‘सिनेमा पाहणारा माणूस’ : हे पुस्तक चित्रपट जगतातील असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अमरेन्द्र धनेश्वर
  • ‘सिनेमा पाहणारा माणूस’चं मुखपृष्ठ
  • Fri , 17 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama आगामी अशोक राणे Ashok Rane सिनेमा पाहणारा माणूस Cinema Pahnara Manus ऑल्फ्रेड हिचकॉक Alfred Hitchcoc फ्रान्स्वा त्रुफाँ François Truffaut

अशोक राणे हे नाव चित्रपट शौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपट समीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केलं आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.

चित्रपट जगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यातून त्यांची कारकीर्द घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक व्यापक आणि विशाल असं परिमाण प्राप्त झालं. अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पटकथा-संवादलेखक म्हणून तर त्यांनी नाव मिळवलंच, परंतु दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलुखगिरी केली आहे. त्यांच्या नावावर ‘मस्तीभरा है समा’, ‘माय नेम इज अ‍ॅन्थनी गोन्साल्विस’ अशा जवळपास सातआठ डॉक्युमेंटरीज आणि ‘कथा तिच्या लग्नाची’सारखा चाकोरीबाहेरचा चित्रपटही जमा आहे.

अशोक राणेंचा हा प्रवास घडला कसा? एका अतिसामान्य मालवणी कुटुंबात जन्मलेला, परंतु बुद्धी तल्लख असलेला अशोक राणे हा माणूस जन्मजात स्ट्रगलर आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये उपजिविकेसाठी नोकरी करता करता त्यांनी चित्रपट माध्यमाविषयीची आपली पॅशन पोटतिडिकेने सांभाळली, जपली आणि उत्तरोत्तर वाढवत नेली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

चित्रपटमाध्यमाविषयी एक प्रकारचं ग्लॅमरयुक्त आकर्षण असतं आणि पांढरपेशा व अतीव नैतिक अहंकारापोटी घालूनपाडून बोलण्याची आणि दुसरीकडे आंबटशौकिन कुतूहल बाळगण्याची वृत्तीही असते. चित्रपटाच्या दुनियेत वावरणारा किंवा त्याच्या नादी लागलेला म्हणजे ‘वाया गेलेला’ असं समीकरण बनवलं गेलं आणि ते वाढत्या वयाच्या तरुण-तरुणींच्या माथी मारलं गेलं. हे समीकरण कसं चुकीचं आहे आणि पोकळ आहे, हे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे अशोक राणे यांचं आत्मकथन वाचून लख्खपणे लक्षात येतं.

चित्रपट माध्यम हे विसाव्या शतकाला व्यापून राहिलं आणि एकविसाव्या शतकातही त्याचा समाजमाध्यमावर पगडा राहिला आहे. १९९०च्या आसपास आपल्याकडे चित्रपटांची पिछेहाट होत आहे की काय, अशी शंका येऊ लागली होती. परंतु या माध्यमाचं त्याचं म्हणून एक आंतरिक बळ असल्यामुळे त्याने पुन्हा उसळी घेतली. अशोक राणे यांनी चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची भूमिका स्वाभाविकपणे प्रथमपासून ठेवली आहे.

१९५०च्या दशकात चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘फिल्म प्रभाग’ निर्मित माहितीपट प्रत्येक चित्रगृहातून दाखवणं सक्तीचं असे. खऱ्या चित्रपटशौकिनाला या माहितीपटापासून चित्रपट पाहायचा असे. राणे म्हणतात त्याप्रमाणे पालम विमानतळावर उतरणारं किंवा तिथून आकाशात झेपावणारं विमान त्या माहितीपटातून दिसे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे जवाहरलाल नेहरू दिसत आणि अगदी काही क्षण का होईना, पण क्रिकेट कसोटी सामन्याची क्षणचित्रं दिसत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

राणेंनी आपलं हे पुस्तक आंद्रे बाझां, फ्रान्स्वा त्रूफो आणि पॅरिसचे ‘सिनेमाथेक फ्रॉन्से’ हे पहिलं चित्रपट संग्रहालय जिद्दीनं स्थापन करणारे आणि त्याचं प्राणपणानं जतन करणारे ऑनरी लाँगलुवा यांना अर्पण केलं आहे. ही नावं सामान्य चित्रपट शौकिनांच्या परिचयाची नसतील. एकीकडे जागतिक चित्रपटातील अशा महानुभवांविषयी आणि दुसरीकडे राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, हृषिकेश मुखर्जी आणि राजेश खन्ना यांच्यासंबंधी लिहिताना त्यांना न्यूनगंड वाटत नाही. चित्रपट पाहत पाहत क्रमाक्रमाने या माध्यमाविषयी आणि एकूणच साहित्य, समाज व संस्कृती याविषयी प्रगल्भ, परिपक्व समज आणि जाण कशी घडत जाते, ते अशोक राणे यांच्या उदाहरणांवरून आणि लेखनावरून दिसून येतं.

