‘कासव’ : एका ‘गे’ तरुणाच्या नजरेतून
‘कासव’चा गाभा असलेलं ‘नैराश्य’ हा बहुसंख्य ‘गे’ तरुणांचा जिवंत अनुभव असतो. अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण तज्ज्ञांच्या मतानुसार ‘नैराश्य’ आणि ‘आत्महत्या’ यांचं प्रमाण गे तरुणांमध्ये दखल घेण्याजोगं असतं. या पार्श्वभूमीवर, ‘कासव’मधून मला, एका गे तरुणाला, जे चार मौल्यवान धडे मिळाले, ते इतरांना सांगावेसे वाटतात. हे धडे फक्त आशादायी आहेत म्हणून नव्हे, तर कदाचित एखादं अवेळी संपणारं आयुष्य वाचवू शकतील म्हणून.......