‘अँग्री ओल्ड मॅन’च्या अवतारातला घायाळ शाहरूख खान सिस्टिमच्या डोळ्याला डोळा भिडवत, खर्जातला आवाज लावत सिस्टिमवर चामड्याच्या बेल्टने सपासप फटके मारत असतो...
हे सारं होतं तरी काय? त्याला संपवू पाहणाऱ्या सिस्टिमविरोधातलं हे सरळ सरळ बंड होतं. माझा धर्म असेल अमुकतमुक, पण हा देश, इथली जमीन, इथली आबोहवा, इथली माणसं, इथली संस्कृती माझीसुद्धा आहे. यावर हक्क जितका तुमचा आणि तुमच्या बापाचा आहे, तितकाच तो माझा आणि माझ्याही बापाचा आहे, असा त्या बंडामागचा खरमरीत सूर होता. तुम्ही द्वेष पसरवा, मी त्यावर प्रेमाची फवारणी करतो, असा मिलाफ स्वर होता.......