मुले शिव्या देऊ शकतात, तर मुली का नाही देऊ शकत, हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे. शिव्या माणसाला क्रूर आणि हिंसक बनवतात. त्या एकमेकांविषयी द्वेष निर्माण करतात. अशा गोष्टींत समानता शोधायची?
शिव्या चांगला माणूस घडवतात? त्या आपणाला अहिंसक बनवतात? आपल्यामध्ये प्रेम आणि सद्भाव निर्माण करतात? आपल्या नात्यात दृढता आणतात? जर शिव्या देणे हा स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वावर आघात आहे, तर त्यामध्ये आपण समानता शोधायची कशाला? स्त्री असो वा पुरुष, जर ते स्त्रीविरोधी शिव्यांचा वापर करत असतील, तर ते स्त्रीविरोधीच असणार.......