लोकशाहीच्या दिवाणखान्यातला सोशल मीडिया नावाचा हत्ती (पूर्वार्ध)
तुम्ही पुरेसे सजग नसाल, तर काही काळातच तुम्हाला भासणारे सत्य हेच अंतिम सत्य आहे यावर तुमचा विश्वास बसेल व तुम्ही त्याच बुडबुड्यात तरंगत राहाल याची व्यवस्था सोशल मीडिया करेल. ट्रम्प-विजयानंतर अनेकांना जो धक्का बसला, त्यामागेही हाच बुडबुडा होता आणि गेल्या काही वर्षांत जगभरातील लोकांत जे एकारलेपण उदयाला आले आहे, त्यातही या सोशल मीडिया निर्मित बुडबुड्याचा मोठा हात आहे. हा बुडबुडा त्या एकारलेल्या विचारांना पूरक आहे.......