‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ :  शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थित्यंतराचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
धनंजय गुडसूरकर
  • ‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 16 November 2024
  • ग्रंथनामा शिफारस विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर Vikram and Vetal @ Haibatpur देवेंद्र शिरुरकर Devendra Shirurkar

विसाव्या शतकाच्या शेवटच्या पाव दशकात ‘शेतकरी संघटने’च्या वादळाने महाराष्ट्राचं जगणं व्यापलं होतं. शेतकऱ्यांना आत्मभान मिळवून देणाऱ्या या संघटनेचा बिल्ला गावोगाव पोहोचला. प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देणाऱ्या शरद जोशींना ‘शेतकऱ्यांचे पंचप्राण’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ‘भीक नको हवे घामाचे दाम’ म्हणत या संघटनेने शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणले, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे शेतकरी कार्यकर्त्यांना आत्मभान दिले.

आज शेतकरी संघटनेचा प्रभाव ओसरला असला, तरी तिचा लाल बिल्ला मिरवणारा कार्यकर्ता कुठे तरी दिसतोच. चळवळीत जडणघडण झालेला किंवा त्यानंतरच्या पिढीचा हा कार्यकर्ता लढावयास पक्का असतो. एकांडा शिलेदार असूनही आपल्या विचारांची मांडणी करताना भोवतालच्या अवकाशात तो आपल्या प्रभावी अस्तित्वाची मोहोर उमटवतो.

विक्रम शिंदे नावाच्या अशाच एका जिगरबाज कार्यकर्त्याभोवती फिरणारी ‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ ही देवेंद्र शिरूरकर यांची कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. विक्रम हा शेतकरी संघटनेचा तरुण कार्यकर्ता या कादंबरीचा नायक असला, तरी त्यासोबत येणारी पात्रं गावपातळीचं प्रतिनिधित्व करतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठवाड्याची ओळखच दुष्काळी प्रदेश अशी. या आपत्तीला इष्टापत्ती समजत इथल्या पोरांनी शिक्षणाच्या बळावर सुरुवातीच्या काळात हैदराबाद, औरंगाबाद अन् नंतर पुणे, मुंबई, बेंगलोर पादाक्रांत करत साता समुद्रापल्याडच्या ‘सिलिकान व्हॅली’पर्यंत आपलं बस्तान बसवलं. सातबारावर मोठी जमीन असूनही बक्कळ पैसा खुळखुळण्याचा अनुभव नसणाऱ्या मागच्या पिढीसमोर नव्या पिढीनं ऐश्वर्य संपन्न जगवून दाखवलं.

हे जरी खरं असलं तरी परंपरागत असणारी शेती त्यातून असणारी प्रतिष्ठा व जपल्या जाणाऱ्या परंपरा; दुष्काळ, निसर्गाचा कमालीचा लहरीपणा, कंबरडं मोडणारी शेती, हे वास्तव असूनही शेतीपासून दूर न जाणाऱ्या भानुदास पाटील आणि तत्सम शेतकऱ्यांची कोंडी, बापजाद्यांच्या वहिवाटीप्रमाणं गावातच राहून दिवस काढणारी पोरं, शहरात जाऊन पोट भरतंय, पण फारसं काही उरत नाही, अशा दुष्टचक्रात अडकलेले तरुण हे आजच्या ग्रामीण भागाचं वास्तव आहे.

प्रश्नांचा हा वेताळ मानगूट सोडायला तयार नाही, तरी एखादा विक्रम पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करत राहतो. विक्रमच्या या क्रांतीभोवती (क्रांती म्हणायचं का नाही, हा प्रश्न उरतोच, कारण या शब्दाला आलेलं गुळगुळीतपण व पूर्वीच्या क्रांतीचे अनुभव) फिरणारी ही कहाणी आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतराचं प्रभावी चित्रण या कादंबरीतून दिसून येतं.

पत्रकार अनुरागसुद्धा मालेगावच्या भूमीतला. अनुरागचं व्यक्तिमत्त्वही तसं क्रांतिकारीच म्हणायला हरकत नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा असणाऱ्या अनुरागचा आणि वडिलांचा ३६चा आकडा! व्यवहारी जगाच्या दृष्टीनं अनुराग वेडाच!

अभ्यासात हुशार असलेल्या अनुरागनं डॉक्टर, इंजिनीयर किमानपक्षी प्राध्यापक तरी व्हावं, ही अण्णासाहेबांची अपेक्षा, पण अनुरागचं अगदी उलटं! वडिलांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगण्याचं नाकारणारा हा तरुण! पैसा, प्रतिष्ठा सामाजिक स्थान यांचं ओझं वाटणारा अनुराग मग आपली स्वतंत्र पायवाट तयार करून पत्रकारितेत रमतो.

