१) ‘अक्षरनामा’ हे कोणत्याही एका विचारसरणीला वा बाजूला वाहिलेलं नाही. त्यामुळे इथं सर्व प्रकारच्या विचारांचं स्वागतच केलं जाईल. मात्र भारतीय राज्यघटनेनं विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिलं असलं, तरी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे आणि विचार
म्हणजे व्यभिचार नव्हे! कारण भारतीय राज्यघटना स्वातंत्र्य, समता आणि न्याय या आधुनिक जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेल्या मूल्यांवर उभी आहे. या मूल्यांचं आपल्यापरीनं रक्षण करणं हेच ‘अक्षरनामा’चंही धोरण असेल.
२) वरील मूल्यांवर विश्वास असणाऱ्या आणि व्यापक समाजहित गृहित असणाऱ्या अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण लेखांचं ‘अक्षरनामा’वर स्वागत केलं जाईल.
३) ‘अक्षरनामा’ हे घटना, वास्तव आणि सत्य यांची योग्यप्रकारे विभागणी करून त्यांची त्या त्या पातळीवर मीमांसा करणारं व्यासपीठ आहे. त्यामुळे लेखन पाठवताना ते अभ्यासूपणाने आणि मुख्य म्हणजे संयत भाषेतच लिहिलेलं असावं. किंवा मग ते पूर्णपणे अनुभवाधारित असावं.
४) कुठल्याही विषयावरील लेख चालेल, पण त्याची शब्दमर्यादा १५०० शब्दांपेक्षा जास्त नसावी. लेखासोबत छायाचित्रं पाठवता आली किंवा अधिक माहितीसाठी आंतरजालावरील काही लिंक्स (मजकूर व व्हिडिओ) देता आल्या तर जास्त चांगलं.
५) लेखासोबत आपला अल्प परिचय, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल पत्ता पाठवावा. त्याशिवाय लेख प्रकाशित केला जाणार नाही. लेख प्रकाशित करताना फक्त आपला अल्पपरिचय व इ-मेल पत्ताच छापला जाईल. बाकीची माहिती ही केवळ आमच्यासाठी असेल.
६) संपादकमंडळाला लेख आवडला तर त्या लेखात आवश्यक ते बदल करण्याची गरज असल्यास तसं लेखकाशी बोलून लेख गरजेनुसार संपादित केला जाईल किंवा पुनर्लेखन करावयास सांगितलं जाईल. त्यानंतरच तो छापला जाईल. न आवडलेल्या लेखांबाबत त्या लेखकाला कळवलं जाईल.
७) लेख शक्यतो टाइप करून पाठवावा. ‘अक्षरनामा’वरील लेखन ‘एक मुक्त’ या युनिकोड टंका (Type) मध्ये असल्यानं ते आमच्यासाठी जास्त सोयीचं राहील.
८) लेखासोबत नाव प्रकाशित होऊ नये अशी इच्छा असल्यास त्याचं सबळ कारण द्यावं लागेल आणि संपादक मंडळाला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्याशिवाय लेख टोपणनावानं छापला जाणार नाही. लेख आवडल्यास आपल्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल.
९) कुठल्याही प्रकारचा बदनामीकारक, अवमानकारक, द्वेषपूर्ण मजकूर छापला जाणार नाही किंवा तसं आढळून आल्यास तसे लेख त्वरित काढून टाकले जातील.
१०) तेव्हा ‘आमच्यासाठी लिहा’! तुमच्या योग्य प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. लेख पाठवण्यासाठीचा पत्ता - editor@aksharnama.com