अॅनी अखनोव्ह : माणसाला अवगत नसलेल्या भाषेत स्वतःला व्यक्त करण्याची इच्छा असलेली लेखिका
Susan Sontagचा ‘On photography’ हा निबंध मी मागे खुपदा वाचायचो. ती म्हणते- ‘छायाचित्र हा बघणार्याचा स्वानुभव नसतो… उसनवारीचा अनुभव असतो...’ अॅनीसंदर्भात विचार करताना मला उगीच वाटून गेलं की, आयुष्याचा दस्तावेज मांडताना लहानपणीच्या आठवणी, आपलं पैतृक गावघर सोडताना, आपल्या गर्भपातप्रसंगी आजूबाजूला असलेल्या शुष्कभिंती, लग्नाबाहेरचे प्रेमसंबंध, ही आठवणींची छायाचित्रंच की!.......