...........................................................................................................................................

आपण भले जग बदललं असं कितीही म्हणत असलो, तरी प्रस्थापितपणाचा पीळ न जाणारी माणसं व त्यांचं वर्तन, या वर्तनाला संयमानं सामोरं जाणारी नवी पिढी हा एक विलक्षण वेगळा पैलू या कादंबरीतून टिपला गेला आहे. प्रभुत्वाला आव्हान दिले जाऊ नये, यासाठी केवळ नेतेमंडळीच जागरूक असतात असं नाही, तर कुटुंबातही आपल्या संततीनं प्रभुत्वाला आव्हान देऊ नये, अशी व्यक्ती असणाऱ्या हेकेखोर पालकांचं वर्तन चितारताना दोन पिढ्यांची फरपट प्रभावीपणे टिपताना कुणाला खलनायक न ठरवण्याचा तोल लेखकानं साधला आहे.

...........................................................................................................................................

‘नेहरूनीती’नं वडिलांशी वागणारा अनुराग वडिलांच्या जायदादीपेक्षा संवादाचा, मोकळेपणाचा भुकेला. परिणामी एकाधिकारशाही अंगी ठासून भरलेल्या व आव्हान सहन न होणाऱ्या अण्णासाहेबांकडून अनुरागची अपेक्षा मारली जाणं साहजिकच. त्यातूनच अण्णासाहेबांनी सांगितलेलं सारं ‘त्याज्य आणि वर्ज्य’ असलेलं अनुरागनं ‘पूज्य’ मानलं.

याच अनुरागनं विक्रमचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून केलेल्या निवेदनानं कादंबरीचा शेवट होतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या सरंजामशाही विरुद्ध लढणारा विक्रम आणि कुटुंबाच्या पातळीवर वडिलांच्या तथाकथित प्रतिष्ठितपणाशी संघर्ष करणारा अनुराग. एकूणच नव्या पिढीचा मूल्यात्मक संघर्ष सूक्ष्मपणे टिपणारी ही कादंबरी महाराष्ट्रातील या पिढीच्या तरुणांचं प्रतिनिधिक चित्र करणारी आहे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.

ग्रामीण भागातल्या मागच्या पिढीतील समाजकारण व राजकारणाचं चित्रण करताना लेखकाने राजकारणाचा बदलता पोत व त्यातलेलं जातवास्तव संयमितपणे मांडलं आहे. सरंजामदारी संपली म्हणून आपण कितीही प्रागतिकतेचे ढोल वाजवून घेत असलो, तरी तिचं नवं रूप मांडतानाच पत्रकारितेच्या क्षेत्राचं झालेलं व्यावसायीकरण आणि त्यापुढे जाऊन केल्या जाणाऱ्या लाळघोटेपणाची उदाहरणं आपल्याला अवतीभवती आढळतात.

याउलट प्रस्थापितांची संबंध असूनही मोक्याच्या वेळी संघर्षाला साथ देणारे अभिमन्यू काळे, रहमान पठाण, लहू पाटील ही कादंबरीतली पात्रंसुद्धा याच भवतालातील. प्रतिष्ठेच्या बेडीत न अडकता उत्तमराव, सुभाषराव ही भानुदासराव पाटलांची भावंडं मातीशी नाळ तोडण्याच्या प्रयत्नात असताना अभिषेक आणि विठ्ठल पाटलासारखी तरुण पोरं मात्र शेतीचं मूळ दुखणं दूर करून पुन्हा गाव मातीची जोडून घेण्याच्या प्रयत्नात दिसतात.

शिक्षण घेऊनही क्षमता सिद्ध करू न शकणारी किंवा क्षमता असूनही शिक्षणसम्राटांची थुंकी झेलून घेऊन पगारासाठी नोकरी करत ‘साईड बिझनेस’ करणारे वेतनधारी, शासकीय नोकरीत राहून रग्गड कमाई करत आमदारकीची स्वप्नं पाहणारा निवृत्ती वाघमारे, हनुमंत उपरेसारखे चळवळे प्राध्यापक अशी भलीभुरी पात्रं उभा करताना लेखकाच्या निरीक्षणशक्तीची ताकद कळते.

...........................................................................................................................................

