्थानावर आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य म्हणूनही तो पहिल्या-दुसऱ्या स्थानावर आहे. सुरक्षा परिषद ही एक जागतिक ‘पंचायत’ आहे. त्यातील अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे पाच स्थायी सदस्य आहेत आणि ते संपूर्ण जगासाठीचे महत्त्वाचे ठराव करतात.

युक्रेन-रशिया युद्ध असो वा इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष; प्रत्येक निर्णय या पाच सदस्यांवर अवलंबून असतात. भारत अनेकदा अस्थायी सदस्य झाला आहे, पण स्थायी सदस्यत्वापदी पोहोचण्याचा मार्ग अजूनही दृष्टिपथात नाही. जेव्हा केव्हा हे शक्य होईल तेव्हा ही पंचायत कोणता ‘खेळ’ खेळेल सांगता येत नाही.

श्रीराम कुंटे यांनी या व अशा सर्वच आयामांची तपशीलपूर्वक चर्चा व मांडणी केली आहे. एक शेजारी राष्ट्र म्हणून आपल्यासमोर चीनचं कायमचं आव्हान असणार आहे. चार भागांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात तटस्थपणे केलेल्या चिकित्सेतून पुढे आलेलं चीनचं एक समग्र चित्र लेखकाने आपल्यासमोर सादर केलं आहे.

यातल्या चौथ्या भागात भारतापुढे असणाऱ्या चीनच्या आव्हानांचे तपशीलवार वर्णन केलं आहे. त्यातलं पहिलं आव्हान विचारसरणीचं आहे. इतर आव्हानांप्रमाणे हे आव्हान जगातल्या समग्र लोकशाहीवादी देशांसमोरही आहे. विशेषत: अमेरिका, यु.के, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया या देशांसमोरही ते आहे. विसाव्या शतकात रशियासह अनेक ठिकाणच्या साम्यवादी किंवा तत्सम राजवटी कोसळल्या.

पूर्व आणि पश्चिम युरोपमधल्या सगळ्या विचारप्रणालीच्या आणि दगडविटांच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदावर आधारित अपार्थेड व्यवस्था संपुष्टात आली. पण विचारसरणीच्या बाबतीत चीन साम्यवादापासून तसूभरही हटला नाही. प्रागतिक विचारसरणी, लोकशाही व्यवस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बाबतीत चीन आजही माओयुगात आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. बदलली ती फक्त आर्थिक नीती.

...........................................................................................................................................

भारत-चीन यांच्यातही आतापर्यंत सीमाप्रश्नावर अनेक बैठका झाल्या आहेत. पण वाद मिटत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुत्सद्देगिरीत आपण कमी पडतो असं नाही, तर वाटाघाटीच्या पातळीवर कमी पडतो त्याच्या स्वरूपात बदल आवश्‍यक वाटतो. हीच आपल्या विदेशी धोरणाची परीक्षा आहे. आपण भारतीय जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवू शकतो, कारण लोकशाहीत जनता आणि संसद यांना प्रशासनाला सामोरं जावं लागतं. श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. सर्वसामान्य वाचकांबरोबरच चीनच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

...........................................................................................................................................

दंग शाओपिंगने १९७९पासून उदार आर्थिक धोरण आणलं आणि पुढच्या तीनेक दशकात चीनमध्ये आर्थिक क्रांती घडून आली. पण विचारसरणीतील मतभेदाचं आव्हान जगासमोर आणि भारतासमोर निश्चित राहणार आहे.

दुसरं आव्हान आर्थिक क्षेत्रातील स्पर्धेचं आहे. आपण अगदी उत्साहाने चीनच्या उत्पादनावर ‘बहिष्कार’ अशा बातम्या वाचतो. प्रत्यक्षात आपल्या देशाच्या बाजारावर चीनचं नियंत्रण व प्रभाव हाताबाहेर गेलेला आहे. द्विपक्षीय व्यापारातील संतुलन पूर्णपणे चीनच्या बाजूने आहे, हे सांगायला तज्ज्ञांची गरज नाही. या क्षणी चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. 

