करोना हे जागतिकीकरणाच्या हावरटपणाचे फळ आहे
विध्वंसक भांडवलशाहीने केवळ पर्यावरणीय संकटच निर्माण केले नाही, तर परिसंस्थेच्या नैसर्गिक सीमांच्या अतिक्रमणाची परिस्थिती निर्माण करून एकामागून एक जागतिक महामारीची मालिका निर्माण केली आहे. गेल्या दोन दशकांत प्राणी किंवा वन्यजीवांपासून मानवांना लागण झालेल्या ‘सार्स’, ‘मार्स’, ‘बर्ड फ्लू’, ‘स्वाइन फ्लू’, ‘झिका’, ‘एच 1 एन 1’, ‘एच 5 एन 1’ ही त्यांची उदाहरणे आहेत. ‘एच 1 एन 1’ने जगभरात पाच दशलक्षांहून अधिक लोकांना मारले.......