कृषी क्षेत्राच्या या अभ्यासपूर्ण मांडणीत केवळ विद्वत्तेचं प्रदर्शन नाही, तर या मातीशी आणि शेतकऱ्यांशी असलेल्या नाळेचं प्रतिबिंब उमटतं. कंपनी हे त्याचं प्रत्यक्ष स्वरूप. वास्तविक पाहता कादंबरीत अशी आकडेवारी अथवा चिंतनशील मांडणी करणं, हे वाचनीयतेच्या दृष्टीनं धोकादायक, पण केवळ रंजनात्मक अथवा कथात्मक मांडणी करून विषयाच्या गांभीर्याला हात न घालण्याचा वाचनानुयी प्रयत्न करण्याच्या मोहापासून लेखकाची लेखणी दूर आहे.

...........................................................................................................................................

या साऱ्या घडामोडींत लक्षात राहतात ते भानुदासराव पाटील. वतनदार असलेल्या दासरावांच्या या चिरंजीवांच्या अंगी क्षमता असूनही ते शिक्षकी पेशावर समाधान मानतात. मात्र केवळ शिक्षकी पेशात अडकून न पडता लोकशिक्षकाची भूमिका पार पाडतात. शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रभावाने भारावलेले भानुदासराव परिवर्तनाच्या लढाईचे शिल्पकार म्हणून ज्या पद्धतीने विक्रम शिंदेच्या पाठीशी उभे राहतात, त्याला तोड नाही.

शेतकरी संघटनेत काही वर्षं घालून आपल्या शेतकरी प्रेमाच्या हुंड्या गोठवणाऱ्यांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या भानुदासरावांची वैचारिक बांधीलकी आणि सामान्यांप्रती असणारी आस्था जशी महत्त्वाची आहे, तशीच त्यांनी विक्रमची केलेली पाठराखण, ही त्यांच्या वैचारिकतेची कृतीशील पायवाट वाटते. जिचा अभाव सांप्रतकाळात अधिक जाणवतो.

या कादंबरीत आलेली पात्रं, कथानक, स्थळकाळ एका परिसरातले असले, तरी संपूर्ण महाराष्ट्रात यापेक्षा फारसं वेगळं चित्र नाही. ठरावीक घराण्यांभोवती फिरणारं राजकारण, समाजकारण, सहकारातलं प्रस्थापितपण हे सार्वत्रिकच चित्र, हैबतपूर मतदारसंघाच्या प्रातिनिधिक उदाहरणातून प्रभावीपणे टिपलं आहे. मात्र हे टिपताना ही कादंबरी केवळ राजकीय होणार नाही, याचं भान लेखकाने राखलं आहे.

कादंबरीकाराने शेती आणि शेतीप्रश्नांची मोकळी चर्चा करतानाच अभ्यासपूर्ण विवेचन व संदर्भ मोठ्या खुबीनं वापरले आहेत. शेतकरी संघटनेच्या विचारांची केलेली तर्कशुद्ध मांडणी कादंबरीच्या मूळ उद्देशाकडे घेऊन जाते.

‘जगातील १८ टक्के लोकसंख्या आणि केवळ ४ टक्के टक्के पाण्याची उपलब्धता असणाऱ्या देशात ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये घेण्याऐवजी आपण गरजेपेक्षा जास्त केळी आणि भात अशी अधिक पाण्याची पिकं घेतो आणि कमी फायद्यात निर्यात करतो. थोडक्यात कमी असणारे पाणी आपण कमी पैशात निर्माण निर्यात करतो,”

हे किंवा

“एकीकडे नफ्यातला वाटा शेतकऱ्यांना नाकारायचा आणि कारखानदारांचे नुकसान झाले की सरकारकडून भरपाई करून घ्यायची ,असं सगळंच आपल्या सोयीचं करून कसं भागेल?” असा सवाल करून शेतकऱ्यांनी उसाचं पीकच घेऊ नये, असा आग्रह करणारे अभिषेकसारखे नवतरुण ‘ग्यानबाचं अर्थशास्त्र’ मांडतात, तेव्हा अण्णासाहेबांसारखे अनुभवी अधिकारी आणि आबासाहेबांसारखे सहकारसम्राट निरुत्तर होतात!

...........................................................................................................................................

प्रश्नांचा हा वेताळ मानगूट सोडायला तयार नाही, तरी एखादा विक्रम पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करत राहतो. विक्रमच्या या क्रांतीभोवती (क्रांती म्हणायचं का नाही, हा प्रश्न उरतोच, कारण या शब्दाला आलेलं गुळगुळीतपण व पूर्वीच्या क्रांतीचे अनुभव) फिरणारी ही कहाणी आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थित्यंतराचं प्रभावी चित्रण या कादंबरीतून दिसून येतं.

...........................................................................................................................................