चीनबरोबरचा सर्व व्यापार ११८.४ मिलियन डॉलरचा आहे. त्यात भारताची निर्यात फक्त १६.६७ टक्के इतकीच आहे. चीनमधून होणारी आयात ही १०१.७ बिलियन डॉलर एवढी प्रचंड आहे. सध्या चीनबरोबरचे आपले संबंध बिघडलेले असतानाची ही स्थिती आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार क्रमांक दोनवर गेला आहे.

चीनच्या भारतातील गुंतवणुकीचाही आपण गंभीरपणे विचार करणं आवश्‍यक आहे. गेल्या पाच वर्षांत चीनने भारतातील स्टार्टअपमध्ये ४ बिलियन डॉलर गुंतवलेत. इतकंच नाही तर भारतातील ३०पैकी १८ युनिकॉर्नमध्ये चीनची गुंतवणूक आहे. आपल्या देशातील बौद्धिक संपदेचे वारस म्हणजे हे स्टार्टअप्स आहेत हेच आपण विसरलो की काय?

‘बेल्ट आणि रोड` या चीनच्या विदेशी आर्थिक धोरणाला भारताने विरोध केला असेलही पण प्रत्यक्षात हा बेल्ट भारताभोवती आवळला गेला आहे. हे आव्हान पेलण्यासाठी नेमकं काय धोरण आहे व त्यात जनता व उद्योग यांची भूमिका काय असावी, याची स्पष्टता आज घडीला दिसत नाही. मात्र चीनचा हा प्रभाव भारतापुरता मर्यादित नाही. जगातील अनेक प्रगत आणि अप्रगत देशांत चीनने आपला पगडा बसवला आहे. कुठे मदत, कुठे कर्ज, कुठे गुंतवणूक, कुठे बाजारात स्वस्त वस्तूंचे ढीग अशा अनेक पद्धतींनी चीन आपला प्रभाव वाढवतोय. सोबतच शेकडो ‘कन्फ्यूशियस` केंद्राच्या माध्यमातून चिनी भाषा, संस्कृती आणि विचारसरणीच्या प्रचार-प्रसाराचं काम सुरू आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

भारतासाठी तिसरं महत्त्वाचं आव्हान लष्करी आणि सामाजिक आहे. आपल्या ३०८० किलोमीटरच्या सीमेवर चीन पहारा ठेवून कशा प्रकारे घुसखोरी करता येईल ते पाहतोय. जून २०२०ला गलवानमध्ये झालेला संघर्ष गाजला. तरीही चीन वेगवेगळ्या प्रकारे घुसखोरी करतच आहे. सीमेलगतचे रस्ते, वस्त्या, तिबेटमधील रेल्वे आणि 2 लाख सैनिक उभे करून भारताला सतत कोंडीत पकडण्याचा प्र्रयत्न सुरू आहे. अर्थात चीन अशा प्रकारचं आक्रमक धोरण भारताबरोबरच फिलिपिन्स, जपान, तैवान, तिबेट, भूतान, व्हिएतनाम या देशांबरोबरही राबवतो आहे. पण चीनने किर्गिझस्तान, लाओ, मंगोलिया, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान व कझाकस्तान या देशांबरोबरचे सीमावाद मिटवले आहेत, हेही ध्यानात ठेवलं पाहिजे.

भारत-चीन यांच्यातही आतापर्यंत सीमाप्रश्नावर अनेक बैठका झाल्या आहेत. पण वाद मिटत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुत्सद्देगिरीत आपण कमी पडतो असं नाही, तर वाटाघाटीच्या पातळीवर कमी पडतो त्याच्या स्वरूपात बदल आवश्‍यक वाटतो. हीच आपल्या विदेशी धोरणाची परीक्षा आहे. आपण भारतीय जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवू शकतो, कारण लोकशाहीत जनता आणि संसद यांना प्रशासनाला सामोरं जावं लागतं.

श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाश टाकलेला आहे. सर्वसामान्य वाचकांबरोबरच चीनच्या अभ्यासकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे | मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ३६० | मूल्य - ४३० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......