लाँगलुवांनी आपलं संग्रहालय कसं उभं केलं याविषयीची कहाणी राणेंनी लिहिली आहे. हिटलरच्या काळात पोलंडमधल्या एका ज्यू इसमापाशी काही दुर्मीळ चित्रपट असल्याचा सुगावा लाँगलुवांना लागला. त्या संग्रहाकडे गेस्टापोंचं लक्ष जाण्याआधी तो हस्तगत करणं महत्त्वाचं होतं. लाँगलुवाने आपल्या धाकट्या भावाकडे हे काम सोपवलं. तो अर्थातच घाबरला. “हे पिस्तुल जवळ ठेव आणि तशीच वेळ आली तर स्वत:वर गोळी झाडून घे,’’ असं सांगत त्याने भावाच्या हाती पिस्तुल ठेवलं. भावाने कामगिरी पार पाडली आणि लाख मोलाचा ऐवज घेऊन तो पॅरिसला परतला.

गुरुदत्त यांचे सिनेमॅटोग्राफर व्ही.के. मूर्ती यांच्याबरोबरचा राणेंचा संवाद, ‘कागझ के फ़ूल’मधला ‘वक्त ने किया क्या हंसी सितम’ या गाण्याच्या चित्रीकरणाची, त्यातील छाया-प्रकाशाच्या लपंडावाची उद्बोधक गोष्ट सांगून जातो. ‘साहिब, बिबी और गुलाम’मध्ये मीनाकुमारीचे पडद्यावरचं पहिलं दर्शन अत्यंत विलक्षण आहे. ते पाहून खुद्द मीनाकुमारी म्हणते की, मी दिसायला इतकी सुंदर आहे? ही तर व्ही. के. मूर्तींची कमाल आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तरुण हृषिकेश मुखर्जी मृणाल सेन यांच्या घरी जातात. ते घरी नसतात. त्यांचे वडील हृषिदांवर प्रश्नांचा भडीमार करतात आणि प्रत्येक उत्तरावर ‘मूर्ख’, ‘नालायक’ अशी शेलकी विशेषणं हृषिदांच्या अंगावर भिरकावतात. नंतर हृषिदांच्या लक्षात येतं की, आपण नोकरी करतो, पगार आईच्या हातावर ठेवतो, हे ऐकल्यावर ते अपशब्द मृणालदांना उद्देशून होते!

ऋत्विक घटक हा प्रतिभावान दिग्दर्शक दारूच्या विळख्यात सापडला होता. माधवी मुखर्जी ही त्यांच्या ‘सुवर्णरेखा’ या गाजलेल्या चित्रपटाची नायिका होती. एकदा ऋत्विकदा तिच्याकडे पैसे मागायला जातात. दारूसाठी पैसे द्यायला ती नकार देते. ऋत्विकदा आल्यापावली परततात. नंतर माधवीला अपराधी वाटू लागतं. ती त्यांच्या घरी जाते आणि ऋत्विकदांच्या पत्नीकडे पैसे देते. अशोक राणे यांना यावरून कलंदरपणे जगणारा कवी मनोहर ओक याची आठवण होते.

राणेंची कारकीर्द माझ्यासारख्यांच्या समोर घडलेली आहे. आम्ही त्यांचे समकालीन आहोत. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचे आणि संवेदनांचे आम्ही केवळ साक्षीदारच आहोत, अशातला भाग नाही, आम्ही त्यात सहभागीही आहोत. त्यामुळे साहजिकच त्यात अधिक रस वाटतो आणि त्यांच्याविषयी अधिक जवळीकही वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आजकाल जवाहरलाल नेहरूंना लाखोली वाहणाऱ्यांची आणि त्यांचं चारित्र्यहनन करणाऱ्यांची चलती आहे. परंतु राणेंच्या कथनात नेहरूंचे जे चित्र आलं आहे, त्यातून नेहरू हे किती विशाल दृष्टीचे, प्रागतिक विचारांचे होते हे लक्षात येतं. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधले प्रा. सतीश बहादूर हे विद्वान आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. ते मूळचे अलाहाबाद विद्यापीठातले. तिथं ते १९६०च्या दरम्यान फिल्म सोसायटी चालवत. मारिया सितोन ही परदेशी विदुषी त्यांचं काम आणि ज्ञान पाहून प्रभावित झाली. तिने बहादूर यांची नेहरूंकडे प्रशंसा केली. नेहरूंनी त्यांची ताबडतोब नव्यानं सुरू झालेल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नेमणूक केली. यावरून नेहरूंची पारख किती योग्य होती, हे लक्षात येतं.

अशोक राणे यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक म्हणजे चित्रपट जगतातील अशा असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे. तो लुटताना चित्रपट माध्यमाचं अवघं अंतरंग उलगडतं आणि समृद्ध व्हायला होतं.

जाता जाता असंही म्हणायला हरकत नाही की, सिनेमाकडे पाहण्याची एक निर्मम दृष्टी हे पुस्तक देऊन जातं.

.............................................................................................................................................

‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5157/Cinema-Pahnara-Manus

............................................................................................................................................................

लेखक अमरेन्द्र धनेश्वर ग्वाल्हेर घराण्याचे गायक/संगीत अभ्यासक आहेत.

amardhan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......