कृषी क्षेत्राच्या या अभ्यासपूर्ण मांडणीत केवळ विद्वत्तेचं प्रदर्शन नाही, तर या मातीशी आणि शेतकऱ्यांशी असलेल्या नाळेचं प्रतिबिंब उमटतं. कंपनी हे त्याचं प्रत्यक्ष स्वरूप. वास्तविक पाहता कादंबरीत अशी आकडेवारी अथवा चिंतनशील मांडणी करणं, हे वाचनीयतेच्या दृष्टीनं धोकादायक, पण केवळ रंजनात्मक अथवा कथात्मक मांडणी करून विषयाच्या गांभीर्याला हात न घालण्याचा वाचनानुयी प्रयत्न करण्याच्या मोहापासून लेखकाची लेखणी दूर आहे.

शेतकरी संघटनेच्या विचाराशी प्रामाणिक राहून काम करणारे भानुदास पाटील, विक्रम शिंदेतलं ‘कार्यकर्तापण’ हेरून त्याला संघटनेत सक्रिय करतात. आमदारांच्या पुतण्याविरोधात त्याला उभा करून पंचायत समितीची निवडणूक जिंकतात. पण इथपर्यंत न थांबता विक्रमला आमदारकीसाठी पाठिंबा देत आजी-माजी व भावी आमदारांना खिंडीत गाठत विक्रमच्या आमदारकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी लढवतात.

संघटनेचा विचार घेऊन वाटचाल करणारा विक्रम शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मतदारसंघाची बांधणी करतो. पंचायत समितीच्या निवडणुकीपासून सुरू झालेली कादंबरी विधानसभेच्या मतदानापर्यंत येऊन थांबते.

या कादंबरीत शेतकऱ्यांचे प्रश्न, शरद जोशींचा विचार, शेतकऱ्यांचं आजचं जगणं, शासनाकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक, निवडून येणाऱ्या प्रतिनिधींचं शेतकरीविरोधी वर्तन या साऱ्याचं वर्णन वास्तव दाखवणारं आहे. लेखक जणू काही या साऱ्या घटनांचा प्रत्यक्षदर्शी आहे, असं वाटतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

याशिवाय राजकारणातील सूक्ष्म बाबीही इतक्या नजागतीनं टिपल्या आहेत की, आपण अवतीभोवती पाहताना हे चित्र दिसतं. मतदारसंघातील जातीय समीकरणं, मागच्या चारेक दशकांत छोट्या जातसमूहांना आलेलं आत्मभान, माध्यमाच्या क्षेत्रात गाव पातळीपर्यंत झालेलं अवमूल्यन आणि धंदेवाईक पत्रकारिता, शेती व्यवस्थेत होणारे बदल, कुटुंबाच्या पातळीवर होणारे बदल व दोन पिढ्यांमधील विचारांचं व वर्तनाचं अंतर या साऱ्या बाबी टिपताना ग्रामजीवनात झालेल्या नागरिकीकरणाचा कुटुंबव्यवस्थेवर झालेला परिणाम टिपताना भाबडेपणा सोडून केलेलं चित्र वास्तव आहे.

‌आपण भले जग बदललं असं कितीही म्हणत असलो, तरी प्रस्थापितपणाचा पीळ न जाणारी माणसं व त्यांचं वर्तन, या वर्तनाला संयमानं सामोरं जाणारी नवी पिढी हा एक विलक्षण वेगळा पैलू या कादंबरीतून टिपला गेला आहे. प्रभुत्वाला आव्हान दिले जाऊ नये, यासाठी केवळ नेतेमंडळीच जागरूक असतात असं नाही, तर कुटुंबातही आपल्या संततीनं प्रभुत्वाला आव्हान देऊ नये, अशी व्यक्ती असणाऱ्या हेकेखोर पालकांचं वर्तन चितारताना दोन पिढ्यांची फरपट प्रभावीपणे टिपताना कुणाला खलनायक न ठरवण्याचा तोल लेखकानं साधला आहे.

अण्णासाहेबांचं व्यक्तिमत्त्व उभा करताना त्यांना खलनायक, अनुरागला नायक म्हणून उभारणं सहज शक्य असताना हा मोह टाळून ज्याच्या त्याच्या वर्तनाचं माप त्याच्या पदरात टाकून लेखक मोकळा होतो.

कथाबिजाची मांडणी करताना त्यात न गुंतता लेखकाने तटस्थपणे लेखन केलं की, ते शक्य होते. देवेंद्र शिरूरकरांनी या कादंबरीत हा गुंतण्याचा मोह टाळला आहे.

‘विक्रम अँड वेताळ @ हैबतपूर’ - देवेंद्र शिरुरकर

देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. , पुणे

पाने – ३००, मूल्य – ४५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......